पैसे कमावण्यासह त्याची बचत करणे सुद्धा फार महत्त्वाचे आहेच, पण गुंतवणूक करणे हे त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे. गुंतवणूक करणारे तज्ञ नेहमीच असा सल्ला देतात की, कमी वयातच गुंतवणूक करण्यास सुरुवात केली पाहिजे. मात्र आपण गुंतवणूक करताना काही चुका करतो. त्यामुळे पैशात वाढ होण्याऐवजी नुकसानच अधिक होते. अशातच गुंतवणूक करताना नक्की कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याच संदर्भातील काही खास टीप्स पाहणार आहोत. जेणेकरुन तुमच्या पैशांमध्ये नक्कीच वाढ होईल. (Investment Tips)
-गुंतवणूकीमागील तुमचे लक्ष्य स्पष्ट ठेवा
तुम्ही गुंतवणूक करताना नेहमीच लक्षात ठेवावे की, कोणत्या उद्देशाने गुंतवणूक करत आहात. तुमच्यासोबत त्यामागील उद्देश स्पष्ट असावा. घर खरेदी करणे, संपत्ती, मुलांचे शिक्षण किंवा लग्न अशा विविध गोष्टींसाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही पैसे बचत करण्यासाठी गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी एक मर्यादा ठेवा. आपले आर्थिक उद्देश आणि वेळेच्या मर्यादेच्या आधारावर आपल्या गुंतवणूकीचे लक्ष्य ठरवा. त्याचसोबत हे सुद्धा ठरवा की, तुम्ही गुंतवणूक लहान किंवा दीर्घकालीन काळासाठी करत आहात का याचा विचार करा.गुंतणूकीत जोखिम उचलण्याची तुमची तयारी आहे का हे सुद्धा पहा. जोखिमेशिवाय तुम्हाला अधिक फायदा होणार नाही.
जर तुम्हाला उत्तम रिटर्न्स हवे असतील तर असे गुंतणूकीचे पर्याय निवडा ज्यामध्ये कमी रिस्क आणि उत्तम रिटर्न्स मिळतील. म्युचअल फंड आणि स्टॉक मध्ये असे ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. गुंतवणूक करण्यापूर्वी त्या संदर्भातील सर्व माहिती सुद्धा मिळवा.
-दीर्घकालीन गुंतवणूक करा
तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकीचा पर्याय ही निवडू शकता. कमी अवधीसाठी जर गुंतवणूक करत असाल तर तुमच्या लहान गरजाच पूर्ण होतील. मात्र मोठ्या उद्देशांसाठी तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकीचा पर्याय निवडू शकता. स्टॉक मार्केटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही उत्तम कमाई करू शकता. आपल्या गरजेनुसार आणि एक्सपर्टच्या मदतीने यामध्ये गुंतवणूक करा. जेणेकरुन तुम्ही चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवण्यापासून दूर रहाल. (investment Tips)
-घाई करु नका
आपल्या गुंतवणूकीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी घाई करु नका. आधी पूर्णपणे गुंतणूकीसंदर्भातील विचार करा. कोणत्या उद्देशासाठी तुम्ही किती पैसे गुंतवणार आहात हे सुद्धा पहा. त्याचसोबत गुंतवणूक करण्यासाठी घाई करु नका. तसेच गुंतवणूक केल्यानंतर त्यावर लक्ष सुद्धा ठेवा. जेणेकरुन तुमच्या पैशात वाढ होतेय की नाही हे तुम्हाला कळेल. आपली गुंतवणूक तुम्ही स्टॉक, बॉन्ड, रियल इस्टेट आणि म्युचअल फंडमध्ये विभागू शकता.
-टॅक्सकडे सुद्धा लक्ष द्या
तुम्ही केलेल्या गुंतवणूकीवर किती टॅक्स लावला जातो याची सुद्धा माहिती घ्या. काही गुंतवणूकीतून तुम्हाला उत्तम रिटर्न्स मिळतील. पण त्याचसोबत तुमच्याकडून टॅक्स ही आकारला जाईल. गुंतवणूकीच्या नियमांबद्दल ही अधिक माहिती मिळवा.
हेही वाचा- पर्सनल फायनान्ससंबंधित ‘या’ योजना माहितेय का?
-गुंतवणूकीसाठी भावनात्मक निर्णय घेऊ नका
गुंतवणूकीसाठी भावनात्मक रुपात निर्णय अजिबात घेऊ नका. आपल्या गुंतवणूक योजनेचे पालन करा आणि नियमित रुपात गुंतवणूक केली जाईल याचा प्रयत्न करा. नेहमीच लक्षात ठेवा की, गुंतवणूकीत रिस्क असतेच. पण नेहमीच उत्तम रिटर्न्स मिळतील याची शक्यता ही फार कमी असते. त्यामुळे गुंतवणूक करताना किती पैसे गुंतवावे, कोणत्या योजनेत गुंतवावेत हे जर तुम्हाला माहिती नसेल तर अर्थतज्ञांचा सल्ला घ्या.