Home » मुघलांच्या काळातील होळी

मुघलांच्या काळातील होळी

by Team Gajawaja
0 comment
Holi in Mughal Empire
Share

मुघलांना भले कितीही कट्टर मानले जात असले तरीही सल्तनतच्या बहुतांश सम्राटांना रंग ही फार आवडायचे. पण त्यांच्या काळात होळी खास अंदाजाने साजरी केली जायची. मुघलांमध्ये प्रत्येक महत्वपूर्ण व्यक्ती, परंपरा, आणि पुरस्कारांची नावे ठेवण्याची परंपरा होती. होळीसोबत ही असेच काहीसे असायचे. त्यांच्या काळात होळीला ‘ईद-ए-गुलाबी’ आणि ‘आब-ए-पाशी’ असे म्हटले जायचे. मुघलांच्या काळात साजरी केल्या जाणाऱ्या होळीच्यावेळी मुस्लिम सुद्धा सहभागी व्हायचे. याचा उल्लेख इतिहासकारांनी आपल्या कागदपत्रांमध्ये ही केला आहे. (Holi in Mughals Empire)

भारतात मुघल साम्राज्याचा पाया पाडणाऱ्या बाबरने जेव्हा पहिल्यांदा हिंदुस्तानातील लोकांना होळी खेळताना पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकीत झाला. होळी हा रंगांचा उत्सव असल्याचे त्याने पाहिले. हौदातील पाणी एकमेकांवर कसे फेकले जाते अशा काही गोष्टीही त्याने पाहिल्या.

बाबरने होळीसाठी हौदात पाण्याऐवजी दारु भरली
बाबरसाठी होळीचा उत्सव हा अनोखा होता. १९व्या शतकात इतिहासकार ‘मुंशी जकाउल्ला’ यांनी आपले पुस्तक ‘तारीख-ए-हिंदुस्तान’मध्ये याचा उल्लेख करत लिहिले की, बाबरने असे पाहिले हिंदुस्तानातील लोक कशाप्रकारे रंगांनी भरलेल्या हौदात एकमेकांना ढकलतात. हिच पद्धत बाबरला ऐवढी आवडली की, त्याने हौदात रंगीत पाण्याऐवजी दारुच भरली.

अकबरच्या काळातील होळी
तर मुघलांमध्ये होळीचे आकर्षक काही पिढ्या कायम होते. पण अकबराच्या नवरत्नांपैकी अबुल फजलने आइन-ए-अकबरीने होळी संदर्भातील काही गोष्टींचा उल्लेख केला. अबुल फजल याने असे लिहिले की, अकबरला होळीचा सण फार आवडायचा. त्याला ती ऐवढी आवडायची की, तो वर्षभर अशा गोष्टी जमा करायचा ज्यामुळे रंग आणि पाणी दूरदूर फेकले जाईल. होळीच्या दिवशी अकबर आपल्या महलातून बाहेर यायचा आणि प्रत्येक सामान्य व्यक्तीसोबत तो होळी खेळायचा.

शाहजहांने होळीला लग्नाच्या उत्सावाचे रुप दिले
जहांगीरच्या काळआत होळीच्या वेळी गाण्याची विशेष महफिलचे आयोजन केले जायचे. तुज्क-ए-जहांगीरीच्या मते, जहांगीरला सामान्य लोकांसोबत होळी खेळणे पसंद नव्हते. परंतु गाण्याच्या विशेष महफिलमध्ये तो सहभागी व्हायचा. किल्ल्याच्या दरवाज्यातून त्याला लोक रंगांची होळी कशी खेळतात हे पाहणे मात्र त्याला आवडायचे. (Holi in Mughals Empire)

हे देखील वाचा- बाबा विश्वनाथांची होळी….

होळीच्या उत्सव भव्यदिव्य बनवण्याची परंपरा शहाजहांच्या काळात सुरु झाली. शहाजहांने होळीच्या उत्सवाला एका लग्नाचेच रुप दिले. त्याच्या काळात होळीला ईद-ए-गुलाबी आणि आब-ए-पाशी नावाने ओळखले जायचे. एवढेच नव्हे तर, या दिवशी मुघलांचा अंतिम बादशहा जफरने विशेष गाणी सुद्धा लिहिली होती. ज्याला ‘होरी’ नाव दिले गेले होते. त्यांचे गीत उर्दू गीतांच्या एक श्रेणी बनली होती. जफरने लिहिले की, ‘क्यो मो पे रंग की मारी पिचकारी, देखो कुंवरजी दूंगी मैं गारी’. एक उर्दू वृत्तपत्र ‘जाम-ए-जहनुमा’ने १८४४ मध्ये लिहिले होते की, जफरच्या शासनकाळात होळीसाठी विशेष व्यवस्था केली जायची. टेसूच्या फुलांपासून रंग तयार केले जायचे आणि बादशहा आपल्या परिवारासह रंगाचा उत्सव खेळण्यात मग्न व्हायचा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.