आयकर विभागानुसार आधीच आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करावे अशा सुचना दिल्या होत्या. मात्र आता ज्या लोकांनी ३० जून २०२३ पर्यंत आपले पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक केले नाही त्यांचे पॅन कार्ड १ जुलै २०२३ पासून इ-ऑपरेटिव्ह झाले आहे. आयकर विभागाने असे म्हटले आहे की, ज्यांचे पॅन आधार कार्डला लिंक केलेले नाही अशा टॅक्सपेअर्सला १५ प्रकारची कामं करता येणार नाहीत. आयकर विभागाने आपल्या वेबसाइटवर या कामांची एक लिस्ट जारी केली आहे. याचा मोठा दुष्परिणाम असा की, टॅक्सपेअर्सला ३१ जुलै पूर्वी आपला आयटी रिटर्न भरता येणार नाही आहे. (ITR Filing)
कारण आयटीआरचा कालावधी समाप्त होण्यास एका महिन्यापेक्षा कमी वेळ राहिला आहे. आयटीआर जमा करण्यासाठी पॅन कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे. तु्म्ही त्या शिवाय रिटर्न फाइल करू शकत नाहीत. जर निष्क्रिय पॅन पुन्हा सक्रिय करायचे असेल तर कमीत कमी ३० दिवस लागतील.
जर तुम्हाला पुन्हा पॅन कार्ड सक्रिय करायचे असेल तर दंड भरल्यानंतर सक्रिय होण्याची वाट पाहत असाल तर आयटीार दाखल करण्याची वेळ निघून जाणार आहे. त्यामुळे जर आयटीआर ३१ जुलै २०२३ नंतर दाखल केलातर बिलेटेड आयटीारच्या रुपात दाखल केला जाईल. लक्षात ठेवा की, बिलेटेड आयटीआर दाखल करण्यासाठी लेट फीज किंवा पेनल्टी भरावी लागेल. जी ५ लाखांपेक्षा अधिक उत्तपन्न असलेल्या व्यक्तींसाठी ५ हजार रुपये आहे. त्याचसोबत पॅन सक्रिय करण्यासाठीची पेनल्टी १ हजार रुपये आहे. अशातच तुम्हाला ६ हजार रुपयांचे पेमेंट करावे लागेल. पॅन आधारला लिंक करण्यासाठी १ हजार रुपये आणि बिलेटेड आयटीआर दाखल करण्याचे ५ हजार रुपये. (ITR Filing)
हेही वाचा- पर्सनल फायनान्ससंबंधित ‘या’ योजना माहितेय का?
कसे कराल अॅक्टिव्ह?
पॅन कार्ड अॅक्टिव्ह करण्यासाठी १ हजार रुपयांची पेनल्टी द्यावी लागेल. त्याचसोबत अथॉरिटीला आधार कार्डची सुचना द्यावी लागेल. यामुळे ३० दिवसांच्या आतमध्ये पॅन कार्ड पुन्हा अॅक्टिव्ह होईळ. तु्म्हाला इनकम टॅक्स-ई फाइलिंग वेबसाइटवर आपल्या अकाउंटला लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर प्रोफाइल सेक्शन मध्ये जा. येथे Links PAN with Aadhar असा ऑप्शन निवडा. येथे महत्त्वाची माहिती द्या. तुम्हाला ई पे टॅक्सच्या माध्यमातून १ हजार रुपयांची पेनल्टी भरावी लागेल. हे पेनल्टी पेमेंट Other payments च्या रुपात घेतली जाईल.