आजच्या आधुनिक काळात मद्यपान करणे खूपच सामान्य झाले आहे. मद्यपान भागातील एक महत्वाचे पेय म्हणजे वाईन. आजच्या काळात वाईन घेणे ही खूपच सामान्य बाब झाली आहे. अनेक लोकं अगदी प्रत्येक विकेंडला वाईन घेतात. वाईन ही परदेशातून आपल्या देशात आलेले पेय. मात्र भारताने या पेयाला मोठ्या आनंदाने स्वीकारले आणि खूप प्रेम दिले. आजकाल तर कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुण वर्गापासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वच या वाईनचे चाहते आहेत.
वाईनमध्ये देखील रेड वाईन ही सर्वात जास्त प्यायले जाणारे पेय आहे. रेड वाईन आता तर आपल्या महाराष्ट्रातच वाईन कॅपिटल आले असल्याने ही वाईन आता आपलीच झाली आहे. रेड वाईन ही द्राक्षांपासून तयार करण्यात येणार एक पेय आहे. रेड वाईन काळ्या रंगाच्या द्राक्षांपासून बनविली जाते. यासाठी काळ्या रंगाची द्राक्षं सालीसह आंबवली जातात. तसे पाहिले तर मद्य हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. नेहमीच डॉक्टर या पेयापासून दूर राहण्याचा सल्ला देतात. मात्र वाईनबद्दल थोडे वेगळे मत आहे. हो रेड वाईन योग्य प्रमाणात पिणे आपल्या शरीर आणि आरोग्याच्या दृष्टीने खूपच चांगली आणि फायदेशीर मानली जाते.
रेड वाईनमधील पॉलिफेनॉल हे अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठी फायदेशीर आहेत. रेड वाईनमध्ये प्रामुख्याने रेझवेराट्रोल नावाचे पॉलिफेनॉल असते, हे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. याशिवाय, रेड वाईन वाईच कोलेस्ट्रॉलमुळे कमी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, रेड वाईन रक्तवाहिन्यांना जोडणाऱ्या पेशींचे कार्य सुधारण्यास देखील मदत करते. रेड वाईनमध्ये भरपूर प्रमाणात लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी ६ आणि व्हिटॅमिन सी असते. जाणून घेऊया रेड वाईन पिण्याचे अधिक फायदे.
रेड वाईन पिण्याचे फायदे
कर्करोगाचा धोका कमी होतो
रेड वाईनचे नियमित आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास अंडाशय, प्रोस्टेट, बेसल सेल, कोलन, कार्सिनोमा आदी प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी होतो.
वजन नियंत्रित राहते
रेड वाईनमध्ये आढळणारे रेझवेराट्रॉल हे पिसॅटॅनॉलमध्ये रूपांतरित होते, ज्यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
पचनसंस्थेसाठी लाभदायक
पोटाची जळजळ आणि इतर पचनक्रियेसंबंधित आजारांवर रेड वाईनचे अँटी-बॅक्टेरियल गुण फायदेशीप ठरतात.
निरोगी हृदय
जर तुम्हाला आठवड्यातून एकदा रेड वाईन पिण्याची सवय असेल तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. हे पेय लाल रक्तपेशी सुलभ करण्यास मदत करते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित
जे लोक नियमितपणे रेड वाईन पितात त्यांना मधुमेह होण्याचा धोका कमी असतो. हे पेय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.
त्वचेसाठी होतो फायदा
रेड वाईनमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरासाठी आवश्यक असतात. रेड वाईन वृद्धत्व कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर बारीक रेषा म्हणजेच फाईन लाईन्स आणि सुरकुत्या कमी करण्यासही मदत करू शकते.
प्रतिकारकशक्ती वाढवते
रेड वाईनमध्ये आर्यन, मॅग्नेशिअम, व्हिटॅमीन बी 6 आणि व्हिटॅमीन सीची भरपूर प्रमाणात आढळतं. यामध्ये अनेक अॅक्टीव्ह अँटीऑक्सीडंट पण असतात. जे तुमची प्रतिकारकशक्ती वाढवतात.
तणाव कमी होतो
जर आपण दररोज एक ग्लास रेड वाइन पित असाल तर यामुळे तणाव आणि चिंता कमी होईल. म्हणून दररोज आपल्या रात्रीच्या जेवणात एक ग्लास रेड वाइनचा समावेश करा.
=========
हे देखील वाचा : हिवाळ्यात नियमित गूळ खा आणि राहा निरोगी
=========
रक्ताच्या गुठळ्या कमी
रेड वाईन ब्लड क्लॉटींग म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या समस्येवरही गुणकारी आहे. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि पल्मनरी एम्बोलिज्मचा धोकाही कमी होतो.
सौंदर्यवर्धक
रेड वाईनचं सेवन हे सौंदर्यासाठीही उपयुक्त मानलं जातं. काही महिलांमध्ये वाढत्या वयासोबत त्वचेची सुंदरता कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत रेड वाईनचा वापर हा फेसपॅक म्हणून केल्यास उपयुक्त ठरतो.