प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये 40 करोड भाविक येण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या गर्दीत आपण मुक्काम कुठे करायचा असा प्रश्न महाकुंभमेळ्यात येणा-या भाविकांना मात्र पडणार नाही. कारण या कुंभमेळ्यामध्ये भव्य अशी टेंट सिटी उभारण्यात येत आहे. या टेंट सिटीमध्ये पंचतारांकित असे टेंटही असतील. अगदी दिड हजारापासून ते 35 हजारापर्यंत भाडे असणारे हे टेंट, कॉटेज भाविकांना ऑनलाईन बुक करण्याची व्यवस्था आहे. या टेंटमध्ये भाविकांना फाईव्हस्टार हॉटेलसारख्या सुविधा उपलब्ध असतील. प्रयागराजमध्ये येणा-या भाविकांना खाद्यपदार्थांपासून ते आरोग्यसुविधांपर्यंत सर्व सुविधा येथे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या कुंभमेळ्यात देशभरातील सर्व मान्यवर, सर्व राज्यांचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. उत्तरप्रदेश सरकारचे मंत्री या मान्यवरांना आमंत्रण देण्यासाठी देशभर दौरा करत आहेत. त्यामुळे या सर्व मान्यवरांची योग्य व्यवस्था होण्यासाठी ही टेंट नगरी सज्ज होत आहे. यामध्ये इंटरनेटचे मोठे जाळे उभारण्यात येत असून संपूर्ण महाकुंभमेळ्याचा आढावा येथे एकाच जागी बसून घेता येणार आहे. महाकुंभ 2025 साठी उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये टेंट सिटी तयार करण्यात येत आहे. यात चार प्रकार असून त्यांचे भाडे 1500 ते 35000 रुपये प्रतिदिन असणार आहे. या सर्वात फाईव्ह स्टार हॉटेल्ससारख्या सुविधा असणार आहेत. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना या तंबूंचे बुकींग ऑनलाईनही करता येणार आहे. 2000 हून अधिक स्विस कॉटेजचे तंबू शहर जत्रा परिसरातील अरेल भागात संगमजवळ उभारले जात आहे. (Mahakumbha)
ही टेंट सिटी यूपी पर्यटन विभागाकडून उभारली जात असून त्यांतील टेंटची नावे ऋषी कुल, कुंभ गाव, शिवाद्य कुंभ शिबिर आणि कुंभ कॅनव्हास अशी आहेत. ऋषीकुल टेंट सिटीमध्ये एकूण 200 कॉटेज बांधले जात आहेत. डिसेंबरअखेर स्विस कॉटेज सर्वसामान्य भाविकांसाठी पूर्णपणे तयार होईल. अर्थात हे टेंट बांधायच्या आधीच त्यांचे 70 टक्के बुकींग झाले आहे. विशेषतः महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानांच्या तारखांच्या आसपास टेंटचे बुकींग अधिक गतीनं होत आहे. कुंभ व्हिलेज आणि शिवदय कुंभ कॉटेजमधील बहुतेक कॉटेज देखील मुख्य स्नानाच्या तारखांना बुक झाले आहेत. या टेंट सिटीमध्ये जागतिक दर्जाच्या दर्जाप्रमाणे पंचतारांकित हॉटेलसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. या टेंटमध्ये राहणा-या भाविकांसाठी महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक संध्याचेही आयोजन करण्यात येणार आहे. या तंबूसिटीमध्येच यज्ञशाळा उभारण्यात येत असून यात येणा-या परकीय नागरिकांची उपस्थिती पहाता त्यांच्यासाठी योगवर्गाचेही आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय या कुंभमेळ्यासाठी उत्तरप्रदेशच्या योगी सरकारने देश आणि जगाला जोडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातून उत्तरप्रदेशचे मंत्री वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन त्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना कुंभमेळ्यात येण्याचे आमंत्रण देणार आहेत. शिवाय या मुख्यंमंत्री आणि राज्यपालांनी आपल्या राज्याताली जनतेलाही कुंभमेळ्यात आवर्जून जा, असे आवाहन करायला सांगण्यात येत आहे. त्यासाठी उत्तरप्रदेशचे मंत्री 5 डिसेंबरपासून देशभर दौ-यावर रवाना होणार आहेत. (Social News)
=====
हे देखील वाचा : महाकुंभ आणि नागासाधू !
========
प्रयागराजचा हा कुंभमेळा अभूतपूर्व करण्यासाठी या संपूर्ण शहराचाच कायापालट करण्यात येत आहेत. प्रयागराजच्या 26 प्रमुख चौकांचे सुशोभिकरण चालू असून त्यामध्ये पौराणिक कथानुसार देखावे उभारण्यात येत आहेत. भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगणाऱ्या कोरीव मूर्तींची ही सजावट भाविकांना आकर्षून घेणार आहे. कुंभमेळ्यासाठी 40 कोटी भाविक येतील असा अंदाज आहे, या भाविकांना वाहतुकीच्या कुठल्याही समस्या जाणवू नयेत म्हणून आधुनिक मार्गपद्धतीचा वापर करण्यात येत आहे. तसेच हरित पट्टेही विकसित केले जात आहेत. महाकुंभमेळ्यात येणा-या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या सर्व परिसरात 200 वॉटर एटीएम बसवण्यात येत आहेत. त्याद्वारे महाकुंभासाठी येणाऱ्या भाविकांना शुद्ध आरओ पाणी सहज उपलब्ध होणार आहे. या सर्व भाविकांच्या सुरक्षितेसाठीही पीएसी, एनडीआरएफ, एसडीआरएफचे जवान 700 झेंडे असलेल्या बोटींवर 24 तास तैनात असणार आहेत. भाविकांच्या सुरक्षेतेसाठी संगम स्नानावर आधुनिक बोटी तैनात असणार आहेत. शिवाय या भागातील सर्वच जुन्या बोटी रद्द ठरवून बोटचालकांना नव्या बोटी देण्यात येत आहेत. (Mahakumbha)
सई बने