महाकुंभ 2025 हा सर्वार्थानं अद्भूत होत आहे. 26 फेब्रुवारी पर्यंत चालणा-या हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या उत्सवासाठी जगभरातून भाविक येत आहेत. महाकुंभमध्ये येणा-या परदेशी भाविकांची संख्या जशी मोठी आहे, तशीच महाकुंभमध्ये येऊन हिंदू धर्माची आणि साधक म्हणून दिक्षा घेणा-यांचीही संख्या मोठी आहे. प्रयागराज महाकुंभमध्ये या परदेशी साधू-संताचा वेगळा आखाडाच आहे, हे सांगितले तर आश्चर्य वाटले. मात्र हे परदेशी साधू येथे फक्त रहात नसून तस अस्खलित संस्कृतमध्ये श्लोक बोलत आहेत. महाकुंभमधील सेक्टर 17 मधील शक्तीधाम आश्रम हा त्यासाठी ओळखला जात आहे. या आश्रमातील सर्व महामंडलेश्वर हे परदेशी आहेत. त्यांना हिंदी बोलता येत नसले तर ते अस्खलित संस्कृत बोलत आहेत. महाकुंभमधील सर्वच धार्मिक अनुष्ठाने करण्यात या सर्वांचा पुढाकार आहे. कुंभमेळ्यात असलेल्या शक्तीधाम आश्रमात राहणारे नऊ महामंडलेश्वर हे हिंदू धर्माची ताकद किती आहे, याची जाणीव करुन देत आहेत. (Mahakumbh 2025)
हे महामंडलेश्वर परदेशी वंशाचे आहेत. मात्र त्यांनी भारतीय संस्कृतीला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग केले आहे. प्रयागराजमधील महाकुंभाच्या सेक्टर 17 मधील आश्रमात सुमारे 40 साधू आणि संत आहेत. हे सर्व अमेरिका, फ्रान्स आणि युरोपमधील देशांमधून आले आहेत. आश्रमाच्या प्रमुख या जगद्गुरु पदावर असलेल्या आध्यात्मिक गुरु साई माँ लक्ष्मी देवी मिश्रा आहेत. यात 9 महामंडलेश्वर आहेत. त्यात तीन महिला महामंडलेश्वरांचा समावेश आहे. हे सर्व परदेशी नागरिक असून भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आहेत. या सर्वांनी हिंदू धर्माचे स्विकार केला असून परदेशात सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे त्यांचे ध्येय आहे. यातील अनेक साधू हे उच्चशिक्षीत आहेत. कोणी पीएचडी, मानसशास्त्रज्ञ, संगीतकार तर कोणी अभियंते आहेत. यातील अनेकांनी हिंदी भाषा निट बोलता येत नसली तरी त्यांना संस्कृत धर्मग्रंथांचे पठण करता येते. यासंदर्भात अमेरिकेत राहणारे महामंडलेश्वर अनंत दास महाराज हे सर्व श्रेय साई माँ यांना देतात. त्यांची साई माँ यांच्याबरोबर अमेरिकेत भेट झाली. (Social Updates)
साई माँ चे व्याख्यान ऐकल्यानंतर त्यांना सनातन धर्माची ओढ वाटू लागली आणि ते साई माँ यांच्या आश्रमात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्याकडे वाराणसी येथील शक्तीधाम आश्रमात महामंडलेश्वर पदाची जबाबदारी देण्यात आली. महामंडलेश्वर अनंत दास महाराज हे परदेशात आता सनातन धर्माचे प्रचार करत आहेत, तसेच योगाचेही महत्त्व सांगत आहेत. त्यांच्यासारख्याच 100 हून अधिक असलेल्या परदेशी साधू-संत महाकुंभमध्ये दाखल झाले आहेत. यासर्वांना अमृत स्नानानंतर, साई माँ लक्ष्मी देवी मिश्रा यांनी दिक्षा दिली. यात अमेरिका, कॅनडा, जपान, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, चिली आणि मॉरिशस अशा जवळपास 20 देशातील साधूंचा समावेश आहे. साई माँ लक्ष्मी देवी यांचा आखाडा हा निर्मोही अणी आखाड्यात सामील झाला आहे. या आखाड्यात 100 हून अधिक परदेशी साधू असून ते महाकुंभमधील 45 दिवसात होणा-या 150 हून अधिक यज्ञात सहभागी होत आहेत. या सर्वांचा दिनक्रम ब्रह्ममुहूर्तापासून होत आहे. हे सर्वच साधू भारतीय संस्कृती आणि आध्यात्म यामुळे प्रभावीत झालेले आहेत. आपल्या आयुष्यातील सर्वात अनोखा आणि संपन्न अनुभव म्हणून या सर्वांनी महाकुंभचे वर्णन केले आहे. (Mahakumbh 2025)
==================
हे देखील वाचा : Prayagraj : मस्क्युलर बाबा आणि एमटेक बाबा
Prayagraj : महाकुंभमध्ये होतेय, नागा साधू होण्यासाठी परीक्षा
==================
या सर्वांना साई माँ लक्ष्मी देवी या मार्गदर्शन करीत आहेत. त्यांनी अध्यात्मात पीएचडी केली असून त्यांची सायंकाळी महाकुंभ सेक्टर 17 मध्ये रोज कथा होत आहे. या कथेला या परदेशी साधूंसोबत भारताच्या कानाकोप-यातून आलेल्या भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती आहे. साई माँ यांच्या आखाड्यात कल्पवास करणा-या साधुंचीही संख्या मोठी आहे. साई माँ यांनी इटलीमध्ये जागतिक धर्म संसदेत संवादांमध्ये भाग घेऊन सनातन धर्माचे महत्व सांगितले आहे. साई माँ यांनी कॉन्शियस लिव्हिंग: द पॉवर ऑफ एम्ब्रेसिंग युअर ऑथेंटिक यू हे पुस्तक देखील लिहिले असून या पुस्तकांला पाच भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले आहे. मॉरिशसमधील एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात साई माँ यांचा जन्म झाला असून सनातन धर्माचा प्रचार जगभर करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. (Social Updates)
सई बने