वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि एसव्ही रोडने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास शनिवार संध्याकाळपासून आरामदायी होणार आहे. कारण मेट्रो ७ आणि मेट्रो २ ए सेवेची सुरुवात गुढीपाडवाच्या दिवशी म्हणजे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी दर ११ मिनिटांच्या अंतराने मेट्रो सेवा उपलब्ध असेल.
कॉरिडॉरच्या आरे आणि डहाणूकरवाडी स्थानकादरम्यान दररोज १५० मेट्रो फेऱ्या असतील. एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी दिलेल्या माहितीनुसार, डहाणूकरवाडीहून पहिली ट्रेन सकाळी ६ वाजता आणि आरेहून पहिली ट्रेन सकाळी ६.३० वाजता सुटेल. डहाणूकरवाडीहून शेवटची गाडी रात्री ९ वाजता सुटेल, तर आरेहून शेवटची गाडी रात्री ९.३५ वाजता सुटेल काही दिवसांनी सेवेची वेळ वाढवली जाईल.
मेक इन इंडिया अंतर्गत देशात बांधलेली ११ मेट्रो मुंबईत पोहोचली आहेत. यापैकी १० गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी वापरल्या जाणार आहेत, तर एक ट्रेन आपत्कालीन स्थितीसाठी ठेवण्यात येणार आहे.
=====
हे देखील वाचा: नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सीएनजी-पीएनजीच्या किमतीत घट
=====
मेट्रोच्या प्रवाशांना अपघातांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी मेट्रो प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म स्क्रीनचे दरवाजे बसवण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्मवर मेट्रो थांबल्यानंतरच प्लॅटफॉर्म स्क्रीनचा दरवाजा उघडेल.
दिव्यांग प्रवाशांचा मार्ग सुकर करण्यासाठी प्रत्येक स्थानकावर स्वतंत्र पॅसेज आणि व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक स्थानकावर प्रथमोपचाराची सुविधाही उपलब्ध असेल.
महिला प्रवाशांची सोय लक्षात घेऊन प्रत्येक ट्रेनमध्ये दोन डबे महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. मेट्रोचा पहिला आणि शेवटचा डबा महिला स्पेशल असेल. मेट्रोला हायटेक करण्यासाठी एमएमआरडीएने ड्रायव्हरशिवाय ट्रेन धावण्याची संधी दिली आहे.
एमएमआरडीएच्या आयुक्तांच्या म्हणण्यानुसार या मार्गावर धावणारे मेट्रोचे डबे हे जगातील सर्वात आधुनिक डब्यांपैकी एक आहेत. देशात ड्रायव्हरशिवाय गाड्या धावत नाहीत.
यामुळे गाडी चालकाशिवाय धावत असल्यास प्रवासी घाबरू शकतात. प्रवाशांची ही भीती पाहता दोन ते तीन महिने चालकासह ही गाडी चालवली जाणार आहे. यानंतर ट्रेन पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या मदतीने चालवली जाईल.
====
हे देखील वाचा: नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
====
CRS ने मेट्रो ७ आणि मेट्रो 2 ए कॉरिडॉरच्या फक्त २०.७३ किमीवर सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या अंतर्गत मेट्रो ७ मधील १० स्थानके आणि मेट्रो २ ए च्या ९ स्थानकांदरम्यान मेट्रो धावणार आहे.