इटली मधील पीसाचा प्रसिद्ध टॉवर ज्याला लोक लीनिंग टॉवर ऑफ पीसा असे म्हणतात, त्याच्या बांधकामाबद्दल मतभेद आहेत. असे म्हटले जाते की, आजच्या दिवशी पीसाच्या टॉवरची उभारणी करण्याचे काम ११७३ मध्ये सुरु झाले होते. याचे बांधकाम हे २०० वर्षांपर्यंत सुरु राहिले होते. टॉमासो पिसानो यांनी सन १३९९ मध्ये या टॉवरचे काम पूर्ण केले होते. ८ मजली असलेल्या या पिसाचा झुकलेल्या टॉवरचा जेव्हा ३ मजला तयार झाला तेव्हा तो एका बाजूला झुकत होता. याचा पाया तयार करण्यासाठी एक मऊ मातीचा उपयोग करण्यात आला होता. त्यामुळे तो टॉवर झुकला गेला आणि आतापर्यंत सुद्धा तो झुकलेला आहे.(Leaning Tower of Pisa)
आश्चर्याची गोष्ट अशी की, पीसाचा टॉवर आजवर पडलेला नाही. ऐवढेच नव्हे तर भुंकपाचे धक्के लागले तरीही तो तसाच उभा आहे. या टॉवरने १२८० नंतर काही तीव्र भुकंपाचे धक्के झेलले आहेत तरीही तो पडला नाही. अशातच वैज्ञानिकांनी पिसाचा झुकलेल्या टॉवरसंदर्भात अभ्यास ही केला. त्यांचे असे म्हणणे आहे की, यामागील कारण असे की त्याच्या पायासाठी वापरलेली मऊ माती.
वैज्ञानिकांनी याच्या रहस्याचा खुलासा करत असे म्हटले होते की, पिसाचा झुकलेल्या टॉवर हा ५ डिग्री अशा धोकादायक कोनापर्यंत झुकलेला असला तरीही त्याला कोणतेही नुकसान झालेले नाही. १६ इंजिनिअर्सच्या ग्रुपने शोधून काढले होते की, अशा पद्धतीने तो उभे राहण्याचे कारण ही त्याच्या पायासाठी वापरलेली माती. तर झुकलेल्या टॉवरला कधी ना कधी गंभीर नुकसान होऊ शकते असा अंदाज वेळोवेळी बांधला गेला. परंतु मोठे भुकंपाचे धक्के झेलून सुद्धा त्याचे काहीच नुकसान झाले नाही. दरम्यान, इंजिनिअर्सच्या ग्रुपने याचा अभ्यास केल्यानंतर त्याच्या झुकण्यामागील रहस्य समोर आणले.
हे देखील वाचा- जगातील सर्वात मोठे बर्फाचे शिवलिंग अमरनाथमधले नसून, ते आहे ऑस्ट्रियामध्ये…
वैज्ञानिकांनी असे सांगितले होते की, याच्या पायासाठी टाकण्यात आलेल्या मातीमुळे जमिनीत झालेल्या हालचालींमुळे टॉवरवर त्याचा प्रभाव पडला. या प्रक्रियेला डायनॅमिक सॉयल-स्ट्रक्चर इंटरेक्शन असे म्हटले जाते. रिसर्च ग्रुपमध्ये ब्रिटेनच्या ब्रिसल युनिव्हर्सिटीचील इंजिनिअर्सचा सुद्धा समावेश होता. त्यांचे असे म्हणणे होते की, पिसाचा झुकलेल्या टॉवरची उंची आणि मजबूतपणा पाहता आणि पायासाठी टाकण्यात आलेली माती यामुळे भुंकप जरी आला तरीही तो हलत नाही. अशातच तो आजवर पडलेला नाही.(Leaning Tower of Pisa)
त्याचसोबत युनिव्हर्सिटीच्या सिविल इंजिनिअरिंग विभागाच्या मॅरी क्युरी रिसर्च फॅलो फियोरेनटिनो यांनी म्हटले की, टॉवरच्या बांधणीचा प्रोजेक्ट थांबवण्याऐवजी ते अधिक क्रिएटिव्ह झाले. त्यांनी वरील मजल्यांना थोडा-थोडा अँगल देऊन योग्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. तो झुकलेलाच राहिला आणि केळ्याच्या आकारासारखा दिसू लागला होता.