प्रभू श्रीराम हे नाव तमाम भारतीयांच्या ह्दयात आहे. प्रभू श्रीरामांच्या नावानं असलेली प्रत्येक वस्तू रामभक्तांना प्रिय आहे. त्यापैकीच एक म्हणजे, रामसेतू. श्री रामांनी लंकेमध्ये जाण्यासाठी जो मार्ग केला, जो पूल तयार केला त्याला रामसेतू असे म्हणतात. रामायणामध्ये या रामसेतूचा उल्लेख आहे. लंकेचा शासक रावणापासून माता सीतेला सोडवण्यासाठी प्रभू श्रीरामांनी लंकेवर आक्रमण केले, ते याच रामसेतूच्या सहाय्यानं. रामसेतूवरुन वानर सेना घेऊन प्रभूरामांनी रावणाचा पराभव केला. नल आणि नील यांनी पाण्यात तरंगणाऱ्या दगडांचा वापर करून हा पूल बांधण्यात आल्याची माहिती वाल्मिकी रामायणात आहे. (Ram Setu)
तामिळनाडूतील धनुषकोडी ते श्रीलंकेपर्यंत बांधलेल्या या पुलाचा अनेक आख्यायिका आहेत. कालांतरानं हा पूल समुद्रात सामावून गेला. हजारो वर्षापूर्वी तयार झालेल्या या पूलाला त्सुनामीचा फटका बसला आणि तो समुद्रात सामावून गेला. मात्र या पुलाचे अवशेष अद्यापही आहेत. रामायणात या पुलाची लांबी १०० योजने आणि रुंदी १० योजने सांगितली आहे.
मात्र नंतरच्या काळात हाच रामसेतू वादाचे कारण ठरला. रामायण हे काल्पनिक ठरवून रामसेतूलाही काल्पनिक पूल असे संबोधण्यात आले. यासंदर्भात काही वर्षापूर्वी अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासानं रामसेतूचे संशोधन करुन असा पूल तयार झाल्याचे सांगितले होते. मात्र आता या सर्वांवर एक मोठा सबळ पुरावा आपल्या इस्रो या अंतराळ संस्थेनं दिला आहे. (Ram Setu)
इस्रोच्या संशोधकांनी रामसेतूचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या संशोधकांनी रामसेतूचा समुद्राखालचा नकाशा तयार केला असून त्यातून रामसेतू कधी बांधला गेला याचे रहस्य उलगणार आहे. अशाप्रकारी समुद्राखाली तयार झालेला हा रामसेतूचा पहिलाच नकाशा आहे. काही दिवसापूर्वी समुद्राखालील राम सेतूचा पहिला नकाशा इस्रोच्या वैज्ञानिकांनी जाहीर केला आहे. इस्रोने नासाच्या ICESat-2 उपग्रहाकडून आलेल्या माहितीच्या मदतीने राम सेतूचा पहिला समुद्राखालील नकाशा तयार केला आहे. हा पूल भारतातील रामेश्वरम आणि श्रीलंकेच्या मन्नार बेटाच्या दरम्यान आहे. सद्यपरिस्थितीत या पुलाचा ९९.८ टक्के भाग समुद्राखाली बुडालेला आहे.
याच पुलाला श्रीलंकेमध्ये ॲडम्स ब्रिज म्हणून ओळखला जाते. रामसेतू असल्याचा विरोध कऱणारे ही एक समुद्रात तयार झालेली नैसर्गिक रचना असल्याचे सांगतात. त्यांना इस्रोच्या या नव्या संशोधनामुळे शास्त्रीय उत्तर मिळाले आहे. इस्रोने ज्या पुलाचा नकाशा तयार केला आहे, तो पूल भारतातील तामिळनाडूच्या धनुषकोडी ते श्रीलंकेतील तलाईमन्नार बेटापर्यंत पसरलेला आहे. इस्रोच्या जोधपूर आणि हैदराबाद नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर्समधील संशोधकांनी नासा उपग्रह ICESat-2 सह हा नकाशा तयार केला आहे. (Ram Setu)
त्यासाठी त्यांनी समुद्राच्या तळापासून लेझर बीम्स उचलले तेव्हा या पुलाचा ९९ टक्के भाग उथळ पाण्यात बुडाल्याचे आढळले. शास्त्रज्ञांनी पुलाच्या खाली २ ते ३ मीटर खोल असलेल्या ११ अरुंद नाल्यांचे निरीक्षण केले. या सर्व अभ्यासातून संशोधकांनी तयार केलेला नकाशा हा रेल्वेच्या बोगी इतका मोठा आहे. या नकाशानुसार २९ किलोमीटर लांबीच्या राम सेतूची समुद्रसपाटीपासून उंची ८ मीटर इतकी आहे.
या संशोधकांच्या मते हा पूल एकेकाळी भारत आणि श्रीलंकेला जोडत होता. दोन्ही बाजूंनी सुमारे १.५ किमीचा पट्टा अत्यंत उथळ पाण्यात अचानक खोलवर पसरलेला आहे. रामसेतूबाबत इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. (Ram Setu)
====================
हे देखील वाचा : स्पेस टुरिझममुळे आता पृथ्वी बाहेर ही फिरता येणार…
====================
रामसेतूबाबत अनेकवेळा वाद झाले आहेत. मात्र रामभक्त या सेतूला प्रभू रामांची निशाणी मानतात. तामिळनाडूच्या रामेश्वरमच्या मंदिरातील शिलालेखांमध्येही या रामसेतूचा उल्लेख आहे. यानुसार १४८० पर्यंत रामसेतू अस्तित्वात होता. त्याचा वापर दोन्ही देशातील नागरिक करीत असत. मात्र त्याच दरम्यान आलेल्या चक्रीवादळामुले हा सेतू पाण्याखाली गाडला गेला, असा उल्लेख या शिलालेखात आहे. रामसेतूवरुनच प्रभू राम आपली विशाल वानरसेना घेऊन लंकेत गेले. (Ram Setu)
याच पुलावरुन विजयी सेना परत आली. त्यांनी रामेश्वरच्या मंदिरात पुजा आणि होमहवन केले. या मंदिरापासून मग प्रभू श्रीराम पुष्पक विमानांच्या सहाय्यानंला गेल्याचा उल्लेखही आहे. आता इस्रोच्या संशोधनामुळे या रामसेतूबाबत पुष्टी झाली आहे. काही महिन्यापूर्वी असाच पूल भारत आणि श्रीलंका देशादरम्यान बांधण्यात येणार असल्याचे दोन्ही देशातील सरकारांनी सांगितले आहे.
सई बने