Life Hacks : धार्मिक मान्यतेनुसार, आपल्या काही सवयी आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतात. जुन्या काळात नेहमीच असे सांगितले जायचे की, सकाळी उठल्यानंतर पूजा-प्रार्थना करावी, रात्री झोपताना घर स्वच्छ करावे, सूर्यास्तानंतर केरकचरा काढू नये. अशा नियमांचे पालन करणे शुभ मानले जाते. अशातच रात्रीच्या वेळेस कधीच उष्टी भांडी किचनमध्ये ठेवू नये. यामुळे देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्ण नाराज होते. याशिवाय तुमचे आर्थिक नुकसान होतो.
-वास्तुशास्रानुसार, रात्री जेवल्यानंतर किचन नेहमीच स्वच्छ करून झोपावे. याशिवाय तुम्ही घरातील स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. एखाद्या कारणास्तव रात्री उष्टी भांडी धुवू शकत नसाल तर ती पाण्याने धुवून ठेवा. उष्ट्या भांड्यांवर जेवणाचे शित कधीच सोडू नयेत. किचनमध्ये स्वच्छता ठेवल्यास घरात सुख-समृद्धी येते.
-रात्रीच्या वेळेस उष्टी भांडी ठेवल्यास घरातील लोकांवर राहु केतुचा प्रभाव पडतो, याच कारणास्तव त्यांचे आरोग्य बिघडले जाते. याशिवाय रात्रीच्या वेळेस गॅस पेटवल्यानंतर तो अस्वच्छ ठेवून झोपणेही अशुभ मानले जाते. भांड्यांचा आधिपत्य ग्रह मंगळ मानला गेला आहे. यामुळे रात्री झोपण्याआधी किचन स्वच्छ करून झोपावे.
-रात्रभर भांड्याना लागलेल्या अन्नपदार्थांमुळे बॅक्टेरिया वाढले जातात. तुम्ही स्वच्छ केलात तरीही त्यामध्ये बॅक्टेरिया राहतात. याचा तुमच्या आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव पडतो. यामुळेच रात्रीच्या वेळेस भांडी स्वच्छ धुवून झोपावे. (Life Hacks)
-युएस सेंटर फॉर्स डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रिवेंशनच्यानुसार, देशात कोट्यावधी लोक प्रत्येक वर्षी दूषित पदार्थ खाल्ल्याने आजारी पडतात. डिसेंबर 2022 मध्ये छापलेल्या एका सर्व्हेनुसार, अमेरिकेत दोन-दोन दिवसांपर्यंत सिंकमध्ये न घासलेली भांडी ठेवायचे.
-काही घरांमध्ये आठवड्यातून तीन किंवा तीन वेळेस भांडी धुण्याचा नियम आहे. यामुळे अस्वच्छता आणि बॅक्टेरिया भांड्यांवर तयार होतात. हे बॅक्टेरिया संपूर्ण किचनमध्ये पसरल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतो. खरंतर ही सवय आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही आणि यामध्ये बदल करणे आवश्यक आहे.