आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सध्या होम लोनच्या पर्यायाकडे वळतो. होम लोनचा पर्याय निवडल्यानंतर बहुतांश लोकांना व्याज आणि प्रोसेसिंग फी बद्दल माहितीच नसते. या व्यतिरिक्त बँकेकडून लावल्या जाणाऱ्या अन्य शुल्काबद्दल ही माहिती करुन घेत नाहीत. हेच हिडन चार्जेस ग्राहकाचा खिसा कापतात. अशातच अशा चार्जेस बद्दल ग्राहकांना माहिती असले पाहिजे. (Home loan hidden charges)
हिडन चार्जेस आणि त्यासाठी आकारला जाणारा शुल्क हा विविध बँकांकडून आपल्यानुसार ठरवला जातो. असे होऊ शकते की, एक बँक सेवेच्या नावाखाली कोणताच चार्ज घेत नसेल. तर दुसरी बँक ही सेवा नि:शुल्क देत असेल. यासाठीच होम लोन घेण्यापूर्वी व्याज आणि प्रोसेसिंग फी सोबत बँकांच्या अन्य चार्जेसची तुलना जरुर केली पाहिजे.
लॉगिन फी
लॉगिन फी ज्याला अॅडमिनिस्ट्रेटिव शुल्क असे म्हटले जाते. काही बँका कर्ज देण्यासाठी अर्ज केल्यानंतर तुमच्याकडून कर्ज मान्य होण्याआधीच काही पैसे घेतात. हे शुल्क सर्वसामान्यपणे २५०० ते ६५०० रुपयांपर्यंत असू शकतात. तुमचे कर्ज मान्य झाल्यानंतर ही रक्कम तुमच्या प्रोसेसिंग फी मधून कापली जाते. जर कर्ज मान्य झाले नाही तर लॉगिन फीस तुम्हाला परत मिळते.
प्रीपेमेंट चार्ज
याला फोरल्कोजर चार्ज अथवा प्रीक्लोजर चार्ज असे सुद्धा म्हटले जाते. हा चार्ज तेव्हाच लावला जातो जेव्हा तुमचा कालावधी संपण्यापूर्वी तुम्ही होम लोनचे पूर्ण पेमेंट करता. हा चार्ज रक्कमेच्या २ ते ६ टक्क्यांदरम्यान असतो.
कनवर्जन चार्जेस
याला स्विचिंग चार्जेस असे सुद्धा म्हटले जाते. हा तेव्हा लागू होतो जेव्हा तु्ही फ्लोटिंग रेट पॅकेजला फिक्स्ड रेट पॅकेज अथवा फिक्स रेट पॅकेजला फ्लोटिंग रेटमध्ये बदलता. हा सर्वसामान्यपणे शिलक्क राहिलेल्या कर्जाच्या रक्कमेच्या ०.२५ टक्के ते ३ टक्क्यांदरम्यान असतो.
रिकवरी चार्जेस
हा चार्ज तेव्हा वसूल केला जातो जेव्हा कर्ज घेणारा व्यक्ती ईएमआयचे पेमेंट करत नाही आणि त्याचे खाते डिफॉल्ट होते. बँक त्याच्या विरोधात काही कारवाई करतो. त्या कारवाईसाठी लागणारा खर्च हा ग्राहकाकडून वसूल केला जातो.(Home loan hidden charges)
हे देखील वाचा- UAN क्रमांक विसरला असाल तर ‘या’ पद्धतीने शोधून काढा
लीगल फी
संपत्तीचे मुल्यांकन असो किंवा विविध कागदपत्रांचे वेरिफिकेशन, बँक या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी कायदेशीर तज्ञांची नियुक्ती करतात. या कामाच्या बदल्यात त्यांना फी दिली जाते. यासाठीच बँक होम लोनवर लीगल फी सुद्धा लागू करतात.
निरीक्षण शुल्क
ज्या संपत्तीसाठी होम लोन घेतले जााईल त्याच्या बाजार मुल्याचे आकलन करण्यासाठी बँक तांत्रिक तज्ञांना नियुक्त करतात. हे तज्ञ काही अटींनुसार संपत्तींचे मुल्यांकन करतात. बँक यासाठी वेगळ्या रुपात पैसे चार्ज करते.