Holashtak 2024 : फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला होळीचा सण साजरा केला जातो. पण होळीच्या आधीच्या आठ दिवसांना अशुभ मानले जाते. या दिवसांना होलाष्टक असे म्हटले जाते. यंदाचे होलाष्टक अत्यंत विशेष आहे. कारण होलाष्टकाआधी खरमास सुरू होमार आहे. म्हणजेच होलाष्टकाची सुरूवात खरमासदरम्यान होणार आहे. अशातच जाणून घेऊया होलाष्टक यंदा कधी आणि महत्त्व काय याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
यंदा होलाष्टक कधी?
होलाष्टकाची सुरूवात फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून होणार आहे. यंदा अष्टमी तिथी 17 मार्चला आहे. अशातच होळीच्या आठ दिवस आधी म्हणजेच 17 मार्चपासून होणार आहे. येत्या 24 मार्चला होलाष्टक संपणार आहे. अशातच आठ दिवसांमध्ये शुभ कामे केली जात नाही. या दिवसांना अशुभ दिवस मानले जाते.
हिंदू धर्मात होलाष्टकावेळी विवाहसोहळा, मुंडण, गृह प्रवेश, नवी नोकरी, नवा व्यवसाय अशी शुभ कामे केली जात नाहीत. पण होलाष्टकावेळी पूजा-प्रार्थना करणे शुभ मानले जाते. (Holashtak 2024)
होलाष्टकावेळी शुभ कार्य का केली जात नाहीत?
पौराणिक मान्यतांनुसार, कामदेवने भगवान शंकराची तपस्या भंग केली होती. यामुळेच भगवान शंकर संतप्त होत प्रेमाची देवता कामदेव यांना फाल्गुन महिन्यातील अष्टमी तिथीलाच भस्म केले होते. यानंतर कामदेव यांची पत्नी रतिने शंकराची आराधना करत कामदेवांना पुन्हा जीवंत करण्याची प्रार्थना केली. त्यानंतर शंकरांनी रतिची प्रार्थना स्विकार केली. महादेवांच्या या निर्णयानंर कामदेव पुन्हा जीवंत झाले आणि होलाष्टक संपले. याशिवाय लोकांनी याचा आनंद व्यक्त केला. तेव्हापासून होळीच्या सणाची सुरूवात झाली.