Home » मुंबई नंबर वन !

मुंबई नंबर वन !

by Team Gajawaja
0 comment
List of billionaires in Asia
Share

आपली मुंबई नंबर वन ठरली आहे. आशियातील अब्जाधीशांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यात मुंबईनं चीनच्या बीजिंग शहराला मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे. आता मुंबई ही आशियातील अब्जाधीशांची राजधानी झाली आहे. हुरुन इंडियातर्फे यासंदर्भात आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यात श्रीमंतांच्या यादीत महाराष्ट्रात राहणाऱ्या एकूण अब्जाधीशांची संख्या ४७० आहे. तर देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये २१३ अब्जाधीश रहात आहेत. हुरुन इंडियानं ३१ जुलै २०२४ च्या पाहणीवरुन हा अहवाल दिला आहे. यानुसार भारतातील सर्वात श्रीमंत लोक मुंबईत रहातात. तर त्यापाठोपाठ नवी दिल्ली आण हैदराबाद ही श्रीमंतांची आवडती शहरं आहेत. (List of billionaires in Asia)

हुरुन इंडियानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ४७०, दिल्लीत २१३ आणि गुजरातमध्ये १२९ अब्जाधीश आहेत. त्यानंतर हैद्राबाद, तेलंगणा आणि कर्नाटक यांचा नंबर येतो. मुंबईतील यादीत ५८ नवीन अब्जाधीशांचा समावेश करण्यात आला आहे. तर दिल्लीमध्ये १८ नव अब्जाधीश झाले आहेत. हैदराबादमध्ये १७ नवीन अब्जाधीश झाले आहेत. यानंतर बेंगळुरूमध्ये १००, चेन्नईमध्ये ८२ आणि कोलकात्यात ६९ , इंदूर आणि जयपूरमधील प्रत्येकी नऊ नव्या अब्जाधीशांचा या यादीमध्ये समावेश झाला आहे. (List of billionaires in Asia)

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत ठरले आहेत. दिल्लीमध्ये हा मान एचसीएलचे अध्यक्ष शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळाला आहे. असे असले तरी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान अदानी कुटुंबाकडे गेला आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष, गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंबीय २०२४ च्या हुरुन इंडियाच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये अग्रस्थानावर आहेत. रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबनी यांना देशातील अब्जाधीशांच्या यादीत अदानी यांनी मागे टाकले आहे. गौदम अदानी यांची एकूण संपत्ती ११.६१ लाख कोटी आहे. त्यांच्या संपत्तीत ९५ टक्क्यांनी विक्रमी वाढ झाली आहे. दुस-या क्रमांकावर असेलेले रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी यांची संपत्ती १०.१४ लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. (List of billionaires in Asia)

एचसीएल टेक्नॉलॉजीजचे शिव नाडर आणि त्यांचे कुटुंब या वर्षीच्या अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, ज्यांची एकूण संपत्ती ३.१४ लाख कोटी रुपये आहे. चौथ्या स्थानावर सायरस एस. पूनावाला आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुटुंब आहे. पूनावाला यांची संपत्ती २.८९ लाख कोटी आहे. सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे दिलीप सांघवी यांची संपत्ती २.४९ लाख कोटी आहे. हुरुन इंडियाचा अहवाल हा भारताच्या चढत्या प्रगतीचा आलेख दाखवणारा आहे. यानुसार भारतात अब्जाधीशांची संख्या ही वाढती आहे. २०२३ मध्ये २५९ एवढे अब्जाधीश होते. आता या वर्षाच्या अवघ्या सहा महिन्यात ही संख्या ३३४ एवढी झाली आहे. या अहवालानुसार १५३९ भारतीयांकडे १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. या यादीमध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्यांमध्ये कौटुंबिक व्यवसाय, स्टार्टअप संस्थापक, खाजगी इक्विटी गुंतवणूकदार, फिल्म स्टार आणि गुंतवणूकदारांचाही समावेश आहे.

======

हे देखील वाचा : जेव्हा आदिवासींनी ब्रिटिशांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं !

======

हुरुन इंडियाचे संस्थापक अनस रहमान जुनैद आहेत. त्यांच्यामते भारतातील नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारत आहे. भारत हा आशियातील संपत्ती निर्मितीमध्ये एखाद्या इंजिन सारखा उदयाला येणार देश आहे. भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर भारताचा शत्रू देश चीनमधील अब्जाधीशांच्या संख्येत २५ टक्क्यांनी घट झाली आहे. या यादीतील ७० टक्के लोकांची एकूण संपत्ती १.५ ट्रिलियन डॉलर्स आहे, जी देशाच्या जीडीपीच्या एक तृतीयांश आहे. तसेच या यादीत येणाऱ्या नवीन अब्जाधीशांपैकी ६४ टक्के हे स्वत:च्या बळावर अब्जाधीश झाले आहेत, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे अनस रहमान जुनैद यांनी सांगितले आहे. यावरुन भारताची अर्थव्यवस्था किती मजबूत होत आहे, याचा पुरावा मिळाल्याचे जाणकारांनी स्पष्ट केले आहे. सोबतच चीनमधील अर्थव्यवस्था कधीही कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. अनेक देशांना अब्जो रुपयांचे कर्ज देणा-या चीनची गंगाजळी खाली झाल्याच्या बातम्या येतात. मात्र चीन सरकार सर्व अलबेल असल्याचे सांगत आहे. मात्र आता जाहीर झालेल्या या यादीवरुन चीनमधील आर्थिक परिस्थिती जगासमोर आली आहे.  (List of billionaires in Asia)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.