मुंबई (Mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यासोबत मुंबई ही खवय्यांची राजधानीही आहे. मुंबईमध्ये जगातील सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. पण या सर्वांतही मुंबईमध्ये खवय्ये येतात ते येथील मासे खाण्यासाठी. मुंबईच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते. हे ताजे मासे खरेदी करण्यासाठी येथील मासेमारी केंद्रांवर मोठी गर्दी होते. अगदी सामान्य मासेप्रेमींसोबत मोठ्या हॉटेल चालकांचीही येथील डॉकयार्डवर गर्दी असते. साध्या जवळ्यापासून हातभार लांब असलेल्या सुरमईपर्यंत मासे येथे उपलब्ध असतात. (Mumbai)
मुंबईच्या किना-यावर होणा-या या मासेमारीमुळे हजारोंना रोजगार उपलब्धही झाला आहे. मात्र सध्या याच मासेमारीवर हवामानाचा परिणाम झाला आहे. मुंबईच्या समुद्रावर धुक्याची चादर पसरल्यानं या समुद्रीतील मासे हे दूरवर गेले आहेत. परिणामी मासेमारी करणा-या बोटीही किना-यापासून दूर जाऊन मासेमारी करीत आहेत. या सर्वांचा परिणाम खवय्यांच्या खिशावर होणार आहे. कारण या सर्व बोटी लांब जात असल्यामुळे त्यातील इंधनाची मात्रा वाढत आहे. मासे पकडण्यासाठी कालावधी जात आहे. तसाच कालावधी मासेमारी करणा-या बोटी डॉर्कयार्डवर येण्यासाठी लागत आहे. (Latest Updates)
समुद्रकिनारा गाठेपर्यंत मासे चांगले रहावे, यासाठी मोठ्या प्रमाणात बर्फाचा आधार घेतला जात, त्यामुळे त्याचाही अतिरिक्त भार माशांच्या किंमतीवर पडत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर मासे अधिक दूर जाण्याची भीती मासेमारांनी व्यक्त केली आहे. या सर्वांमुळे माशाच्या किंमती आभाळाला लागल्या आहेत. मुंबईच्या समुद्रात पापलेट, सुरमई, बोंबिल, कोलंबी यासारखे मासे मोठ्या प्रमाणात मिळतात. मत्सप्रेमींसाठी हे मासे म्हणजे, मोठी मेजवानीच असते. मुंबईच्या समुद्रात मिळणारे मासे खरेदीसाठी मोठी झुंबड डॉकयार्ड भागात असते. पहाटे मासेमारीला गेलेल्या बोटी परत येतात, आणि त्यानंतर अगदी घरगुती वापरासाठी मासे खरेदी करणारे ग्राहक ते हॉटेलसाठी मोठ्या प्रमाणात मासे खरेदी करणारे ग्राहक यांची गर्दी असते. (Mumbai)
पण गेल्या काही दिवसांपासून या बोटी येण्यास बराच उशीर होत आहे. त्याला कारण ठरले आहे, ते मुंबईच्या समुद्रावर पसरलेले धुके. मुंबईच्या समुद्र किना-यापासून 200 किमी दूर मासे दूर गेले आहे. याला हवामानातील झालेला मोठा बदल कारणीभूत ठरला आहे. सध्या मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात धुके आहे. थोडीफार थंडीही जाणवत आहे. असेच धुके समुद्र किना-यावरही आहे. धुके आणि हवामानामुळे या किना-यावरील माशांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे मुंबईतील मच्छिमारांना मासेमारी करण्यासाठी समुद्रात दूरवर जावे लागत आहे. या मासेमारी करणा-या अनेक बोटी डिझेलवर चालतात. मासे पकडण्य़ासाठी आता या मासेमारांना किमान 200 किमी अधिक दूर जावे लागत आहे. यासाठी त्यांना अतिरिक्त डिझेल वापराले लागत आहे. (Latest Updates)
तसेच परत येतांनाही त्यांना जास्त वेळ लागत असल्यानं मासे खराब होऊ नयेत म्हणून बर्फाचा वापर स्टोअरेजसाठी करावा लागत आहे. या दोघांच्याही किंमतीचा भार माश्यांच्या किंमतीमध्ये जमा झाल्यानं माशांचे दर वाढले आहेत. मुंबईच्या समुद्रात बोंबिल हा मासा सर्वाधिक आढळतो. त्यामुळेच त्याला बॉम्बे डक असेही नाव पडले आहे. हा मासा पकडण्यासाठीही आता मासेमारांना 200 किमी दूर जावे लागत आहे. त्यामुळे सर्वाधिक खाल्ला जाणारा आणि अगदी कमी किंमतीत मिळणा-या या बोंबिल माशाच्या किंमतही सध्या मोठी वाढ झाली आहे. येथील वर्सोवा जेट्टीवरही मोठ्या प्रमाणात मासे खरेदीसाठी खवय्यांची गर्दी होते. पण येथील समुद्रातही सुमारे 185 किमी अंतराच्याही पुढे जाऊन मासेमारी करावी लागत असल्याची खंत मासेमारांनी व्यक्त केली. (Mumbai)
====================
हे देखील वाचा :
New Year : 2025 होरपळून काढणार !
Prayagraj : कठोर कायदे पाळणारा श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा
====================
मुंबईच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्राच्या विस्तीर्ण पसरलेल्या भागात धुके पसरले आहे. या धुक्यामुळे मासे किनाऱ्याजवळील 15-20 सागरी मैलांच्या त्यांच्या सामान्य श्रेणीतून बाहेर पडून उष्ण पाण्याच्या दिशेने गेले आहेत. यासंदर्भात हवामान खात्यानंही माहिती दिली असून, त्यानुसार पूर्वेकडील वाऱ्यांमुळे मुंबईतील धुके समुद्राकडे झेपावले आहे. धुके सध्या किनाऱ्यापासून 450 नॉटिकल मैल पसरले आहे. धुक्यामुळे मासेमारीच्या जहाजांची दृश्यमानता 2 किमीपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे मासेमारांना लांबवर जावे लागत आहे. या सर्वांचा परिणार माशांच्या किंमतीवर झाला असून पुढचे काही दिवस हे धुके असेच रहाणार असल्याची माहिती आहे. (Latest Updates)
सई बने