पावसाळ्यात ह्युमिडिटी वाढली जाते. त्यामुळे मधेच गरम होते तर कधी थंडी वाजते. अशातच आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा या अशा वातावरणामुळे प्रभावित होते. लहान मुलं असो किंवा घरातील वयस्कर व्यक्ती, प्रत्येकाला पावसाळ्यात काळजी घ्यावीच लागते. त्यामुळे पावसाळ्यात योग्य डाएटकडे लक्ष दिले नाही आणि शिळं अन्न सतत खात राहिले तर आरोग्याला नुकसान पोहचू शकते. (Monsoon health tips)
खरंतर पावसाळ्यात जंक फूड खाऊ नयेत असा सल्ला दिला जातो. कारण याच्या माध्यमातून बॅक्टेरिया तुमच्या शरिरात जाण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाऊ नयेत हेच पाहूयात.
-सलादसाठी कच्च्या भाज्या
डाएट करणाऱ्या लोकांमध्ये सलाद आवर्जुन खाल्ले जाते. अशातच ते भरपूर प्रमाणात खाल्ले जाते. यामध्ये काही अशा भाज्यांचा समावेश केला जातो ज्यामधून तुमच्या शरिराला पोषक तत्व मिळतात. परंतु पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे पावसाळ्यात सलादसाठी कच्च्या भाज्या खाणे टाळा.
-मशरूम
पावसाळ्ययात मशरूम सु्द्धा खाऊ नयेत असा सल्ला दिला जातो. खरंतर मशरूम हे एक प्रकारचे फंगस असते, जे मातीत उगवते. अशातच मशरूम मध्ये पावसाळ्यात अधिक बॅक्टेरिया असण्याची शक्यता असते. याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.
-हिरव्या भाज्या
हेल्दी राहण्यासाठी नेहमीच हिरव्या भाज्या खाल्ल्या जातात. मात्र पावसाळ्यात खाऊ नयेत. यामागील कारण म्हणजे किटक. पावसाळ्यात हिरव्या भाज्यांमध्ये किटक वाढले जातात. त्यामुळे जरी तुम्हाला त्या खायच्या असतील तर स्वच्छ धुवून खा. (Monsoon health tips)
तसेच डेयरी प्रोक्ट्स मध्ये दही हे पोषक तत्वयुक्त मानले जाते. ते आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र पावसाळ्यात दही खाणे टाळले पाहिजे. दह्याचे पावसाळ्यात सेवन केल्याने सर्दी-खोकला होऊ शकतो. या व्यतिरिक्त पावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ, जंक फूड खाणे टाळा.
हेही वाचा- पावसाळ्यात अशी घ्या स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी
पावसाळ्यात असा ठेवा तुमचा डाएट प्लॅन
-पावसाळ्यात नाश्तासाठी तुम्ही तळलेले पदार्थ अजिबात खाऊ नका. तुम्ही हेल्दी फूडसह दिवसाची सुरुवात करा. यावेळी तुम्ही पोहे,उपमा, पराठे असं खाऊ शकता. त्याचसोबत ब्लॅकटी किंवा ब्लॅक कॉफी प्या.
-दुपारच्या जेवणासाठी तुम्ही पचनाला हलके असे पदार्थ खा. हाय प्रोटीन डाएट किंवा अधिक तेलकट पदार्थ खाऊ नका. त्याऐवजी मूग, मसूरची डाळ, हिरव्या भाज्या किंवा सलाद खा.
-रात्री जेवणासाठी तुम्ही हलका आहार घ्या. जसे की, सूप, खिचडी असे.