सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवाची जानेवारी २०२५ मध्ये सुरुवात होत आहे. भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून कुंभमेळा ओळखला जातो. या कुंभमेळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये मोठे महत्व आहे. दर १२ वर्षांनी हा कुंभमेळा देशातील प्रयागराज, नाशिक, हरिद्वार आणि उज्जैन या महत्वाच्या आणि मोठ्या तीर्थक्षेत्री पार पडतो. २०२५ वर्षातील पहिल्याच अर्थात जानेवारी महिन्यात प्रयागराजमध्ये कुंभमेळा संपन्न होणार आहे. याची जोरदार तयारी सध्या सुरु असून, प्रयागराज नागरी कुंभमेळासाठी सज्ज झाली आहे.
२०२५ मध्ये होणार्या कुंभमेळ्याची सुरूवात १३ जानेवारीला पौष पौर्णिमेच्या स्नान उत्सवाने होणार आहे. तर या महा कुंभाची समाप्ती २६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी होईल.कुंभमेळ्यासाठी येणारी कल्पवासी १३ जानेवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीत माघ महिन्यात राहणार आहे. ३० दिवस लोक मेळा परिसरात राहून कल्पवास करतील. १२ वर्षानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभ होणार आहे. यापूर्वी २०१३ मध्ये प्रयागराजला महाकुंभ मेळावा पार पडला होता. नागा साधू या कुंभ मेळ्याला हजेरी लावतात. नागा साधू या कुंभमेळ्याचे खास आकर्षण आहेत.
महाकुंभ २०२५ च्या शाही स्नानाची तारीख
पौष पौर्णिमा – १३ जानेवारी २०२५
मकर संक्रांती – १४ जानेवारी २०२५
मौनी अमावस्या – २९ जानेवारी २०२५
वसंत पंचमी – ३ फेब्रुवारी २०२५
माघ पौर्णिमा – १२ फेब्रुवारी २०२५
महाशिवरात्री – २६ फेब्रुवारी २०२५
जेव्हा बुध देव वृषभ राशीत असतो आणि सूर्य मकर राशीत असतो तेव्हा प्रयागराजमध्ये कुंभ मेळाव्याचे आयोजन केले जाते. प्रयागराज येथील गंगा आणि यमुना नद्यांच्या संगमच्या काठावर २०२५ साली या महाकुंभमेळा संपन्न होत आहे. सरस्वती नदी ही या नद्यांना अदृश्यपणे मिळते. त्यामुळे प्रयागराजचे महत्त्व अधिक वाढते. प्रयागराज व्यतिरिक्त उज्जैन, नाशिक आणि हरिद्वारमध्ये दर ६ वर्षांनी अर्ध कुंभमेळा आयोजित केला जातो. परंतु, २०२५ मधील कुंभमेळा हा १२ वर्षांनी आल्यामुळे याचे सर्वाधिक महत्त्व पाहायला मिळेल. धार्मिक मान्यतेनुसार कुंभमेळ्याच्या वेळी प्रयागराजमध्ये स्नान आणि ध्यान केल्याने सर्व पापांचा नाश होतो. मनुष्य जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो.
कुंभ आणि महाकुंभ फरक
गोदावरी, शिप्रा, गंगा आणि संगम येथे तीन वर्षांतून एकदा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हर, हरिद्वार आणि संगम येथे दर सहा वर्षांनी अर्धकुंभमेळा भरतो. पूर्ण कुंभमेळा बारा वर्षांतून एकदा भरतो. महाकुंभमेळा १४४ वर्षातून एकदा (१२ पूर्णकुंभ पूर्ण झाल्यावर) भरतो. प्रयागराजमधील संगम घाटावरच हा सोहळा पार पडतो.