Home » क्रिएटिव्ह लोकांमधील मूड डिसऑर्डरची ‘ही’ आहेत कारणे

क्रिएटिव्ह लोकांमधील मूड डिसऑर्डरची ‘ही’ आहेत कारणे

असे मानले जाते की, जी लोक क्रिएटिव्ह असतात त्यांना अधिक मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचसोबत अशा लोकांमध्ये डिप्रेशन, बाइपोलर डिसऑर्डर होण्याची समस्या अधिक असते.

by Team Gajawaja
0 comment
Mood disorder
Share

असे मानले जाते की, जी लोक क्रिएटिव्ह असतात त्यांना अधिक मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचसोबत अशा लोकांमध्ये डिप्रेशन, बाइपोलर डिसऑर्डर होण्याची समस्या अधिक असते. काही प्रसिद्ध कलाकार, लेखक, संगीतकार यांच्यामध्ये मानसिक आरोग्यासंबंधित समस्या दिसून आल्या आहे आहेत. सर्वच क्रिएटिव्ह लोकांमध्ये मूड डिसऑर्डरची समस्या दिसून येत नाही. पण ही समस्या अनुवांशिक, पर्यावरण, व्यक्तिगत आणि आयुष्यातील अनुभवांच्या विविध कारणांमुळे प्रभावित होते. (Mood disorder)

मूड डिसऑर्डरची कारणे काय आहेत?
-ओव्हरथिंक करणे
क्रिएटिव्ह लोकांमध्ये पुढील काही लक्षणे दिसून येतात. जसे की, वेगवेगळे विचार, अनुभवांप्रति मत, काही मानसिक आरोग्यासंबंधित काही समस्या. पण अशा व्यक्ती खुप ओव्हरथिंक करतात. त्यामुळेच त्यांच्यामध्ये मूड स्विंग्स होत राहतात.

What Is Seasonal Affective Disorder (SAD)? – Forbes Health

-न्युरोबायोलॉजिकल सुद्धा आहे कारण
क्रिएटिव्ह आणि मानसिक आरोग्यासंबंधित समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये न्युरोबायोलॉजिकल हे सुद्धा एक कारण असू शकते. क्रिएटिव्हमध्ये असणारे न्युरोट्रांसमीटर आणि मस्तिक संरचना मानसिक आरोग्याच्या विकारांचा सामना करत असलेल्या व्यक्तींमध्ये ओव्हरलॅप होऊ शकतो.

-अन्य काही कारणे
अन्य काही कारणे जसे की, बालपणातील प्रतिकूल परिस्थिती, वाईट अनुभव, मानसिक आरोग्य ढासळत राहणे. तर प्रतिकूल परिस्थितीत क्रिएटिव्ह लोक काहीतरी विचार करू शकतात. पण मानसिक आरोग्याला याचा फटका बसू शकतो.

जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर मेंटल हेल्थसाठी पुढील उपाय करू शकता
-पुरेशी झोप घ्या
नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि संतुलित आहारासारख्या गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही मानसिक हेल्थला प्राथमिकता द्या. अशा काही गोष्टींमध्ये सहभागी व्हा ज्यामध्ये तुम्हाला आराम आणि तणाव कमी होईल. जसे की, माइंडफुलनेस किंवा मेडिटेशन. (Mood disorder)

-स्वत:ला आइसोलेटेड करू नका
मित्र,परिवार आणि मानसिक आरोग्यासंबंधित एक्सपर्ट्सशी बोलू शकता. मानसिक हेल्थची काळजी घेण्यासाठी आपले इमोशन्स आणि आव्हानांबद्दल एखाद्याशी उघडपणे बोलणे अत्यंत गरजेचे असते.

-स्ट्रेस मॅनेजमेंटची पद्धत
तणावापासून दूर राहण्यासाठीच्या काही टेक्निक्स शिकून घ्या. याव्यतिरिक्त जर तुम्ही दीर्घकाळ मानसिक तणावाखाली असाल तर एक्सपर्ट्सची मदत घ्या.


हेही वाचा- खाल्ल्यानंतर लगेच झोपत असाल तर वेळीच व्हा सावध


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.