Milk Powder Disadvantages : नवजात बाळासाठी आईचेच दूध सर्वाधिक बेस्ट असते. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात किंवा अन्य काही कारणांमुळे मुलांना पावडरचे दूध दिले जाते. भले पावडर दूधामुळे काम सोपे होत असेल. पण याचे काही नुकसानही आहेत. खरंतर पावडर दूधासंदर्भातील एक मोठे अपडेट समोर आले आहे. मुलांसाठी तयार केल्या जाणाऱ्या पावडर दूधाची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय जे गाइडलाइन्स फॉलो करणार नाहीत त्यांच्या विरोधात पावले उचलली जाणार आहेत.
पावडर दूधासंबंधित सरकार कठोर
सरकारकडून पावडर दूधासंदर्भातील अपडेट जारी करण्यात आला आहे. सरकारने म्हटले आहे की, पावडर दूधाबद्दलच्या काही गाइडलाइन्स फॉलो केल्या नाहीत तर कंपनीच्या विरोधात कठोर पावले उचलली जाऊ शकता. सूत्रांनुसार कार्ब्साठी यामध्ये लॅक्टोज आणि ग्लुकोज असणे अनिवार्य आहेय. याशिवाय दूधात फ्रुक्टोज नसावे. फ्रुक्टोज कार्बोहाइड्रेट्ससाठी पावडर दूधात मिक्स केले जातात. याचे प्रमाण 20 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे. खरंतर नेस्ले इंडियाच्या प्रोडक्ट्समध्ये साखर वापरल्यानंतर हे नवे अपडेट समोर आले आहे. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, पावडर दूधाएवजी आईचेच दूध बेस्ट आहे. याशिवाय पावडर दूधावेळी हाइजिनचा प्रश्नही उपस्थितीत राहतो. (Milk Powder Disadvantages)
चुकूनही करू नका ही गोष्ट
हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, आईने बाळाला दूध देताना आपले हात स्वच्छ करावेत. बहुतांश महिला हात स्वच्छ करत नाहीत. अशातच मुलांना इंफेक्शन होण्याचा धोका वाढला जातो. याव्यतिरिक्त ज्या बॉटलमध्ये दूध भरले जाते ती व्यवस्थितीत स्वच्छ न केल्यासही बाळाच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे, पावडर दूध गरम केल्यानंतर लगेच मुलांना प्यायला द्या. ते माइक्रोवेवमध्येही गरम करू नका.