Kitchen Hacks : भारतातील बहुतांशजणांना तिखट अन्नपदार्थ खाण्याची सवय असते. तिखट पदार्थांशिवाय जेवण पूर्ण न झाल्यासारखे काहींना वाटते. अशातच भाजीत किंवा एखाद्या पदार्थात मिरची अधिक झाल्यास संपूर्ण मेहनत फुकट जाते. अशातत तुमच्याकडून कधी भाजीत मिरची अधिक पडल्यास काय करावे याबद्दलच्या टिप्स जाणून घेऊयात….
टोमॅटो पेस्ट
काहीवेळेस असे होते की, भाजीत गरजेपेक्षा अधिक मिरची पडली जाते. अशातच भाजी अधिक तिखट होते. यावेळी तुम्ही भाजीत टोमॅटोची पेस्ट मिक्स करू शकता. खरंतर, टोमॅटोच्या पेस्टने तुमच्या भाजीचा तिखटपणा कमी होईल.
तूप
कोणत्याही अन्नपदार्थात मिरची अधिक झाल्यास घाबरू नका. तिखटपणा कमी करण्यासाठी तुम्ही तूपाचा वापर करू शकता. याशिवाय तूपामुळे तुमच्या पदार्थाची चवही वाढली जाईल.
मलई
चुकून तुमच्याकडून भाजीत अधिक मिरची पडल्यास मलईचा वापर करू शकता. भाजीत किंवा एखाद्या रेसिपीत मलई वापरल्यास तिखटपणा कमी होईल. याशिवाय मलई मिक्स केल्यानंतर भाजी थोडावेळ पुन्हा शिजवून घ्या. (Kitchen Hacks)
मैदा
मैदा पदार्थातील तिखटपणा कमी करतो. यामुळे थोड्याशा तेलात तीन ते चार चमचे मैदा मिक्स करून भाजून घ्या. यानंतर ज्या रेसिपीमध्ये मिरची अधिक झाली आहे त्यामध्ये मिक्स करा.