Home » Ear Piercing : हिंदू धर्मामध्ये लहान बाळांचे कान टोचण्याला आहे मोठे महत्त्व

Ear Piercing : हिंदू धर्मामध्ये लहान बाळांचे कान टोचण्याला आहे मोठे महत्त्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ear Piercing
Share

हिंदू धर्मामध्ये मनुष्याशी संबंधित नानाविध प्रकारचे लहान मोठे विधी केले जातात. बाळ जन्माला आल्यानंतर किंबहुना बाळ येण्याची चाहूल लागली की लगेच या विधींना सुरुवात होते. बाळाचा जन्म झाल्यानंतर लगेच सर्वात आधी बाळाचे कान टोचण्याची परंपरा आहे. मुलगा असो किंवा मुलगी लहान बाळाचे कान टोचलेच जातात. आपल्या घराच्या प्रथेनुसार बाळाच्या जन्मानंतर १२ व्या, १६ व्या किंवा बाळ तीन महिन्याचे होण्याआधी बाळाचे कान टोचले जातात. या प्रथेला कर्ण-वेध संस्कार म्हणतात. हिंदू धर्मातील १६ संस्कारांपैकी हे एक संस्कार आहे. कान टोचण्यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक दोन्ही कारणे सांगितली जातात. या विधीमध्ये लहान मुलांचे कान टोचले जातात आणि सोन्याची किंवा चांदीची तार घातली जाते. यासोबतच मुलाच्या कल्याणासाठी मंत्रांचा जप केला जातो. (Ear Piercing)

लहानपणीच बाळाचे कान टोचले जाणे यामागे वैज्ञानिक कारण सांगण्यात येतं. आपल्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी अॅक्युप्रेशर पॉइंट्स आहेत. त्यामुळे आपण शरीराचं संतूलन राखू शकतो. काही आजारांवर नियंत्रण आणण्याची क्षमता या पॉइंट्समध्ये असते. तसाच पॉइंट कानात असतो. जिथे कान टोचले जातात. तसेच हिंदू धर्म ग्रंथात देखील कर्णवेध संस्काराचा उल्लेख केला गेला आहे. ज्या लोकांचे कर्णवेध संस्कार झालेले असतात, त्यांना अर्धांगवायू, हर्नियासारख्या गंभीर आजारांचा धोका खूप कमी होतो, असे मानले जाते. (Todays Marathi Headline)

धार्मिक मान्यतेनुसार कर्णवेध संस्कार मुलाच्या जन्मानंतर १२व्या किंवा १६व्या दिवशी करावेत. यानंतर, ६, ७ किंवा ८ महिन्यांच्या टप्प्यावर, कान टोचण्याचे विधी केले जाऊ शकतात. त्यानंतर वयाच्या ३, ५ किंवा ७ व्या वर्षीही कर्णवेध संस्कार केले जातात. हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र, कार्तिक, पौष किंवा फाल्गुन हा महिना कर्ण-वेध संस्कारासाठी योग्य मानला जातो. कर्ण-वेध संस्कारासाठीही शुभ मुहूर्त पाहिला जातो. जर कर्णवेध संस्कार बाल वयात केले गेले नसतील तर ते उपनयन संस्काराच्या वेळी म्हणजेच जनेऊ संस्काराच्या वेळीही केले जातात. (Marathi News)

Ear Piercing

हिंदू धर्मात कर्णछेदन विधी हा शास्त्रोक्त पद्धतीने केला जातो. शास्त्रानुसार ब्राह्मण आणि वैश्य वर्णांसाठी हा विधी चांदीच्या सुईने केला जातो. तर क्षत्रियांसाठी हा विधी सोन्याच्या सुईने केला जातो. शूद्र वर्णासाठी हा विधी लोखंडी सुईने केला जातो. हा संस्कार करण्यापूर्वी देवाची पूजा केल्यानंतर मुलांच्या कानात भद्रं कर्णेभि: क्षृणयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:। स्थिरैरंगैस्तुष्टुवां सस्तनूभिर्व्यशेमहि देवहितं यदायु:।। हा मंत्र म्हटला जातो. मुलाच्या प्रथम उजव्या कानात आणि नंतर डाव्या कान टोचले जाते. त्याच वेळी, मुलीच्या कानात प्रथम डाव्या बाजूला आणि नंतर उजवा कान टोचला जोतो. त्यानंतर डाव्या नाकपुडीलाही छेद दिला जातो. पालक त्यांच्या मुलाला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवतात. मग आपल्या देवतेची पूजा केली जाते. त्यानंतर मुलाचे कान सोनार टोचतात. त्यावेळी मंत्रही उच्चारले जातात. (Top Marathi News)

कान टोचण्याचे धार्मिक महत्त्व धार्मिक मान्यतेनुसार, ज्यांनी सनातन धर्मात कर्ण-वेद संस्कार केले नाहीत, ते त्यांच्या पूर्वजांचे श्राद्धविधी करण्यापासून वंचित राहिल्याचे मानले जाते. असे मानले जाते की, कान टोचल्याने व्यक्तीची श्रवणशक्ती तीक्ष्ण होते. ऐकण्याची क्षमता वाढते. सनातन धर्मात लोक मुलांच्या कानात बाली घालत, त्यामुळे कानही टोचले जायचे. आजही देशाच्या काही भागात लोक आपल्या लहान मुलांसाठी कान टोचण्याचा विधी करतात. कर्ण-वेध संस्कार आरोग्याच्या फायद्यांसह बुद्धीला तीक्ष्ण करते, असे मानले जाते. (Latest Marathi Headline)

आपल्या कानाचे इयर लोब्स, म्हणजेच जिथे कान टोचले जातात त्या भागाच्या मधोमध असणारा बिंदू अतिशय महत्वाचा आहे. हा पॉईंट आपल्या प्रजनन करणाऱ्या अवयवांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतो. महिलांच्या मासिक धर्माची नियमितता देखील या बिंदूवर अवलंबून असते. कान टोचल्याने मेंदूचे डावे आणि उजवे भाग सक्रीय राहण्यास मदत होत असून, लहान मेंदूचा विकास होतो. त्यामुळे लहान वयामधेच मुलांचे कान टोचणे गरजेचे असते, कारण या वयातच मेंदूचा सर्वाधिक विकास होत असतो. (Top Stories)

========

Shakambhari Navratra : पौष महिन्यात सुरु होणाऱ्या शाकंभरी नवरात्रीचे महत्त्व

========

इतकेच नाही तर कान टोचल्याने सक्रीय झालेल्या अॅक्युप्रेशर पॉइंट्मुळे मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच त्यांची दृष्टी देखील सतेज राहण्यास मदत होते. दृष्टीबरोबर मुलांची श्रवण शक्ती देखील चांगली राहते. जथे आपला कान टोचला जातो, त्या बिंदुला ‘हंगर पॉईंट‘ असे देखील म्हटले जाते. कान टोचल्याने विचार करण्याची शक्ती वाढते. मुलांचे उच्चारण स्पष्ट होते आणि कानातून मेंदूकडे जाणारी रक्तवाहिनीत रक्त प्रवाह सुरळीत होतो ज्यामुळे व्यक्तीला क्रोधावर नियंत्रण ठेवता येते आणि सहनशीलता वाढते. कानाच्या पाळीमागे दमा व इतर रोगांच्या संबंधीत नसा असतात म्हणून तो भाग टोचलेला असणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.