Home » कोयता गँग आटोक्यात का येत नाही?

कोयता गँग आटोक्यात का येत नाही?

by Team Gajawaja
0 comment
History of the Koyta Gang
Share

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, महाराष्ट्राचे ऑक्सफोर्ड अशी कोणे एके काळी पुण्याची ओळख होती. ती पुसून आता कोयता गँगवाल्यांचं पुणे अशी झाली की अशी शंका येते. कारण असा एक दिवस जात नाही त्या दिवशी पुण्यात कोयता गँगच्या दहशतीची बातमी समोर येत नाही. अगदी क्षुल्लक कारणांवरून लोक कोयता काढतात आणि दहशत निर्माण करतात. आता एका माजी नगरसेवकाचा त्याच्याच बहिण आणि दाजींनी काटा काढला. ती सुपारीपण कुणाला दिली तर कोयता गँगला. ही अवस्था आहे आजच्या पुण्याची. पण पुण्याची अशी अवस्था का झाली? कोयता गँगचे लोक आहेत तरी कोण? आणि यांचे संपूर्ण उच्चाटन करायला पोलिसांसाठी अशक्यप्राय झाले आहे का? जाणून घेऊयात.माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा पुण्यात खुन झाला. त्यांचा खुन करणारी टोळी कोयता गँगचीच होती. कारण त्यातला पॅटर्न. (History of the Koyta Gang)

आधी ही टोळी बाईकने आली आणि आंदेकर यांच्यावर गोळीबार केला. आंदेकर जखमी झाले तेव्हा त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यात आंदेकर इतके जखमी झाले की उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा या खुनामागचे कारण आणि आरोपी समोर आले तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. वनराज आंदेकर यांना मारणारे हात हे परक्याचे नव्हते तर ते रक्ताच्या नात्यातले होते. दोन बहि‍णींनी आपल्या पतींसोबत मिळून आपल्या भावाच काटा काढला होता. कारण काय तर प्रॉपर्टी. पुण्यात एका बेकायदेशीर दुकानावर पालिकेने बुलढोझर फिरवला होता. हे दुकान होतं संजीनवी कोमकर आणि कल्याणी कोमकर यांचं. या दोघी कोण? तर या दोघी वनराज आंदेकरच्या सख्या बहिणी. वनराजनेच बेकायदेशीर दुकानाची माहिती प्रशासनाला दिली आणि त्याच्यामुळेच हे दुकान तोडलं गेलं असा या दोघींना संशय होता. तेव्हा आपल्या पतीसोबत मिळून यांनी कोयता गँगला सख्ख्या भावाची सुपारी दिली आणि कोयता गँगने आपलं काम पूर्ण केलं. (History of the Koyta Gang)

कोयता गँगचा इतिहास हा फार जुना नाही. गेल्या १५ ते २० वर्षात पु्णे आणि आजूबाजूच्या परिसरात ही गँग फोफावली. त्याचे एक प्रमुख कारण साऊथचे डब सिनेमे असेही सांगितले जाते. साऊथच्या सिनेमांमध्ये हिरो असो वा व्हिलन तो हातात कोयता घेऊन आपली मर्गानगी सिद्ध करत असतो. हातात कोयता घेऊन काट डालुंगा अशी डायलॉगबाजी या चित्रपटात असते. त्यात हिरो कसाही असला तरी तो व्हिलनला आणि त्याच्या गँगला फाईट मारून गारद करतो असं दाखवलं जातं. तर व्हिलनला कोयत्याने मारून त्याची दशहत संपवतो. चित्रपट तज्ज्ञ असं म्हणतात की उजेडात वाचलेलं पुस्तक जितकं प्रभावी ठरत नाही तेवढा अंधारात पाहिलेला एक सिनेमा प्रभावीत करून जातो.सेट मॅक्स, स्टार गोल्ड, झी सिनमा या चॅनेलवर असे सिनेमे सतत लागले जायचे. तेव्हा तर सोशल मिडीयाही नव्हता. त्यामुळे पुणे आणि आसपासच्या भागातील या सिनेमांवरून अनेकांनी प्रेरणा घेत कोयता हातात घेतला होता. (History of the Koyta Gang)

यात प्रामुख्याने कोयता वापरण्याचे एक महत्वाचे कारण आहे. ते म्हणजे सहज आणि सोप्या पद्धतीने मिळणारं हे हत्यार. पुणे शहराजवळ मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग आणि इथे शेतीसाठी कोयता सहज वापरला जातो. पुणे आणि आजूबाजूच्या भागात हे हत्यार सहज मिळतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोयता ठेवण्यासाठी तुम्हाल कुठल्याही लायसन्सची गरज पडत नाही. बंदूक आणि इतर हत्यार मिळवण्यासाठी खुप काही काही करावं लागतं आणि ते सहज मिळत नाहीत. त्याचऐवजी कोयता सहज मिळतो त्याची किंमतही ५०० ते ६०० रुपयांना असते. आणि शर्टात लपवता येतं. कुठे राडा झाला कुठे कुठे दशहत माजवयाची असेल तर कोयता काढायचा आणि हल्ला करायचा अशी सोपी ट्रिक या गुन्हेगारांची असते. त्यामुळे कोयता या गुन्हेगारांमध्ये लोकप्रिय झाला आहे. (History of the Koyta Gang)

आता पोलिसांना ही कोयता गँग का जड जातेय? त्याची दोन महत्त्वाची कारणे म्हणजे या टोळीत अल्पवयीन तरुणांचा समावेश आणि त्यांना कडक शिक्षा न करणारा कायदा. वयात आलेला एखादा तरुण या वाईट मार्गाला लागतो. या धंद्यातले भाई त्याला दशहत कशी पसरवायची, वसूली कशी करायची याचे प्रशिक्षण देतो. एकदा का या अल्पवयीन तरुणावर गुन्हा दाखल झाला तर ही बाब त्यांच्यासाठी भुषणावह असते. तेव्हा या मुलांची रवानगी तुरुंगात नव्हे तर रिमांड होममध्ये होते. तिथे त्यांना गुन्हेगारीचं आणखी बाळक़डू मिळतं. त्यांच्या केसेस या कोर्टात नव्हे तर जुवेलाईन बोर्डाकडे असतात. या मुलांना जामीनही पटकन मिळतो. रिमांड होममधून बाहेर आल्यावर ही पोरं पुन्हा ‘धंद्याला’ लागतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुण्यात यांची एक अशी गँग नाही. मुंबईत हाजी मस्तान, दाऊद, छोटा राजन, वरदराजन, अरुण गवळी यांच्या टोळ्या होत्या. पण पुण्यात कोयता घेऊन फिरणाऱ्या आणि दहशत माजवणाऱ्यांची एक अशी गँग नाही. त्यांच्या अनेक टोळ्या आहेत. आणि या टोळ्या मिळून बेकादेशीर अशी कामं करतात. त्यात वसूली, सुपारी, खंडणी, हत्या अशा कामांचा समावेश आहे. (History of the Koyta Gang)

==============

हे देखील वाचा :  अजमेर बलात्कार प्रकरण !

===============

पोलिसांनी या कोयता गँगला आटोक्यत आणण्याचे खुप प्रयत्न केले. त्यात कोयता किती पातीचा असावा, कायदे कडक केले, मुलांच्या पालकांना भेटून त्यांचे समुपदेश करणे, इतकंच काय या टोळ्यांची धिंड काढून त्यांची दहशत संपवण्याचाही पोलिसांनी प्रयत्न केला. अशा अनेक उपाययोजना केल्यानंतरही कोयता गँग्सचा उच्छाद काही संपत नाहीये. आता अनेकजण मुंबईत जसे गँगवॉर संपवले तशाच पद्धतीने पुण्यातील गँगवॉर संपवावे अशी मागणी करत आहेत. या गुन्हेगारांना कुठलीही दयामाया न दाखवता त्यांचाही एन्काऊंटर करावा अशी मागणी होत आहे. अशा गुन्हेगारांचं काय करायला हवं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. (History of the Koyta Gang)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.