वैवाहिक आयुष्यात काही प्रकारच्या समस्या येतात. मात्र जे कपल्स अशा स्थितीवर मात करून पुढे जातात त्यांना यश नक्कीच मिळते. प्रेम, विश्वासासह समजूतदारपणाने वागले तर तुम्ही वैवाहिक आयुष्यात आनंदी राहू शकता.लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज नाते दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. त्याचसोबत पार्टनरमध्ये संवाद ही असणे अत्यंत गरजेचे आहे. (Married life tips)
जर तुम्हाला पार्टनरची एखादी गोष्ट समजत नसेल तर प्रयत्न करा की, त्यावर ऑप्शन काय आहे. अथवा एखाद्या मित्राची मदत घ्या. अथवा बेस्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही थेट पार्टनरशी बोलून समजून घेण्याचा प्रयत्न करा. अशाप्रकारे तुमच्या नात्यात तिसरा व्यक्ती येणार नाही. त्याचसोबत नात्यात दूरावा वाढला जाणार नाही.
तुम्हाला वाटत असेल लग्न झाल्यानंतर असे वाटत असेल की, तुमच्या सर्व जबाबदाऱ्या आपल्या नात्यासोबत संपल्या आहेत तर असे अझिबात नाही. मॅरिड लाइफ आनंदी बनवायचे असेल तर पार्टनरला आपल्या नात्याला अधिक मजबूत होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कपल्सला हे कळले पाहिजे क्वालिटी टाइम एकत्रित घालवल्याने एकमेकांच्या भावना समजून घेण्यास फार मदत होते.
या व्यतिरिक्त नवरा-बायकोच्या नात्यात असे पहायला मिळते की, आपल्या चुकीचे खापर दुसऱ्या पार्टनरवर फोडले जाते. त्यामुळे नात्यात वाद वाढू लागतात. तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, जर तुमच्याकडून एखादी चूक झाली असेल तर ती मान्य करा आणि चूक स्विकारा.जेणेकरुन तुम्ही खरेपणाने वागत आहात असे वाटेल.
त्याचसोबत एकमेकांनी एकमेकांना सन्मान देणे ही गरजेचे आहे. पार्टनरच्या यशावर आनंदीत होणे आणि त्याची प्रशंसा करणे सुद्धा तुम्ही त्याचा सन्मान करत आहात हे दाखवून देते. परंतु जेव्हा रागात असाल तेव्हा सुद्धा सर्वांसमर पार्टनरला बोलण्याऐवजी एकट्यात बोलू शकता. (Married life tips)
प्रत्येकाचे आयुष्य हे वेगळे असते हे कपलने समजून घेतले पाहिजे. एकमेकांचे वैवाहिक आयुष्य समान नसते. त्यामुळे आपल्या खासगी आयुष्याबद्दल सोशल मीडियात बोलणे टाळा. असे करणे तुमच्या दुसऱ्या पार्टनरला आवडणार नाही. याचा कुठे ना कुठेतरी तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. प्रत्येकाची विचार, वागणे ही वेगळे असते. त्यामुळे दुसऱ्या कपलसोबत तुम्ही तुमचे नाते कंम्पेअर करू नका. तरच तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी राहू शकता.
हेही वाचा- नात्यात दुरावा वाढवतोय… मिसिंग टाइम्स सिंड्रोम