Home » ‘या’ घरगुती उपायांनी डोळ्याखालील डार्क सर्कल्स करा कमी

‘या’ घरगुती उपायांनी डोळ्याखालील डार्क सर्कल्स करा कमी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dark Circles
Share

आजच्या काळात प्रेसेंटेबल राहणे खूपच महत्वाचे आहे. अनेकांना घरात बाहेर एकदम टापटीप राहायला फार आवडते. यासाठी मेकअप करणे देखील अत्यावश्यक आहे. मात्र मेकअप कितीही केला स्त्री आपला चेहरा स्वच्छ आणि सुंदर असायला देखील तितकेच महत्व आहे. आपला चेहरा नीट दिसण्यासाठी आपण घरच्या घरी पार्लरमध्ये जाऊन विविध उपाय करत असतो. आपल्या चेहरा आपण कितीही चांगला केला आणि कितीही मेकअप केला तरी डोळ्या खाली आलेली काळी वर्तुळं प्रत्येकाच्या सौंदर्यात बाधा आणतात.

डोळ्या खाली आलेली काळी वर्तुळं घालवण्यासाठी बरेच लोकं महागडी ट्रीटमेंट घेतात. मात्र तरीही त्यांना तात्पुरता फरक पडतो. त्यानंतर पुन्हा ही काळी वर्तुळं तयार होतात. ही काळी वर्तुळं तयार होण्याची अनेक कारणं असतात. त्यात झोपेची कमी, ताण-तणाव, चुकीची जीवनशैली, आहारातील कमतरता, तासनतास कॉम्प्युटरवर काम किंवा वाढते वय आदी मुख्य कारणं असतात. या काळ्या वर्तुळांवर अनेक घरगुती उपाय करतात येतात, जे फायदेशीर आणि सोपे आहेत. जाणून घेऊया कोणते उपाय आहेत ते.

डार्क सर्कल घालवण्याचे घरगुती उपाय

१. टोमॅटो आणि लिंबू
टोमॅटो डार्क सर्कल कमी करण्याबरोबरच त्वचा मुलायमही बनवतो. एक चमचा टोमॅटोचा रस घेऊन त्यात एक चमचा लिंबू रस मिसळा आणि हे मिश्रण डोळ्यांभोवती लावून १० मिनिटे ठेऊन धुतल्यास नक्कीच फरक दिसेल.

२. बटाट्याचा रस
डार्क सर्कलची समस्या दूर करण्यासाठी बटाटा उत्तम उपाय आहे. कच्च्या बटाट्याचा रस काढून घ्या. कापसाचा छोटा तुकडा बटाटाच्या रसात भिजवून डोळ्याभोवती ठेवा. काळी वर्तुळे असलेल्या संपूर्ण भागावर कापूस ठेवा. या उपायाने तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल.

३. टी-बॅग
ग्रीन टीची बॅग चांगली असते. ग्रीन टी बॅगच्या वापरानंतर ती फ्रिजमध्ये ठेवा. जेव्हा ही टी-बॅग पूर्णपणे थंड होईल. तेव्हा ती डोळ्यावर ठेवून द्या. ही प्रक्रिया आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा करु शकतो.

Dark Circles

४. बदामाचे तेल
बदामात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन इ आढळते. बदामाचे तेल त्वचा कोमल बनविण्यास मदत करते. डार्क सर्कल्ससाठी रात्री थोडेसे बदाम तेल डोळ्यांच्या आसपास लावावे आणि हलक्या हाताने मसाज करावा.

५. थंड दूध
एक कापसाचा बोळा एका भांड्यात ठेवलेल्या थंड दूधात बुडवायचा आणि डार्क सर्कल्स असलेल्या जागी ठेवायचा. हा उपाय नियमित केल्याने केवळ डार्क सर्कल्स संपुष्टात येत नाहीत तर डोळे ही चांगले होतात.

६. संत्र्याचा ज्यूस
संत्र्याच्या ज्यूसचा डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी लाभदायक आहे. संत्र्याच्या ज्यूसमध्ये काही थेंब ग्लिसरीन मिसळा. हे मिश्रण डार्क सर्कल्स असलेल्या ठिकाणी लावा. हळूहळू डार्क सर्कल्स कमी होतील आणि डोळ्याची नैसर्गिक चमकही वाढू लागेल.

७. काकडी
काकडी अर्धा तासांपर्यंत फ्रिजमध्ये ठेवा आणि नंतर ती बाहेर काढून कापून त्याचे स्लाइस डोळ्यावर ठेवावे. हे स्लाइस १० मिनिटांपर्यंत डोळ्यांवर राहू द्या आणि पुन्हा डोळे धुवून घ्या.

८. पुदिन्याची पाने
पुदिन्याची काही पाने बारीक करुन त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट डार्क सर्कल असलेल्या जागी लावा. ही पेस्ट रोज रात्री लावा. आठवड्याभरात तुम्हाला फरक दिसायला लागेल.

९. गुलाब जल
त्वचेच्या देखभालीसाठी गुलाब जल अतिशय उत्तम आणि सोपा पर्याय आहे. गुलाब जल तुम्ही क्लिंजिंग आणि डार्क सर्कल मिटवण्यासाठी वापरु शकतात. कापूस गुलाब जलमध्ये भिजवून डार्क सर्कल असलेल्या भागावर ठेवा. १० मिनिटांनी डोळे धुऊन घ्या. असे केल्याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

१०. ताक आणि हळद
दोन चमचे ताक घेऊन त्यात चमचाभर हळद मिसळा. ही पेस्ट डार्क सर्कल असलेल्या जागेवर लावा आणि १० मिनिटांपर्यंत राहू द्या. त्यानंतर गरम पाण्याने डोळे धुवून घ्या.

११. कोरफडी
कोरफडीच्या रसात त्वचेला आर्द्रता आणि पोषण देणारे गुणधर्म आहेत. यातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स त्वचेची चमक वाढवतात. कोरफडीची ताजी पाने कापून त्यातील जेल डार्क सर्कल्सवर लावा. ते १०-१५ मिनिटांनंतर धुवा. हे नियमित केल्यास काळी वर्तुळे कमी होतात.

१२. पुरेशी झोप आणि पाणी पिणे
डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यावश्यक आहे. दररोज ७-८ तासांची झोप घ्या. तसेच, दिवसभरात पुरेसे पाणी प्या, कारण पाणी त्वचेचा ओलावा टिकवून ठेवते आणि त्वचा निरोगी बनवते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.