नुकतंच पोलिसांनी हरियाणातील हिसार इथून प्रसिद्ध यूटुबर ज्योती मल्होत्रा हिला अटक केली आहे. ज्योती ही पाकिस्तानची हेर असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं असून, याच आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे. हरियाणाच्या हिसार पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केली आहे. न्यायालयानं तिला २२ मे पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यात अतिशय संवेदनशील परिस्थिती असताना दुसरीकडे लोकप्रिय यूटुबर पाकिस्तानची हेर निघाल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (Indian Spy)
एक महिला आणि त्यातही अतिशय प्रसिद्ध, लोकप्रिय सेलिब्रिटी स्टेट्स असलेली व्यक्ती भारताच्या सर्वात मोठ्या शत्रू राष्ट्राची गुप्तहेर निघाल्यामुळे सर्वच भारतीयांना ज्योतीबद्दल घृणा निर्माण होऊन तिचा राग येत आहे. सोशल मीडियावर अशा पोस्ट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. एक महिला हेर आणि ती ही पाकिस्तानसाठी काम करणारी, ही कल्पनाच चीड आणणारी आहे. मात्र खूप कमी वेळा आपल्याला महिला हेरबद्दल ऐकायला मिळते. (Marathi Top NEws)
मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, भारतातील पहिल्या महिला गुप्तहेर नीरा आर्य यांनी सुभाषचंद्र बोस यांचे प्राण वाचवण्यासाठी चक्क स्वतःच्या पतीची हत्या केली होती. दुर्दैवाने या महान स्त्रीचे कर्तृत्व, त्याग हा इतिहासातच बंद झाला. आज अनेकांना तर नीरा यांच्याबद्दल माहिती देखील नसेल. नीरा यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठा त्याग तर केलाच सोबतच अविरत यातना सहन केल्या. जाणून घेऊया इतिहासात गहाळ झालेल्या याच नीरा आर्य यांच्याबद्दल अधिक माहिती. (Neera arya)
भारतावर अनेक शासकांनी राज्य केले. मात्र भारतीय लोकांच्या निष्ठेसमोर, देशप्रेमासमोर अनेक शासकांचा निभाव लागला नाही. मात्र इंग्रजांनी भारतावर तब्बल १५० वर्ष राज्य केले. या मोठ्या काळात त्यांनी भारताला तर लुटले सोबतच इथल्या लोकांवर अमानुष अत्याचार केले. याकाळात अनेक क्रांतिकारी, थोर नेते समोर आले ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि भारतीय लोकांना त्यांच्या दृष्ट अत्याचारातून वाचण्यासाठी कायम प्रयत्न केले. (Marathi News)
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचे आणि मोठे नेते म्हणजे सुभाषचंद्र बोस. बोस यांनी ‘आझाद हिंद सेना‘ स्थापन केली आणि या अंतर्गत त्यांनी ब्रिटाशांविरोधात लोकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. बोस यांच्याशिवाय कायम भारताचा इतिहास अपूर्ण आहे. याच सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या पहिल्या गुप्तहेर होत्या, नीरा आर्य. लवकरच नीरा यांच्यावर आधारित एक सिनेमे देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Latest News)
नीरा आर्य यांचा जन्म ५ मार्च १९०२ रोजी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील खेकरा शहरात झाला. त्यांना सेठ छज्जूमल यांनी दत्तक घेतले होते. ते कोलकात्यातील एक श्रीमंत व्यापारी होते. त्यांनी नीरा यांना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले. मात्र लहानपणापासूनच त्या देशप्रेमाने आणि देशभक्तीने ओतप्रोत होत्या. त्यांना भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभागी व्हायचे होते. याच ध्येयाने प्रेरित होऊन त्या नेताजींच्या आझाद हिंद फौजेमधील ‘राणी झाशी रेजिमेंट’मध्ये सामील झाल्या. ही महिला सैनिकांची विशेष तुकडी होती. (Marathi Trending News)
नेताजींनी नीरा आणि सरस्वती राजामणी यांच्यावर हेरगिरी करण्याचे दायित्व सोपवले होते. अशाप्रकारे त्या देशाच्या पहिल्या गुप्तहेर सैनिक बनल्या. कधी मुलगी, तर कधी पुरुष बनून ब्रिटीश अधिकारी आणि इंग्रजांच्या सैनिकी तळांमधील गोष्टी त्या आझाद हिंद सेनेला पुरवत राहिल्या. नीरा आर्य यांचं लग्न श्रीकांत जय रंजन दास यांच्याशी झालं होतं. श्रीकांत जय रंजन दास हे ब्रिटिश सैन्यातील सीआयडीमध्ये कार्यरत असलेले एक मोठे अधिकारी होते. मात्र, या दोघांचे विचार पूर्णपणे वेगळे होते. नीरा या भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत होत्या, तर श्रीकांत भारताविरोधात ब्रिटिश सत्तेची साथ देत होते. (Social News)
श्रीकांत यांना नीरा ब्रिटीश सत्तेविरुद्ध हेरगिरी करून आझाद हिंद सेनेला मदत करत आहे, हे समजल्यावर त्यांनी तिला नेताजींविषयी विचारण्यास सुरुवात केली. नेताजीबद्दल काहीही न बोलणाऱ्या नीरा यांच्यावर श्रीकांत यांनी खूप अत्याचार केले, त्यांचा छळ केला मात्र त्या तरीही मागे हटल्या नाही. याउलट नीरा यांनी अजून वेगाने स्वातंत्र्यलढ्यासाठी आपले योगदान देण्यास सुरुवात केली. एके दिवस महत्त्वाची माहिती देण्यासाठी नीरा नेताजींना भेटायला निघाल्या. मात्र या भेटीबद्दल श्रीकांत दास यांना कुणकुण लागली. पुढे त्यांनी गुपचूप नीरा यांचा पाठलाग केला. नेताजी यांच्याशी नीरा यांची भेट झाली ते बोलत असताना श्रीकांत यांनी त्यांच्या दिशेने गोळी झाडली; पण ती गोळी नेताजींच्या वाहनचालकाला लागली. (Marathi Top Trending News)
ते पाहून नीरा यांनी लगेच पुढचा धोका ओळखला आणि एका क्षणाचाही विलंब न करता त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या चाकूने स्वतःच्या नवऱ्याचा म्हणजे श्रीकांत दास यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा कोथळा बाहेर काढला. स्वतःच्या नवऱ्याचा जीव घेत त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जीव वाचवला. जेव्हा याबद्दल ब्रिटिशांना समजले तेव्हा त्यांनी नीरा यांना अटक केली आणि त्यांची रवानगी अंदमान येथे केली. तिथे त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. तिथे त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले.
=======
हे देखील वाचा : Youtuber : यूट्यूबर ते पाकिस्तानची हेर बनलेली ज्योती मल्होत्रा आहे कोण?
=======
एक दिवस जेलरने त्यांना ऑफर दिली की, जर त्यांनी नेताजींचा ठावठिकाणा सांगितला, तर त्यांना सोडून देण्यात येईल. पण यावर नीरा यांनी बोलण्यास नकार दिला. जेलरने पुन्हा त्यांना प्रश्न केला ‘नेताजी कुठे आहे?’, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘ते माझ्या हृदयात आहेत’, या उत्तराने चिडलेल्या जेलरने नीरा यांचे कपडे फाडले. आणि त्यांचे उजवे स्तन कापायचा आदेश दिला. या आदेशानंतर लगेच नीरा आर्य यांचा उजवा स्तन कापला गेला. मात्र तरीही त्यांनी काहीही माहिती दिली नाही. अनेक वर्ष तुरुंगात असलेल्या नीरा यांना अखेर भारताच्या स्वातंत्र्यानंतर सोडण्यात आलं. (Top Update)
बाहेर आल्यानंतर नीरा यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य हैद्राबादमध्ये फुले विकून उदरनिर्वाह करत व्यतीत केले. देशासाठी स्वतःचे सर्वोच्च बलीदान देणार्या नीरा आर्या यांचा २६ जुलै १९९८ मृत्यू झाला. लेखिका फरहाना ताज लिखित First Lady Spy Of INA: Neera Arya- Espionage and Heroism in the INA पुस्तकार निरा आर्या यांच्या संघर्षाची कहाणी मांडली आहे. आता यावर आधारित सिनेमा येत असल्याने नीरा यांच्या त्यागाची कथा संपूर्ण जगाला समजेल यात शंका नाही.