Insomniaझोप आपले मन आणि शरिराच्या उपचारासह डिटॉक्सिफिकेशन मध्ये सर्वाधिक महत्त्वाची भुमिका निभावते. परंतु जर तुमची झोप पूर्ण झाली नसेल तर तुम्ही अनिद्रेचे (Insomnia) शिकार होऊ शकता. यामुळे डोके दुखी, थकवा आणि कमात मन न लागणे अशी लक्षण दिसतात. खरंतर झोप पूर्ण न होण्यामागील मुख्य कारण म्हणजे अनहेल्दी लाइफस्टाइल. आजकाल धावपळीच्या आयुष्यात लोक असे काही फूड्स खातात जे आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. हे फूड्स थेट रुपात आपल्या झोपेत अडथळा आणतात. त्यामुळेच नेहमीच हेल्दी फूड्स खावेत असा सल्ला दिला जातो.
‘या’ चुकीच्या सवयीमुळे तुम्ही होता अनिद्रतेचे शिकार
कॅफनेचे सेवन कमी करा
तज्ञांच्या मते, अधिक कॅफेनचे सेवन केल्याने झोप व्यवस्थितीत लागत नाही. त्यामुळे कॅफेनयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. कॉफीमध्ये कॅफेनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्याचे अधिक सेवन करु नये. खरंतर कॉफीमुळे तुमचा मूड उत्तम होतो. पण ती सुद्धा प्रमाणात प्यावी. उत्तम झोप लागावी म्हणून दुपारी १२ वाजव्यानंतर कॅफेनचे सेवन करु नका.
सुर्यास्तानंतर हैवी वर्कआउट करु नका
एक्सरसाइज शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी दोघांसाठी गरजेचे आहे. यामुळे बहुतांश लोक ती सकाळी करतात. हलक्या स्वरुपाचा व्यायाम तु्म्ही संध्याकाळी करु शकता. मात्र संध्याकाळच्या वेळी हैवी वर्कआउट केल्यास तर तुम्ही अनिद्रेचे शिकार होऊ शकता.
रात्री उशिरा जेवणे
जेवण नेहमीच आपल्या वेळेवर करणे अधिक फायदेशीर असते. तुमचे सकाळ, दुपार आणि रात्रीच्या जेवणाची वेळ ठरव आणि त्यानुसार तुमचा आहार खा. असे केल्याने तुमच्या झोपेच्या गुणवत्तेत सुधार होते. त्यामुळे रात्री जेवणासाठी हलका आहार घ्यावा. सुर्यास्ताच्या १-२ तासांआधी जेवण करणे उत्तम मानले जाते. मात्र रात्री ९ नंतर जेवणे टाळावे असे एक्सपर्ट सांगतात.
रात्री मोबाईलचा मर्यादित वापर करा
आजकाल बहुतांश लोक झोपण्यापू्र्वी अधिक वेळ फोनवर घालवतात. असे करणे हानिकारक आहे. रात्रीच्या वेळी फोनचा अधिक वापर केल्याने तुमची झोप डिस्टर्ब होऊ शकते.याचा मानसिक आरोग्यावर ही परिणाम होतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी १ तास आधी गॅजेट्सचा वापर करु नये. असे केल्याने तुम्हाला सातत्याने काम केल्यानंतर तुमच्या मेंदूला आराम ही मिळेल. (Insomnia)
हेही वाचा-Period Pain Home Remedies: मासिक पाळी दरम्यान होतात असह्य वेदना तर मग ‘हे’ घरगुती उपाय करा
सकाळच्या उन्हात जा
सकाळच्या उन्हात व्हिटॅमिन डी असते. जे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्याचसोबत तुमच्या झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा होतो. सकाळी किंवा संध्याकाळी थोडावेळ सुर्यकिरणांच्या संपर्कात राहिल्यास तर उत्तम झोप येऊ शकते.