म्यानमार या दक्षिण आशियायी देशामध्ये गेल्या अनेक वर्षापासून गृहयुद्ध सुरु आहे. बर्मा, ब्रह्मदेश असे नाव असलेल्या या म्यानमारच्या राजधानीचे नाव यांगून आहे. याच राजधानीचे पूर्वीचे नाव रंगून असे होते. या रंगून शहरावरुन भारतीय हिंदी चित्रपटांमधील गाणी लिहिली आहेत. मात्र आता हे रंगून किंवा यांगून शहर आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होत आहे. किंबहुना कुप्रसिद्ध होत आहे. ही गोष्ट म्हणजे, या शहरात वाढत असलेला वेश्या व्यवसाय. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या वेश्या व्यवसायात येथील अनेक सुशिक्षित महिला नाईलाजानं सामिल झाल्याचे पुढे आले आहे. डॉक्टर, शिक्षक असलेल्या या महिला आपल्या कुटुंबाची गरज भागवण्यासाठी आपल्या शरीराचा सौदा करीत आहेत. गेले अनेक वर्ष गृहयुद्धानं पोखरलेल्या म्यानमारची अर्थव्यवस्था पार तळाला गेली आहे. येथील सर्वसामान्यांचे जीवन उद्धवस्त झाले आहे. या सर्वात भरडल्या जात आहेत त्या तेथील महिला. म्यानमारमधील महिलांचे वास्तव हे अतिशय भयाण आहे. दक्षिण आशियायी देश म्हणून ओळखल्या जाणा-या म्यानमारची सध्याची ओळख लज्जास्पद अशीच आहे. (Myanmar)
भारताच्या या शेजारी देशातील डॉक्टर, नर्स, शिक्षिका असलेल्या महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे. या मागे आहे, म्यानमारमधील गृहयुद्ध. फेब्रुवारी 2021 मध्ये, म्यानमारमध्ये सैन्याचे बंड झाले. या सैन्यानं येथील सरकारला पाडून स्वतः सत्ता काबीज केली आणि म्यानमारची दुर्दशा सुरु झाली. आधीच या देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होती. त्यात सैन्याच्या बंडात त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या सर्वात कोविडचा धोका मोठा होता. या महामारीमध्ये येथील बाजारात गरजेच्या वस्तूही सोन्याच्या दरात विकल्या जाऊ लागल्या. महागाईनं कळस गाठला. आता परिस्थिती अशी आहे की, येथील बहुतांश सर्वसामान्यांना आपले घर चालवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. यात महिलांचे शोषण अधिक झाले आहे. येथील अनेक महिलांनी दुस-या देशात जाऊन स्वतःच्या शरीराचा सौदा करुन आपल्या कुटुंबियांना पैसे पाठवायला सुरुवात केली. मात्र ज्या महिलांना हे शक्य झाले नाही, त्यांनी आपल्याच शहरात राहून वेशाव्यवसायात स्वतःला ढकलून दिले आहे. दुर्दैवानं म्हणजे यात अनेक सुशिक्षित महिलांचा अधिक भरणा आहे. अगदी डॉक्टर, प्रोफेसर असलेल्या महिलाही या व्यवसायात असून स्वतःला डेट गर्ल्स म्हणवून घेत आहेत. (International News)
म्यानमार हा देश आर्थिक डबघाईला आलेला देश आहे. येथील उद्योगव्यवसाय ठप्प आहेत. अनेक कारखान्यांना वीजपुरवठा होत नसल्यानं नाईलाजानं टाळे लावण्याची वेळ आली आहे. अशावेळी हजारो कामगारांवर बेकार व्हायची वेळ आली. या सर्व कुटुंबापुढे रोज काय खावे हा मुख्य प्रश्न आहे. कारण म्यानमारचा महागाई दर वाढत आहे. यावर्षी 26 टक्क्यांनी यात भर पडली आहे. शिवाय अवकाळी पावसानं शेतीचेही मोठे नुकसान केल्यामुळे अन्नधान्याचे दरही आभाळाला टेकलेले आहेत. अशावेळी आपल्या मुलांचे पोट भरण्यासाठी महिला या डेट गर्ल्स नावाच्या चक्रात सापडल्या आहेत. यातील अनेक महिलांच्या पतीचे निधन गृहयुद्धात झाले आहे. देशात कुठलीही रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजानं त्या वेश्याव्यवसायात आल्या आहेत. (Myanmar)
=======
हे देखील वाचा : सर्वशक्तीमान देशातील नागरिक भीतीखाली !
======
म्यानमारमध्ये चालू असलेले गृहयुद्ध हे बर्मी स्प्रिंग रिव्होल्यूशन, बर्मी सिव्हिल वॉर किंवा पीपल्स डिफेन्सिव्ह वॉर या नावानेही ओळखले जात आहे. 2021 च्या लष्करी उठावानंतर म्यानमारची परिस्थिती बदलली. मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. यात म्यानमारमधील कापड उद्योगाला सर्वाधिक फटका बसला. अनेक कापडमील बंद झाल्या. ज्या मील चालू राहिल्या, त्यांना पुरेसा विजेचा पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे करोडो रुपये खर्चून उभारलेले कारखानं बंद करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली. या व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला, त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. शिवाय या कारखान्यातील हजारो कारगार देशोधडीला लागले. एकाचवेळी असे हजारो कामगार बेरोजगार झाल्यामुळे अनेकांनी आपले जिवन संपवणे पसंत केले. मार्च 2023 पर्यंत, युनायटेड नेशन्सच्या अंदाजानुसार म्यानमारमधील 17.6 दशलक्ष लोकांना फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या सत्तापालटानंतर मानवतावादी मदतीची गरज आहे. येथील 1.6 दशलक्ष नागरिक विस्थापिकांचे जीणे जगत आहेत. म्यानमारच्या 55,000 हून अधिक नागरी इमारती नष्ट झाल्या असून 40,000 पेक्षा जास्त नागरिक बांगलादेश, भारत आणि थायलंड या शेजारील देशांच्या आश्रयाला गेले आहेत. (International News)
सई बने