Home » समुद्राच्या पोटात समावणार मालदीव

समुद्राच्या पोटात समावणार मालदीव

by Team Gajawaja
0 comment
Maldives Islands
Share

हिंद महासागरातील हा बेटांचा देश धोक्यात आहे. मालदीवमध्ये थोडी थोडकी नव्हे तर 1,192 बेटे आहेत. यातील बराचश्या बेटांना जाण्यासाठी फक्त समुद्रावाटेच मार्ग आहे. मालदीव भर समुद्रात आहे आणि हाच समुद्र येथील अर्थव्यवस्थेचे मुळ आणि मुख्य स्त्रोत आहे. पण आता हा समुद्र मालदीवच्या अस्तित्वाला आव्हान देत आहे. जगभरातील समुद्राची पातळी वाढत असून समुद्रकाठावर असलेल्या शहरांना यामुळे धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र मालदीव सारखे देश भर समुद्रात आहेत. समुद्रानं चहुबाजुनं या देशाला विळखा घातला आहे. त्यामुळे हा संपूर्ण देशच एकदिवस समुद्राच्या पोटात जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. समुद्राची वाढती पातळी आणि जगभरातील भीषण वादळांमुळे किनारी भागांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. समुद्र किनाऱ्यावर वसलेले अनेक देश आणि शहरे नामशेष होण्याच्या धोका आहे. त्यात मालदीवचा क्रमांक पहिला लागणार अशी शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. (Maldives Islands)

समुद्रामध्ये वाढणारी पाण्याची पातळी आणि जगभरात येणा-या एकापेक्षा एक भीषण वादळांमुळे किनारी भागांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. समुद्र किनाऱ्यावर वसलेली शहरे समुद्र गिळंकृत करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यात भर समुद्रात असलेल्या देशांचाही समावेश आहे. त्यापैकी मालदीव हा देश अतीधोकायक स्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढत्या समुद्राच्या पातळीनं मालदीवमधील अनेक बेटांवर पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच समुद्रकिना-यावरील काही जमिन समुद्राच्या पाण्याखाली आली आहे. हे प्रमाण दिवसागणिक वाढत जाणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. (Maldives Islands)

गेल्या काही वर्षापासूनच मालदीवमध्ये समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मालदीव सरकार आपला देश वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. देशातील बेटांना वाचवण्यासाठी मालदीव सरकारनं अमेरिकन तंत्रज्ञान आणि शास्त्रज्ञांची मदत घेतली आहे. मालदीवच्या समुद्रकिना-यावरून वाळू काढून तिथे संरक्षक भिंत बांधण्याचे काम चालू करण्यात आले आहे. मालदीवमध्ये 1200 बेटे आहेत. यापैकी काही बेटांवर जाण्यासाठीही समुद्रातून मार्ग आहे. या बेटांवरही अशाच प्रकारे संरक्षक भिंती बांधण्याची सरकारची योजना आहे. त्यातून या बेटांवर पाण्याचे प्रमाण किती टक्के वाढले, याचा अंदाज बांधता येणार आहे. मालदीवमधील काही बेटांवर पर्यटकांसाठी मोठी हॉटेल उभारण्यात आली आहे. त्यात मोठी गुंतवणूक आहे. तसेच संपूर्ण मालदीवची अर्थव्यवस्थाच या समुद्रावर अवलंबून आहे. जर मालदीवमधील पर्यटकांची संख्या कमी झाली, तर या देशाची अर्थव्यवस्था पार कोलमडून जाणार आहे. त्यामुळे आपल्या देशात पर्यटकांना सुरक्षितता मिळावी म्हणूनही मालदीव सरकार आता या 1000 बेटांवर विशेष सुरक्षा भिंतींची निर्मिती करणार आहे. (Maldives Islands)

मालदीवचा समुद्र किनारा हा त्यातील पांढ-या वाळूसाठी आणि निळ्या रंगाच्या स्वच्छ पाण्यासाठी ओळखला जातो. मात्र आता याच पांढ-या वाळूची धूप मोठ्याप्रमाणात होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या समुद्रकिना-यावर झालेल्या बांधकामांनाही धोका निर्माण झाला आहे. मालदीवच्या मदतीला आलेले अमेरिकन शास्त्रज्ञ मातीची धूप कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे, शिवाय प्रवाळ खडकांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. कोरल हे नैसर्गिक समुद्राच्या भिंतींप्रमाणे काम करतात आणि समुद्राच्या लाटांची शक्ती कमी करतात. मालदीवमधील अनेक प्रवाळ खडकांचे पर्यटनाच्या नावाखाली आधीच खूप नुकसान झाले आहे. (Maldives Islands)

====================

हे देखील वाचा : जगातला सर्वात गरीब देश मंगळ ग्रहावर उतरणार होता !

====================

परंतु आता त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समुद्राच्या पाण्याला अडवण्यासाठी खारफुटीच्या झाडांचा मोठा उपयोग होतो. मालदीवमध्ये आता याच खारफुटीच्या झाडांची लागवड हाती घेण्यात आली आहे. खारफुटीच्या लागवडीतून जंगलांचे क्षेत्रफळ वाढवून मालदीवच्या किनारपट्टीचे संरक्षण करण्यात येणार आहे. आपल्या देशाला वाचवण्यासाठी मालदीवचे अध्यक्ष मुईज्जू यांनी अनेकवेळा आंतरराष्ट्रीय मंचावरुन साद घातली आहे. कारण मालदीवच्या संरक्षणासाठी असे कितीही प्रयत्न केले तरी त्यातून मालदीवचे काही वर्षांसाठी संरक्षण होणार आहे. मात्र हवामानातील बदल असेच होत राहिल्यास मालदीव हा देश जगाच्या नकाशातून गायब होणार आहे. त्यासाठी जागतिक हवामान सुधारणे हा एकच पर्याय आहे. यासाठी फक्त मालदीव नाही, तर सर्वच देशांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. (Maldives Islands)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.