गणपती बाप्पाची स्थापना झाली की, लगेच लगबग सुरु होते गौराईच्या आगमनाची. माहेरवाशिणी असलेल्या गौरींसाठी प्रत्येक घरात खास तयारी असते. गौरींसाठी खास विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ केले जातात. भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर अनेकांच्या घरी गौरींचे आगमन होते. आपापल्या कुलचाराप्रमाणे या गौरींची, महालक्ष्मीची पूजा आणि स्थापना केली जाते. गौरी पूजन हे भाद्रपद महिन्यातील सर्व स्त्रियांचे महत्त्वाचे व्रत असून, महाराष्ट्रात हा एक मोठा सण साजरा करतात. यालाच गौरी महालक्ष्मी पूजन म्हणतात. तीन दिवसाचा हा सण असतो. पहिल्या दिवशी गौरी आवाहन केले जाते, दुसऱ्या दिवशी या गौरींचे पूजन केले जाते तर तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी गौरी विसर्जित केल्या जातात. पाहूया या गौरींच्या तिन्ही दिवसाच्या पूजेची खासियत. (Ganesh Chaturthi)
गौरी पूजनाचा पहिला दिवस
प्रत्येक ठिकाणी विविध पद्धतीच्या गौरींची स्थापना केली जाते. काही थिलकनी खड्यांच्या, काही ठिकाणी तांब्याच्या, काही ठिकाणी मुखवटे असलेल्या गौरी पाहायला मिळतात. मुखवट्या गौरींमध्ये देखील प्लॉस्टर ऑफ पॅरीसचे मुखवटे, शाडू मातीचे मुखवटे, पितळेची मुखवटे कणकेचे मुखवटे देखील पाहायला मिळतात. परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचे दुध आणि पाण्याने पाय धुतले जातात. घराच्या दारापासून लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवतात. घरात येताना पावलांवरुन गौरींचे मुखवटे आणतात. (Gauri Pujan News)
शंख वाजवून, मंगलध्वनीच्या गजरात, वाजत गाजत गौरीचे घरात आगमन होते. लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी… असे म्हणज गौरी स्थापना करण्यापूर्वी तिला संपूर्ण घरात मिरवत घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा व इतर गोष्टी दाखविण्याची प्रथा असते. मग देवघरासमोर लक्ष्मीची आगमन करुन घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण होवो, सुख- समृध्दी येवो अशी प्रार्थना केली जाते. नंतर तिला तिच्या स्थापनेच्या जागी आणले जाते आणि मुखवटा स्थापित केला जातो. गौरीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात. अनेकांकडे पहिल्या दिवशी संध्याकाळी भाजी-भाकरीचा, ज्वारीच्या कण्याचा नैवेद्य दाखवला जातो. (Marathi News)
गौरी पूजनाचा दुसरा दिवस
दुसर्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे महापूजन केले जाते. या दिवशी गौरींना पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. काही ठिकाणी या दिवशी देवीला खास लाल भोपळ्याचे फुल वाहण्याची देखील प्रथा आहे. ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात आणि महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. गौरींना वेगवेगळे फळे अर्पण केली जातात आणि धान्यांच्या राशी लावल्या जातात. अनेक ठिकाणी आपल्या परंपरेनुसार फुलोरा तयार केला जातो. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. या दिवशी सवाष्णीला देखील जेवायला बोलावले जाते. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते. गौरींची कहाणी वाचली जाते. (Todays Marathi Headline)
=========
Gauri Puja : गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त आणि या सणाचे महत्व
=========
गौरी विसर्जनाचा तिसरा दिवस
तिसर्या दिवशी मूळ नक्षत्रात गौरीचे खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून विसर्जन करतात. या दिवशी कापसाचे गाठ बांधतात. सूतमध्ये हळद, कोरडे फळे, तमालपत्र, फुलं, झेंडूची पाने, काजूची फुलं, रेशीम धागा मिसळतात. गौरींची पूजा आणि आरती करतात. काही ठिकाणी गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे पाण्यात विसर्जन केले जाते. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असलेल्या गौरी नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात. (Top Trending Headline)
दोरकाची पूजा
गौरी विसर्जनाच्या तिसर्या दिवशी काही भागात गौरीच्या पूजेबरोबरच गुंडांना कापसाच्या सोळा गाठी देऊन पूजा करतात. तो गुंडा मग हळदीने रंगवून दोरा घरातील सुना-मुलींच्या गळ्यात बांधतात. अश्विन वद्य अष्टमीची गळ्यावरून काढून पूजा केली जाते. ही दोरी महालक्ष्मी असल्याचे समजले जाते. (Marathi Latest Headline)
ज्येष्ठा गौरीची कहाणी
एक आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. एके दिवशी भाद्रपद महिन्यामध्ये घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजवू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन! (Marathi Trending Headline)
मुलं तिथून उठली, बापाकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणील! बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबापुढं उपाय नाही. मागायला जावं तर काही मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिने त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाने हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचे समाधान केले. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले. (Top Marathi News)
बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जणं आनंदानं निजली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग, घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला बायकोला हाक मारली, अंग ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल आणि तो उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली. (Top Stories)
म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ ! ब्राह्मणानं तसं केलं, गाईम्हशींना हाका मारल्या (त्या) वासरासुद्धा धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणांने त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. (Latest Marathi News)
संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला, मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचत्या कशा करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल? म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच! मला आज पोचती कर! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग! गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. (Top Trending News)
=========
Ashtavinayak : अष्टविनायकांमधील दुसरा गणपती- थेऊरचा चिंतामणी
Radha : राधा अष्टमीचे व्रत म्हणजे काय? कधी केले जाते हे व्रत?
=========
ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. जेष्ठागौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवू घालावं. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख, संतती, संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics