Home » काशी हे भारताचे नवे आर्थिक केंद्र

काशी हे भारताचे नवे आर्थिक केंद्र

by Team Gajawaja
0 comment
Kashi
Share

काशी,  वाराणसी , भगवान शंकराची भूमी, अशा अनेक नावांनी प्रसिद्ध असलेल्या बनारसची आणखी एक ओळख होऊ पाहत आहे.  ती म्हणजे,  भारताची नवी आर्थिक राजधानी. भगवान शंकराच्या या काशी नगरीचा विकास गेल्या काही वर्षात अत्यंत झपाट्यानं झाला आहे. यासोबत या नगरीमध्ये  होत असलेल्या उद्योग धंद्यांमुळे काशी नगरीचे स्वरुपच बदललेले आहे.  काशी हे नवे आर्थिक केंद्र म्हणून उदयास येत आहे.  बाबा महाकाललोक या कॅरिडोरची त्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. (Kashi)

आज लाखो पर्यटक यामुळे काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी या नगरीमध्ये येत आहेत.  या वाढत्या पर्यटनामुळे काशीचा सर्वव्यापी विकास होत आहे.  शिवाय बनारस साडीच्या उद्योगालाही त्यामुळे उभारी मिळाली आहे. आज काशी (Kashi) विश्वेश्वराच्या भोवती सुरु असलेल्या विकास कामांमुळे या बनारस साडी उद्योगालाही नवी दिशा मिळाली आहे.  पर्यायानं एकमेकांचा हात पकडून काशीमधील उद्योग व्यवसाय बहरत आहेत.  त्याचा परिणाम म्हणजे, या नगरीला नवी ओळख मिळाली असून, देशाची नवी आर्थिक राजधानी अशी ओळख या भगवान शंकराच्या नगरीनं मिळवली आहे.  

गेल्या काही वर्षांत भगवान शंकराच्या काशी (Kashi) नगरीमध्ये धार्मिक पर्यटनात लक्षावधी वाढ झाली आहे.  येथे भारत आणि परदेशातून मोठ्या संख्येने भाविक येत आहेत.  त्यामुळे बनारसची वार्षिक उलाढाल 20,000 कोटींच्या पुढे गेली आहे.  काशी या शहराचा संबंध पुराणकालीन आहे.  त्याचाच शोध घेण्यासाठी या नगरीत भाविक येतात.  भगवान शंकरानं स्थापन केलेले शहर म्हणून या नगरीची ओळख अभिमानानं स्थानिक करुन देतात.  काशीला बनारस किंवा वाराणसी म्हणूनही ओळखले जाते.

काशीचा उल्लेख प्राचीन मंदिरे आणि पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतो. हे शहर गंगेच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे. भगवान शंकराच्या त्रिशूळावर बनारस उभे असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे काशी विश्वनाथ मंदिर प्रलय आला तरी बुडणार नाही, असा विश्वास स्थानिक व्यक्त करातात. याच काशीचा गेल्या काही वर्षात चेहरा मोहराच बदलला आहे.  आता या काशी नगरीचा मोह जगभरातील पर्यटकांना पडत आहे.  त्यामुळे येथे लाखोंच्या घरात पर्यटक प्रत्येक दिवशी येत आहेत.  

याचे मुख्य श्रेय काशी विश्वनाथ धामला जाते.  काशी विश्वनाथ धामने बनारसच्या अर्थव्यवस्थेला नवी गती मिळाली. काशीतली रोजगाराच्या क्षेत्रात 34 टक्के वाढ झाली आहे.  काशीमध्ये सध्या विमानतळापासून रेल्वे आणि रोडवेपर्यंत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा होत आहेत.  या सर्व सुविधा पर्यटकांना सुखावणा-या आहेत.  त्याचा परिणाम म्हणजे, पुढच्या काही वर्षात काशीमध्ये जगातील सर्वाधिक पर्यटक येणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. (Kashi)

एवढे लाखो पर्यटक आल्यावर त्यांच्या सुविधांसाठी संबंधित स्थानिक पातळीवर अनेक प्रोजेक्ट राबवले गेले आहेत.  काही प्रोजेक्टवर काम चालू आहे.  यात अगदी इंजिनिअर पासून साध्या कामगारापर्यंत सर्वांची गरज भासत आहे.  परिणामी नोकरीची हमी येथे निर्माण झाली आहे.  शिवाय घरगुती व्यवसायही वाढले आहे.  त्यामध्ये महिला व्यवसायिकांचे प्रमाण अधिक आहे.  यातून महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून आत्मनिर्भर महिला शक्ती येथे तयार झाली आहे.  

भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, म्हणजे काशी हे  पवित्र स्थान आहे.  येथे काशी विश्वनाथ कॉरिडॉर सुरू होऊन दोन वर्षे झाली आहेत. 2021 मध्ये, काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर सुमारे 69 लाख भाविकांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. आता येथे पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

त्यामुळे काशीत (Kashi) पर्यटन व्यवसाय वाढला असून त्याचा चांगला परिणाम अन्य व्यवसायांवरही होत आहे.  या वर्षी काशीला येणाऱ्या भाविकांची संख्या 13 कोटींच्या पुढे गेली आहे. गेल्या दोन वर्षांत त्यात 20 पट वाढ झाली आहे.   हा आकडा दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक व्यवसाय उपलब्ध झाले आहेत.  

काशीमध्ये सध्या अनेक प्रोजेक्ट चालू आहेत.  वाराणसीच्या चौबेपूर भागातील स्वरवेद मंदिराचेही  पर्यटकांना आकर्षण आहे.  मकराना संगमरवरी बनवलेल्या या मंदिराची अनेक वैशिष्टे आहेत.   हे सात मजली मंदिर जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र असल्याचे म्हटले जाते. या मंदिरात 20 हजार लोक एकत्र योग आणि ध्यान करू शकतात.   पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलेल्या या मंदिराला बघण्यासाठी आता अनेक पर्यटक काशीमध्ये येणार आहेत.  

या सर्वांचा परिणाम बनारसमधील परंपरागत साडी व्यवसायालाही झाला आहे.  काही वर्षापूर्वी याच बनारसी साडी उद्योगाला घरघर लागल्याची बातमी होती.  मात्र आता बनारसी साडीला पुन्हा सोन्याचे दिवस आले आहेत.  काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला आलेले भाविक मोठ्या संख्येनं साड्यांची खरेदी करत आहेत.  त्यामुळे बनारसची वार्षिक उलाढाल 20,000 कोटींच्या पुढे गेली आहे.

=============

हे देखील वाचा : रूम हिटर वापरत असाल तर ‘हे’ आधी वाचा

=============

 तज्ज्ञांच्या मते काशीतील पर्यटन खूप वेगाने प्रगती करत आहे. आकडेवारीनुसार, पुढील वर्षात 5 कोटींच्या पुढे भाविक काशीला (Kashi) भेट देतील.  आजही येथील धर्मशाळा आणि हॉटेलच्या खोल्या एक दिवसही रिकाम्या रहात नाहीत. एकट्या बनारसमध्ये फक्त 1000 नोंदणीकृत हॉटेल्स आहेत.  तेही कायम पर्यटकांनी भरलेले असतात.  टुरिझम वेल्फेअर असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी येथील वार्षिक उलाढाल सुमारे 250 कोटी रुपये होती, ती यंदा 300-350 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. काशीच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसह, कारागीर, हॉटेल क्षेत्र, लाकूडकाम, पर्यटन यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळत आहे.   पुढच्या वर्षात काशीमधील सुविधांचा टप्पाही वाढवण्यात येणार आहे.  त्यामुळे पर्यटकही अधिक वाढणार असा अंदाज तज्ञ व्यक्त करीत आहेत.  यासर्वांमुळे काशी नगरी ही भविष्यात देशाची आर्थिक राजधानी होऊ घातली आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.