प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. जो पौर्णिमेच्या चार दिवसांनी येतो. कृष्ण पक्षातील चौथी तिथी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी, भाविक सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात जो चंद्रदर्शनानंतर उपवास सोडतात. यावेळी डिसेंबर महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अखुरथ संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. तसेच जीवनात सुख-समृद्धी नांदते. तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागत सर्व प्रकारच्या कष्टांपासून मुक्तता मिळते. (Chaturthi)
पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी रविवार, ७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ०६.२४ वाजता सुरु होईल आणि या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी ८ डिसेंबर सोमवार रोजी संध्याकाळी ०४.३० वाजता संपणार आहे. या दिवशी पूजा करण्यासाठी मुहूर्त सकाळी ०८.१९ मिनिटांपासून दुपारी ०१.३१ वाजेपर्यंत तर संध्याकाळी ०५.२४ वाजल्यापासून रात्री १०.३१ वाजेपर्यंत मुहूर्त असणार आहे. अखुरथ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोद्याची वेळ रात्री ०७.५५ वाजता असणार आहे. (Sankashti Chaturthi)
संकष्टी चतुर्थी पूजाविधी
धार्मिक मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नानादीपासून निवृत्त व्हा. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पित करा. देवघरात स्वच्छता करा. त्यानंतर गंगाजल शिंपडून पवित्र करा. चौरंगावर गणपतीची मूर्ती ठेवा. त्यानंतर शिवपरिवाराची मूर्ती ठेवा. गणपतीला फळं, फुलं, दूर्वा, मोदक आणि सिंदूर अर्पित करा. त्यानंतर तुपाचा दिवा लावा. गणपतीची विधिपूर्वक पूजा करा. गणपतीची आरती करावी शेवटी बाप्पाला मोदक किंवा मोतीचूर लाडूचा नैवेद्य अर्पण करावा. शेवटी कळत न कळत झालेल्या चुकांची क्षमा मागत देवाला नमस्कार करा. चतुर्थीच्या दिवशी चंद्रला अर्घ्य अर्पण करणे शुभ मानले जाते. (Latest Marathi Headline)

चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यांनतर चंद्राला अर्घ्य द्यावे. चंद्रला अर्घ्य देण्यासाठी चांदीच्या पेल्यात किंवा तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यावे. या भांड्यात कच्चे गाईचे दूध, अक्षता आणि काही पांढरी फुले टाकावीत. चंद्राला अर्घ्य अर्पण करताना चंद्र देवाचे स्मरण करावे. हळूहळू चंद्राला अर्घ्य घ्यावे. लक्षात ठेवा, चंद्राला अर्घ्य अर्पण करताना पायावर पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी. चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यावरच हे व्रत पूर्ण होते. अशी मान्यता आहे. (Top Marathi News)
संकष्टी चतुर्थीला श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकटे दूर होतात. श्री गणेशाला विघ्नहर्ता असे म्हणतात. त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. हे व्रत पाळल्याने घरात सुख-समृद्धी येते. आर्थिक लाभामुळे व्यवसाय वाढेल. श्रीगणेशाच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात. श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व संकटांचा नाश होतो. श्रीगणेशाला संकटविघ्न निवारक म्हणून ओळखले जाते. त्याची पूजा केल्याने जीवनातील अडचणींवर मात केली जाते. हे व्रत केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते. (Top Trending News)
=======
Linga Devi : समंथाने केलेले ‘भूत शुद्धी विवाहपद्धती’ने केलेले लग्न म्हणजे काय?
=======
आर्थिक लाभ होऊन व्यवसायात प्रगती होते. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने इच्छित गोष्टी साधता येतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ‘ऊं गं गणपतये नम:’ या मंत्राचा जप केल्यास जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करण्यासाठी हा मंत्र शुभ मानला जातो. या मंत्राचा जप करत २१ वेळा करू शकता. अखुरथ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गरीब आणि गरजूंना विविध वस्तूंचे दान करावे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी स्वेटर, ब्लँकेट आणि रजाई दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन टाळावे. राग टाळा आणि घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पशु-पक्ष्यांना अन्न-पाणी द्यावे. (Social News)
(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
