उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरु झाला की नागरिकांना दिलासा मिळतो. कारण वातावरणात पावसामुळे गारवा निर्माण होतो. परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असले तरीही अर्धा जून महिला गेला तरी पाहिजे तसा पाऊस अद्याप सुरु झालेला नाही. कारण मध्येच उन्हाची किरणांची झळाळी तर मध्येच पावसाच्या सरी कोसळतात. त्यामुळे हवामानात अगदी बदल होऊन गेला आहे. परंतु आपल्याला हवामानात झालेल्या बदलांचे अपडेट हे हवामान खात्याकडून दिले जाते. कारण जेव्हा पाऊस पडणार असतो तेव्हा तो कधी, कुठे आणि कोणत्या स्वरुपात पडणार या बद्दल ही माहिती हवामान खाते देते. प्रत्येक वातावरणाच्या बदलाचे अपडेट हे हवामान खात्याकडून जरी दिले जात असले तरीही त्यांना याबद्दल कळते कसे? तर आपण यावरच अधिक जाणून घेणार आहोत की, हवामान खात्याला पाऊस कुठे आणि कधी पडणार हे कसे कळते?(Monsoon prediction)
एका महाविद्यालयाच्या रिपोर्टनुसार असे सांगण्यात आले आहे की, वातावरणात जे काही बदल होतात ते हवेच्या स्थितीवर अवलंबू असते. त्यामुळे ही प्रक्रिया सातत्याने सुरु असते. त्यावरुनच हवामान खाते वातावरणाची स्थिती पाहून काही गोष्टींचा अंदाज लावतात. तर पावसाचे पूर्वानुमान लावण्यासाठी विविधी स्थितींसंदर्भात एकत्रित करण्यात आलेल्या डेटाचा सुद्धा विचार केला जातो. या डेटावर काम ही केले जाते. त्यानुसार हवेची स्थिती, वेग यावरुन अमुमान लावले जाते. सध्याची स्थिती आणि त्याच्यात होणारे बदल याचा हवामान खात्याकडून अभ्यास केला जातो. त्यानंतरच पाऊस कोणत्या ठिकाणी, कधी आणि कोणत्या स्वरुपात पडेल याचा अंदाज बांधला जातो.
हे देखील वाचा- पावसाळ्यात सुरक्षित वाहन चालवण्यासाठी ‘या’ चुका करणे टाळा

हवामान खात्याकडून ज्या हवामानाच्या बदलाचा डेटा एकत्रित केला जातो त्यामध्ये जमिनीचा आढावा, विमानाचा आढावा, रेडिओ ध्वनी, डॉपलर रडार, सॅटेलाइट यांचा समावेश असतो. त्यानंतर या सुचनांबद्दल पर्जन्य विज्ञान केंद्राला सांगितले जाते. तेथून या डेटाच्या आधारावर वैज्ञानिकांकडून पुर्वानुमान लावला जातो. दरम्यान, यामध्ये हाय-स्पीड कंप्युटर, हवेसंदर्भातील नकाशे हे फार महत्वाचे असतात. डेटा आणि या नकाशांच्या माध्यमातून अंदाज लावला जातो. तसेच हा अनुमान काही आधारांवर ही लावला जातो. जसे एक आढावा हा दीर्घकाळासाठी असतो तर एक त्याच दिवशीचा अंदाज असतो. काही आढावे हे दीर्घ काळाच्या आधारावर केले जातात. पावसाच्या अंदाजासाठी हाय-स्पीड कंप्युटरसह मान्सून संदर्भातील उपग्रह आणि मान्सूर रडार हे फार महत्वाची भुमिका बजावतात.(Monsoon prediction)