हुमायू यांचा मृत्यू जेव्हा पुत्र अकबर याचे वय कमी होते तेव्हा झाला. लहानपणापासून ते तरुण वयापर्यंत अकबरला दोन व्यक्तींशी अधिक भावनिक आपुलकी होती. ज्यामध्ये पहिली व्यक्ती म्हणजे बैरम खा. ज्याने मुघल बादशाह हुमायू यांच्या मृत्यूनंतर सल्तनत वाचवली आणि अकबरचे पालपोषण केले. दुसरे म्हणजे माहम अंगा. त्यांनी अकबरची काळजी घेतली. त्या अकबरच्या दाई मा होत्या. माहम अकबर यांच्या काळात मुघल सल्तनतच्या राजकीय सल्लागार सुद्धा राहिल्या. पती नदीम खान याच्या मृत्यूनंतर त्यांनी पूर्ण लक्ष हे अकबरच्या पालनपोषणावर दिले. (Mughal History)
हुमायूच्या मृत्यूनंतर बैरम खा यांनी मुघल सल्तनला वाचवले आणि माहम यांनी अकबराचे पालनपोषण केले. मात्र या दोघांमध्ये कधीच जुळले नाही. बैरम खान यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हिस्साची ताकद ही माहम यांना मिळाली. अशा प्रकारे माहम त्या दरम्यान सर्वाधिक ताकदवान महिला बनल्या.
मुघल सल्तनत सोबत कशा पद्धतीने जोडल्या गेल्या अंगा?
एका रिपोर्ट्सनुसार, माहम अंगा या विचार करण्यात तरबेज होत्याच पण त्या चालाख ही होत्या. शेरशाह सुरी येथून चौसा आणि कन्नोजच्या युद्धात पराभव झाल्यानंतर बादशाह हुमायूला सल्तनत सोडून पळावे लागले होते. बादशाहाने आधी सिंध मध्ये आश्रय घेतला आणि नंतर पर्शियाकडे वळला. येथे त्याची दाई मा चा मुलगा नदीम खान कुका त्याची देखरेख करु लागला होता. नदीम यांच्या पत्नीचे नाव होते माहम अंगा. नदीम याच्या मृत्यूनंतर माहम आणि तिची दोन्ही मुलं अधम आणि कुली खआन हुमायू सोबत राहू लागले.
अकबर मात्र तीन वर्षांचा होता जेव्हा त्याचे काका कामरान मिर्जा यांना बंदी केले गेले. हुमायूच्या विरोधातील युद्धात कामरान यांना काबुल किल्ल्याच्या लढाईत अकबरचा वापर ढाल म्हणून केला. जेणेकरुन हुमायू आपल्या तोफांना आग लावणार नाही. माहम अंगा यांनी घटनास्थळी पोहचत अकबर याचा जीव वाचवला. ऐवढेच नव्हे तर माहम यांनी एकदा का हुमायूचा जीव वाचवला होता आणि अशा प्रकारे त्या मुघल परिवाराच्या जवळ आल्या होत्याय
आपल्या मुलाला दिले मोठे पद
मुघल सल्तनतला वाचवणारे बैरम खान यांच्या मृत्यूनंतर माहम अंगा अधिक ताकदवान झाल्या. त्यांनी आपला मुलगा अधम खान आपल्या अनुयायांच्यासोबत आला आणि दरबारात बसलेला अतागा खान याला ठार केले. या घटनेमुळे नाराजा अकबरने अधमला १० फूट उंच इमारतीवरुन फेकण्याचे आदेश दिले. अकबराने ही बातमी स्वत: माहम अंगाला दिली होती. याच्या काही काळानंतर माहम यांचा मृत्यू झाला. (Mughal History)
हे देखील वाचा- मुघलांच्या इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली किन्नर, ज्याच्या मृत्यूवेळी बेगमने आभूषण ही काढली
अकबरने त्यांच्या आठवणीत बनवला मकबरा
अकबरने माहम अंगा आणि त्यांचा मुलगा अधम खान यांना दफन करण्यासाठी एका मकबऱ्याची निर्मिती करण्याचे आदेश दिले. याला अधम खानच्या मकबराच्या रुपात ओळखले जाते. तो महरौली स्थित कुतुब मीनरच्या उत्तरेला आहे. १८३० मध्ये एक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मकबऱ्याला आपले निवास स्थान बनवले आणि कबरी हटवण्यात आली. त्यानंतर त्याचा वापर पोलीस स्थानक आणि डाकघरासाठी केला गेला.