विष्णू जैन हे नाव तमाम भारतीयांना परिचित आहे. राम मंदिर वाद असो वा ज्ञानवापी प्रकरण, विष्णू जैन यांनी न्यायालयात हिंदू पक्षाची बाजू हिरारीनं मांडली आहेत. आता उत्तर प्रदेशच्या संभळमधील जामा मशिद की हरिहर मंदिर प्रकरणातही विष्णू जैन हेच न्यायालयात हिंदू पक्षाची भूमिका मांडत आहेत. संभळ येथे भगवान विष्णूचा दहाव अवतार मानला गेलेल्या कल्की यांचा अवतार होणार आहे. तेथील हरिहर मंदिर हे तमाम हिंदू धर्मियांच्यासाठी मोठे श्रद्धा स्थान आहे. या मंदिरावरील अतिक्रमण दूर करुन मंदिर हिंदूंच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी विष्णू जैन न्यायालयात यात लढा देत आहेत. यासाठी न्यायालयच्या आदेशानं झालेल्या जामा मशिदीची पहाणीमध्ये त्यांचाही समावेश होता. या संभळ प्रकराणावरुन सध्या मोठा गदारोळ उठला आहे. तसेच विष्णू जैन हे नावही पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. वकील असलेल्या विष्णू जैन यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याची बातमी आली आहे. यामुळे विष्णू जैन यांना अधिक सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी वाढली आहे. न्यायालयात हिंदू मंदिरांसंदर्भात सुमारे 110 हून अधिक प्रकरणे हाताळणा-या विष्णू जैन हा सर्व लढा आपण आपल्या आजीच्या तत्वासाठी करत असल्याचे सांगतात. आपली आजी धार्मिक होती. तिनं दिलेल्या शिकवणीतूनच हिंदू धर्माचे महत्त्व समजले. आता आजीच्या निधऩानंतर या धर्माच्या रक्षणासाठीच माझा लढा राहणार असल्याचे विष्णू जैन सांगतात. (Jama Masjid)
उत्तर प्रदेशात अनेक वर्षांपासून मंदिर-मशीद वाद सुरू आहे. बाबरी मशीद नंतर ज्ञानवापी मशीद आणि आता संभळमधील जामा मशिद प्रकरणी वाद सुरु आहेत. या सर्वात एक नाव कॉमन चर्चेत आले आहे, ते म्हणजे, वकील विष्णू जैन यांचे. आपले वडिल ज्येष्ठ वकील हरी शंकर जैन यांच्या खांद्याला खांदा लावून विष्णू जैनही हिंदू धर्मातील वैभव पुन्हा मिळवण्यासाठी लढा देत आहेत. सध्या संभळ जामा मशिद प्रकरणात त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मात्र या सर्व मुद्द्यावर कायदेशीर लढा देणा-या विष्णू जैन यांचा अभ्यास आणि हिंदू धर्मावरील त्यांची निष्ठा हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. विष्णू जैन यांचे वडिल हरिशंकर जैन हे मूळचे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचे रहिवासी आहेत. 1976 पासूनरिशंकर जैन वकिली करत आहेत. विष्णू जैन लहानपणापासून वडिलांचा हा लढा बघत आहेत. त्यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1986 रोजी झाला. वडिलांचाच आदर्श घेऊन त्यांनी 2010 मध्ये बालाजी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवली आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या रामजन्मभूमी खटल्यापासून कायदेशीर कारकिर्दीची सुरुवात केली. 2016 मध्ये सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट पेपर उत्तीर्ण करून त्यांनी नवीन पदवी संपादन केली. सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्याचा परवाना मिळाला आहे. (Social News)
=====
हे देखील वाचा : हिंदूसाठी लढणा-या चिन्मय दास यांना अटक !
========
आतापर्यंत विष्णू जैन यांनी अयोध्या, ज्ञानवापी, कुतुबमिनार आणि ताजमहाल आदी प्रकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपले वडिल हरिशंकर जैन यांच्यासह विष्णू शंकर जैन हे हिंदू फ्रंट फॉर जस्टिस, हिंदू महासभा, गोव्याची सनातन संस्था, भगवा रक्षा वाहिनी आणि हिंद सम्राज पार्टी यांसारख्या अनेक संघटनांशी संबंधित आहे. हे दोघेही पितापुत्र हिंदू धर्माशी संबंधित सुमारे 102 प्रकरणांमध्ये गुंतलेले आहेत. त्यामध्ये मथुरेतील श्री कृष्णजन्मभूमीपासून कुतुबमिनार बांधण्यासाठी मुस्लिम आक्रमकांनी पाडलेल्या 27 हिंदू आणि जैन मंदिरांच्या प्रकरणापर्यंत, ताजमहाल हे पूर्वीचे शिवमंदिर असल्याचा दावा, पूजा कायदा आणि वक्फ कायदा 1995 ला आव्हान देण्याचे प्रकरण यांचा समावेश आहे. विष्णू जैन यांनी लखनौ येथील माऊंड मशिदीची उर्वरित जागा ही गुहा असल्याचा दावाही केला आहे. शिवाय त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत समाविष्ट केलेल्या समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या शब्दांच्या दुरुस्तीच्या वैधतेलाही आव्हान दिले आहे. 2021 मध्ये विष्णू जैन यांनी वडिलांच्या सोबत ज्ञानवापी मशीद प्रकरणावर सात खटले दाखल केले आहेत. त्यात गंगा नदी, देवी नंदी आणि आई शृंगार गौरी प्रकरणाचा समावेश आहे. (Jama Masjid)
सई बने