उन्हाच्या झळा जाणवू लागल्याबरोबर पहिली आठवण येते ती उसाच्या रसाची. घराबाहेर पडल्यावर उन्हाचा त्रास जाणवू लागला की, पहिली पावलं वळतात ती अशाच रसवंतीकडे. फक्त उन्हाळ्यातच नाही, तर सर्वच ऋतुंमध्ये हा उसाचा रस आरोग्यदायी ठरतो. उसाच्या रसामध्ये भरपूर प्रोटीन असते. त्यामुळे उसाचा रस (Sugarcane juice) हा किडनीला उत्तमरित्या काम करण्यास मदत करतो. उसाच्या रसाच्या नियमित सेवनामुळे युरिन मध्ये होणारी जळजळ कमी करण्यास देखील मदत होते. उन्हाळ्यात हा त्रास अनेकांना जाणवतो. अशावेळी ही उसाचा रस वरदान ठरू शकतो. मात्र उसाचा रस शक्यतो ताजा घ्यावा आणि त्यात कधीही बर्फ टाकू नये. बर्फ टाकलेला उसाचा रस हा आरोग्यदायी कमी पण आरोग्यासाठी मारकच जास्त ठरतो.
उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक पसंती मिळते ती उसाच्या रसाला. एप्रिल आणि मे महिन्यात या रसवंती हाऊसफुल्ल असतात. उन्हाळ्यामध्ये उसाचा रस (Sugarcane juice) पिण्याची मजा काही औरच असते. पण केवळ मजा म्हणून नाही तर आरोग्यासाठी फायद्याचा म्हणूनही हा उसाचा रस रोज घेतला पाहिजे असाच आहे. उसाचा रस रोज प्यायल्यास त्यामुळे उन्हामुळे होणारा त्रास कमी होतो. शरीरातील पाण्याची कमतरता दूर होऊन, शरीराला भरपूर उर्जा देण्याचे काम हा उसाचा रस करतो. तसेच त्याच्या नियमित सेवनामुळे उन्हाळ्यात होणा-या आजारांनाही दूर करता येते. उसाचा रस (Sugarcane juice) आरोग्यास अत्यंत फलदायी असतो. उसाच्या रसात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी तत्वे असतात. त्यामुळे हाडे मजबूत होतात. शिवाय दातांच्या समस्याही कमी होतात. उसाच्या रसात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते. त्यामुळे हा मधुमेह ज्यांना आहे, त्यांनाही फायदेशीर पडतो. रोज एक उसाचा रस प्यायल्यास त्यापासून अनेक फायदे मिळतात.
मुख्य म्हणजे हा रस (Sugarcane juice) किडनीसाठी वरदान मानला गेला आहे. उसाच्या रसामध्ये भरपूर प्रोटीन असते. त्यामुळे उसाचा रस हा किडनीला उत्तमरित्या काम करण्यास मदत करतो. उसाच्या रसाच्या नियमित सेवनामुळे युरिन मध्ये होणारी जळजळ कमी कमी होते. उन्हाळ्यात बऱ्याच वेळा शरीरातील पाणी कमी झाल्यावर असाप्रकारची जळजळ होते. उसाचा रस घेतल्यास ही जळजळ दूर होते. उन्हाळ्यात ज्यांना बाहेर फिरण्याचे काम असते, त्यांना ब-याचवेळा डिहायड्रेशनचा त्रास जाणवतो. अशांनी दिवसातून किमान एक ग्लास उसाचा रस प्यायल्यास शरीरातील पाण्याची मात्रा योग्य राहण्यास मदत होते.
उसाच्या रसामध्ये (Sugarcane juice) कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयरन आणि मॅग्नीज बऱ्याच प्रमाणात असते. त्यामुळे उसाच्या रसाचे नियमितपणे सेवन केल्यास इलेक्टरोलाईट्स आणि शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. उसाच्या रसामध्ये ग्लुकोज आणि इलेक्टरोलाईट्स भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे नियमीत उसाचा रस घेतल्यास शरीराला उर्जा मिळते. याबरोबरच उसाच्या रसात मिनरल्स, पोटॅशियम आणि नेचरमध्ये अल्कलाईन असल्यामुळे दातांचा इन्फेक्शनपासून बचाव होतो. मुख्य म्हणजे, उसाच्या रसात असलेल्या विशिष्ट तत्वांमुळे कॅन्सरसारख्या रोगापासूनही शरीराचा बचाव करता येतो.
=======
हे देखील वाचा : रोगांच्या पेशी नष्ट करू शकते आणि ट्यूमर तयार होण्यापासून थांबवू शकते
=======
मात्र उसाचा रस (Sugarcane juice) जेवढा फायदेशीर आहे, तसाच त्याचा तोटाही होऊ शकतो. मुळात उसाचा रस हा थोडं आलं आणि लिंबू टाकून घेतला जातो. यामुळे पचनक्रीया अधिक सुदृढ होते. पण याच उसाच्या रसात बर्फ टाकून घेत असाल तर सावध व्हायला हवे. कारण उसाचा रस बर्फ टाकून घेतला, तर त्याचा पहिला परिणाम हा पचनक्रियेवर होतो. फुफ्फुसेही खराब होण्याची शक्यता असते. मुळात बर्फ करण्यासाठी कुठले पाणी वापरले आहे, याची माहिती नसते. त्यामुळे दुषित पाण्यापासून तयार झालेला बर्फ आपल्या शरीरात गेला तर, हिपॅटायटीस ए आणि ई विषाणूचा धोका असतो. अशामुळे काविळ होण्याची शक्यता असते. बरेचवेळा काविळ झाल्यावर उसाचा रस प्यायचा सल्ला देण्यात येतो. पण हा रस बर्फ टाकून प्यायल्यास त्याचा परिणाम शून्य असतो. शिवाय हा थंड रस प्यायल्यावर उन्हात गेल्यास अनेकांना डोकेदुखीचा त्रास जाणवतो. काहींचा घसाही खवखवू लागतो. काहीवेळा असा बर्फ घातलेला रस प्यायल्यावर पोटही फुगिर झाल्याचे जाणवते. गॅसचा त्रास जाणवू लागतो. कारण हा थंडगार रस पचनक्रियेसाठी हानिकारक असतो. त्यामुळे उसाच्या रसाचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच तोटे उसाच्या रसात बर्फ टाकून प्यायल्यानं होतात, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
सई बने