Home » Instagram : इंस्टाग्राम हॅक होऊ नये म्हणून फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Instagram : इंस्टाग्राम हॅक होऊ नये म्हणून फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

by Jyotsna Kulkarni
0 comment
Instagram
Share

आजचे जग हे सोशल मीडियामय झाले आहे. किंबहुना सोशल मीडिया ही आजच्या आधुनिक काळाची गरज बनली आहे. एवढेच काय तर सोशल मीडिया हे उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन देखील बनले आहे. त्यामुळेच सोशल मीडिया वापरत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. तरुणांपासून, वयस्कर लोकांपर्यंत सर्वच सोशल मीडियाचा सर्रास वापर करतात. याच सोशल मीडियामधील एक अतिशय लोकप्रिय ॲप म्हणजे ‘इंस्टाग्राम’. मोठ्या सेलिब्रिटी, खेळाडू, राजकरणींपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांचेच अतिशय आवडते ॲप म्हणजे इंस्टाग्राम. दिवसेंदिवस या इंस्टाग्रामची लोकप्रियता कमालीची वाढताना दिसत आहे. (Instagram)

मात्र अशातच जिथे इंटरनेट आणि टेक्नोलॉजीमुळे आपली करमणूक होत असताना दुसरीकडे याचा गैरवापर देखील खूपच वाढल्याचे चित्र आहे. याच टेक्नोलॉजीमुळे अनेकांची फसवणूक होत आहे. हल्ली अकाउंट हॅक होण्याच्या समस्या वाढल्या आहेत, ज्या अंतर्गत तुमची माहितीही चोरली जाण्याची शक्यता असते. या माहितीचा दुरुपयोग देखील केला जातो. त्यामुळेच आपण कायम आपले सोशल मीडिया वापरताना अलर्ट राहिले पाहिजे. यासाठीच आज आपण या लेखातून तुमचे इंस्टाग्राम हॅक होऊ नये म्हणून काही टिप्स तर जाणून घेणार आहोतच सोबतच जर तुमचे इंस्टाग्राम हॅक झालेच तर काय करावे हे देखील पाहणार आहोत. (Marathi)

जर तुम्हाला तुमचे खाते हॅक होण्यापासून वाचवायचे असेल तर तुम्हाला काही खास सेटिंग्ज करणे फार महत्वाचे आहे. तुमचे Instagram खाते सुरक्षित ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे टू फॅक्टर ऑथँटिकेशन चालू करणे. हे तुमच्या खात्यात सुरक्षिततेचा आणखी एक स्तर जोडते. जेव्हा तुम्ही नवीन फोन किंवा कॉम्प्युटरवरून लॉग इन करता, तेव्हा तुमच्या मोबाइलवर एक कोड पाठवला जाईल, जो तुम्हाला टाकावा लागेल. ते सुरू करण्यासाठी, तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. (Marathi News)

यासाठी सर्वप्रथम तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करून सेटिंगमध्ये जा. यानंतर आता सिक्युरिटीवर जा आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशनवर क्लिक करा. येथे तुम्हाला SMA किंवा ॲप निवडावे लागेल तुम्हाला योग्य असा ऑप्शन निवडा. नंतर येथे जा आणि लॉगिन क्रियाकलाप तपासा. तुमच्या अकाऊंटवर कोणी, केव्हा आणि कोणत्या डिव्हाइसवरून लॉग इन केले आहे हे तुम्ही तुमची लॉगिन क्रियाकलाप वर पाहू शकता. यासाठी सेटिंग्जमधील सिक्युरिटीमध्ये जाऊन लॉगिन ॲक्टिव्हिटीवर क्लिक करा. कोणतेही उपकरण लॉग इन केव्हा झाले ते येथे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला कोणतेही अनोळखी उपकरण दिसल्यास ताबडतोब लॉगआउट करा. (Todays Marathi Headline )

Instagram

नेहमी असा पासवर्ड ठेवा जो अवघड असेल आणि जो कोणी सहज उघडू शकत नाही. त्यात अक्षरे, संख्या आणि विशेष चिन्हे यांचे मिश्रण असावे. वेळोवेळी पासवर्ड बदलत राहा आणि कोणाशीही शेअर करू नका. तुमची सुरक्षा सेटिंग्ज वेळोवेळी तपासत राहा. तुमचा ईमेल आणि फोन नंबर बरोबर असल्याची आणि खात्याशी लिंक केलेली असल्याची खात्री करा. (Top trending headline)

आता जर दुर्दैवाने तुमचे इन्स्टाग्राम अकाऊंट कधी हॅक झाले असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. काही सोप्या स्टेप्सचे अनुसरण करून, तुम्ही तुमचे अकाऊंट रिकव्हर करू शकता आणि ते पुन्हा सुरक्षित देखील करू शकता. सर्वात आधी तुमचे इन्स्टाग्राम हॅक झाले हे कसे ओळखायचे तर, तुम्हाला याचे काही संकेत मिळतात. जसे की तुमचे अकाऊंट आपोआप खाते लॉगआउट, लॉगिन ईमेल किंवा पासवर्ड बदलाची सूचना, आपल्या परवानगीशिवाय पोस्ट किंवा स्टोरी अपलोड करणे, ईमेल आणि मोबाइल नंबर स्वयंचलित बदलणे आणि मित्रांना स्पॅम संदेश पाठविणे. जर असे काही घडत असेल तर समजा तुमचे इन्स्टाग्राम अकाऊंट धोक्यात आहे किंवा ते हॅक झाले आहे. (Top Marathi Headline)

इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्यास काय करावे?
लॉग इन करता येत असेल तर आधी पासवर्ड बदलावा. यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन सिक्युरिटीच्या पर्यायावर क्लिक करावे. यानंतर पासवर्ड पर्यायात जाऊन पासवर्ड बदलावा. जर इन्स्टाग्रामने आपल्याला संशयास्पद हालचालींचा ईमेल पाठविला आणि विचारले की हे आपण आहात का? तर नाही हा पर्याय निवडावा आणि तो मी नाही असा मेल करावा. सोबतच सांगितलेल्या मार्गदर्शकाचे अनुसरण करावे. लॉग इन करता येत नसल्यास ‘गेट हेल्प लॉगिंग इन’ फीचरचा वापर करावा. यासाठी ईमेल, युजरनेम किंवा फोन नंबर टाका. इन्स्टाग्राम तुम्हाला रिकव्हरी लिंक पाठवेल. (Latest Marathi News)

========

Bridal Lehenga Care : ब्राइडल लेहेंगा घातल्यानंतर अशी घ्या काळजी, पुन्हा वापरताना दिसेल नवाकोरा

========

जर हॅकरने पासवर्ड बदलला असेल पण ईमेल बदलला नसेल तर इन्स्टाग्राम संशयास्पद लॉगिन प्रयत्न मेल पाठवेल. यात दिलेल्या लिंकवरून तुम्ही तुमचे अकाऊंट रिकव्हर करू शकता. जर काहीच काम करत नसेल तर इन्स्टाग्राम सपोर्टवर जा. अकाऊंट रिकव्हरसाठी प्रोफाईल फोटो, युजरनेम, मेल आदी ओळखीचा पुरावा आवश्यक असेल. अनेक प्रकरणांमध्ये, इन्स्टाग्राम आपल्याला सेल्फी व्हिडिओ मागते जेणेकरून आपली ओळख कन्फर्म होऊ शकेल. (Top Stories)

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) चालू करा. यासाठी प्रत्येक लॉगिनवर एक कोड लागेल, जो तुमच्या फोनवर येईल. कोणत्याही अनोळखी अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस देऊ नका. अनावश्यक थर्ड पार्टी प्रवेश काढून टाका. तुमचा ईमेलही सुरक्षित ठेवा. इन्स्टाग्रामशी संबंधित ईमेलही सुरक्षित असणे आवश्यक आहे. त्यातही 2FA चालू करा. अनेकदा इन्स्टाग्रामसारखी दिसणारी फेक लिंक DM ला किंवा ईमेलमध्ये पाठवली जाते. त्यावर क्लिक करून लॉगिन डिटेल्स टाकू नका. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.