नुकतेच भारताच्या गुप्तचर विभागाने त्यांना मिळालेल्या माहितीच्या जोरावर प्रसिद्ध यूटुबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. भारताच्या गुप्तचर यात्रेच्या रडारवर ती मागील अनेक दिवसांपासून होती. अखेर तिला मे २०२५ मध्ये हरियाणातील हिसार इथे असलेल्या घरातून अटक करण्यात आली. ही बातमी समोर आल्यानंतर अनेकांना नवल वाटले असेल की, एका यूटुबरवर आपल्या गुप्तचर यंत्रणांना कसा काय संशय आला असेल? तिला कसे ट्रॅक केले असेल? आदी बरेच प्रश्न अनेकांच्या डोक्यात पिंगा घालत असतील. (Raw)
शिवाय आपल्या गुप्तचर यंत्रणा कसल्या भारी आहेत, कसे त्यांनी ज्योतीला बरोबर पकडेल… असे संवाद ऐकायला मिळत असतील. याच गप्पांच्या विचारांच्या ओघात अजून प्रश्न निर्माण होत असतील जसे की, मग या गुप्तचर यंत्रणा काम कशा करत असतील? इथे नक्की कोणते कोणाला भरती केले जाते? आपले एजंट असतात त्यांना कसे आणि कोणते प्रशिक्षण देतात? अनेक बॉलिवूड हॉलिवूड चित्रपटांमध्ये जसे छुपे एजंट असतात अगदी तसेच असते का? वगैरे वगैरे… चला तर जाणून घेऊया या सर्व प्रश्नाची उत्तरं. (Marathi News)
भारताच्या गुप्तचर यंत्रणेचे नाव आहे, ‘रॉ’ (Research and Analysis Wing, RAW). ही गुप्तचर संस्था संपूर्ण जगामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. प्रत्येक देशाची स्वतःची अशी एक गुप्तचर यंत्रणा असते. देशाच्या सुरक्षेमध्ये ही यंत्रणा मोठा वाटा उचलत असते. आपल्या देशाची खासगी आणि महत्वाची माहिती देशाबाहेर जाऊ न देणे, दुसऱ्या देशातून त्यांची गुप्त माहिती काढणे असे जोखमीचे कामं या संस्थेद्वारे केले जातात. देशाच्या संरक्षणात या संस्थेचे स्वतःचे महत्त्व आहे. भारताची ही गुप्तचर संस्था देशाशी संबंधित गुप्त माहिती लीक होण्यापासून रोखते आणि परदेशातून माहिती मिळवते. ‘रॉ’चे सचिव आणि विशेष सचिव हे भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) यांच्याशी थेट संपर्कात असतात. (Marathi Latest News)
भारत सरकार ‘रॉ’ला कॅबिनेटअंतर्गत यंत्रणा म्हणून वर्गीकरण करते. ‘रॉ’च्या मोहिमा, आर्थिक व्यवहार इत्यादी गोष्टीही संसदेत जाहीररित्या सांगितले जात नाहीत. ‘इंटर्नल ऑडिट’ म्हणून ‘रॉ’च्या कारवाया वर्गीकृत केल्या जातात. ‘रॉ’ची कोणतीही माहिती सार्वजनिक केली जात नाही. माहिती अधिकार कायद्याच्या कलम २४ नुसार ही सूट ‘रॉ’ला देण्यात आलीय. महत्त्वाच्या अधिकृत बैठका, परिसंवादांना केवळ ‘रॉ’चे वरिष्ठ आणि अतिमहत्त्वाचे अधिकारीच उपस्थित राहतात. त्यामुळे ‘रॉ’च्या अधिकाऱ्यांची ओळख आणि कारवाया यांबाबत गुप्तता पाळली जाते. (Marathi Trending News)
========
हे देखील वाचा : Indian Spy : शत्रूने कापले होते ज्यांचे स्तन अशा भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेर नीरा आर्य
========
भारतात ‘रॉ’ची एकूण सात कार्यालये आहेत. उत्तर विभाग (जम्मू), पूर्व विभाग (कोलकाता), दक्षिण-पश्चिम विभाग (मुंबई), उत्तर-पूर्व विभाग (शिलाँग), दक्षिण विभाग (चेन्नई), मध्य विभाग (लखनऊ) आणि पश्चिम विभाग (जोधपूर) अशी ही कार्यालये आहेत. याशिवाय, वेगवेगळ्या नावांनी भारतातील वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये ‘रॉ’ची कार्यलायं कार्यरत आहेत. फिल्ड स्टाफचं म्हणजे एजंटचं काम अशा कार्यालयांमधून चालतं.
‘रॉ’ कार्यालयांमध्ये प्रामुख्याने सचिव, विशेष सचिव, अतिरिक्त सचिव, संयुक्त सचिव, संचालक, उपसंचालक, ट्रान्सफर ऑफिसर, वरिष्ठ फिल्ड ऑफिसर, फिल्ड ऑफिसर, डेप्युटी फिल्ड ऑफिसर, असिस्टंट फिल्ड ऑफिसर, मंत्रालय कर्मचारी यांचा समावेश होतो. ‘रॉ’ या यंत्रणेमार्फतच अनेकदा आपल्या देशाला दहशतवाद्यांपासून, अतिरेक्यांपासून धोका आहे हे समजत असते. रॉ इंटेलिजन्स एजन्सीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. ‘धर्मो रक्षति रक्षितः’ म्हणजे ‘धर्माचे रक्षण करणारी व्यक्ती नेहमीच सुरक्षित असते’ हे रॉचे तत्व आहे. (Top Trending News)
राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय स्तरावर या एजंट्सच्या माध्यमातून गुप्तपणे कारवाया केल्या जातात. या यंत्रणेचे काम जितके जोखमीचे, जिकरीचे, मोठे आणि महत्वाचे असते तितकेच किंबहुना त्याहून अधिक कठीण असते या यंत्रणेमध्ये नोकरी मिळवणे. हो जर तुम्हाला रॉ मध्ये जॉब करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही शारीरिक आणि मानसिक दोन्ही रूपात एकदम फिट असणे आवश्यक असते. याशिवाय देखील अनेक अशा बाबी आहेत ज्यांमध्ये तुम्ही हुशार नाही तर सर्वश्रेष्ठच असणे गरजेचे आहे. मग या संस्थेमध्ये जॉब कसा मिळवायचा? (Social MEdia)
रॉ एजन्सीची कोणतीही वेबसाइट नाही किंवा यांची कोणतीही थेट भरतीही होत नाही. यासाठी तुम्ही डेप्युटी फील्ड ऑफिसर, कॅबिनेट सचिवालय आणि भारत सरकार यांच्याकडून येणारा फॉर्म भरता येतो. याशिवाय नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन आणि एसएससीची परीक्षा देऊन तुम्ही या एजन्सीमध्ये भरती होऊ शकता. सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करणाऱ्या उमेदवारांची रिसर्च अॅनालिसिस विंगसाठी देखील निवड केली जाते. नागरी सेवा अभ्यासक्रम संपल्यानंतर लगेच रॉ संस्थेत कॅम्पस भरती येते आणि काही मानसिक चाचण्या केल्यानंतर, उमेदवाराला दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. पुढे त्या उमेदवाराची कामगिरी पाहून मग त्याला टीमचा एक भाग बनवले जाते. (Top Stories)
डिफेन्स अर्थात संरक्षण दलात असणाऱ्या लोकांना देखील या एजन्सीमध्ये जाता येते. सशस्त्र दल किंवा नागरी सेवांमध्ये काही वर्षे काम केल्यानंतर तुम्ही रॉसाठी प्रयत्न करू शकता. याशिवाय, तुम्ही इंटेलिजन्स ब्युरो (IB) द्वारे रॉ मध्ये देखील जाऊ शकता. आयबीतून एसए किंवा एसीआयओ थेट भरती केली जाते. रॉ मध्ये भरती होण्याचा कोणताही थेट मार्ग नाही. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन आयपीएस किंवा आयएफएस पदावर नोकरी मिळवणे हा यासाठी सर्वात थेट आणि सर्वोत्तम मार्ग आहे. रॉमध्ये फक्त आयपीएस किंवा सशस्त्र दलातील अधिकारी नियुक्त केले जातात. (Social Update)
RAW एजंट होण्यासाठी पात्रता
– उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
– उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
– अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व असावे.
– उमेदवाराला कॉम्प्युटर ऑपरेशन आणि कॉम्प्युटर भाषेचे ज्ञान असावे.
– अर्जदाराचा कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा.
– उमेदवाराला कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थाची सवय नसावी.
– अर्जदार अविवाहित असणे आवश्यक आहे.
– उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा.
– उमेदवाराचे वय ५६ वर्षांहून कमी असणे बंधनकारक आहे.
========
हे देखील वाचा : Pakistan : पाकिस्तान पाण्यासाठी अफगाणिस्तानवर अवलंबून राहणार !
========
रॉ एजंट प्रशिक्षण
निवड झाल्यानंतर, सुरुवातीला रॉ एजंटला प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये परदेशी भाषा शिकवली जाते. आयएसआय, मूसाद, सीआयए आदी महत्वाच्या गुप्तचर संस्थांविषयी माहिती दिली जाते. याशिवाय अंतराळ तंत्रज्ञान, दळणवळण तंत्रज्ञान, आर्थिक माहिती, ऊर्जा सुरक्षा आणि विज्ञानविषयक माहिती देखील या एजेंटला दिली जाते.
रॉ एजंट पगार
RAW एजंटला विविध फायदे आणि भत्त्यांसह चांगला पगार दिला जातो. असे असले तरीही रॉ एजंटला नेमका किती पगार मिळतो, याबद्दल तशीअधिकृत माहिती नाही. तरी त्यांचा हा पगार ८० हजार ते १ लाख रुपयापर्यंत असू शकतो असे सांगितले जाते. RAW एजंट आणि अधिकाऱ्यांना आर्थिक वर्षात दोन महिन्यांचा अतिरिक्त पगार मिळतो. परदेशात पोस्ट केलेले RAW कर्मचारी विशेष महागाई वेतन तसेच परदेशी सेवा भत्ता मिळण्यास पात्र असतात. त्यांना एक अद्वितीय सुरक्षा भत्ता देखील मिळतो, जो त्यांच्या एकूण उत्पन्नापेक्षा जास्त असू शकतो, तसेच मूळ वेतन आणि महागाई भत्ता देखील मिळतो. (Top Stories)