आपण नेहमी पाहतो की, काही वेळेस एकाच नावाची लोक एकत्रित येतात. पण जरा विचार करा की, एकाच नावाची जर १७८ लोक एकत्रित आल्यास काय होईल? हे थोडं विचित्र आहे. पण जापान मधील एका शहरात असे घडले आहे. येथे एकाच नावाची १७८ लोक एकाच मंचावर पोहचत त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हे अशावेळी झाले जेव्हा हिरोकाजू तनाका नावाची १७८ लोक एकाच ठिकाणी आले. (Hirokazu Tanaka)
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला
खरंतर ही घटना जापान मधील असून टोक्यो स्थिती शिबुया जिल्ह्यातील एका ऑडिटोरियम मध्ये ते सर्वजण एकत्रित जमले होते. त्यांचे नाव हिरोकाजू तनाका असे आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड दुसऱ्याच्याच नावावर होता. तेव्हा एकाच नावाची १५६ लोक एकत्रित आली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टोक्यो मधील एक कॉर्पोरेट कर्मचारी हिरोकाजु तनाका या संपूर्ण कार्यक्रमाचे कर्ताधर्ता होते. त्यांनी विचार केला की, आपण प्रयत्न करुयात आपल्या नावाची किती लोक एकत्रित येऊ शकतात. त्यांना ही कल्पना अशावेळी सुचली जेव्हा त्यांनी टीव्हीवर बेसबॉल खेळाडू हिरोकाजु तनाकाला ओसाका किंतेत्सु टीमध्ये पाहिले होते.

दरम्यान, या कार्यक्राच्या आयोजनात हिरोकाजु तनाका (Hirokazu Tanaka) नावाची काही प्रसिद्ध व्यक्ती सुद्धा होत्या. असे मिळून १७८ जण एकाच मंचावर पोहचले होते. सर्वाधिक लहान हिरोकाजू हा तीन वर्षाचा होता. तर सर्वाधिक वृद्ध हिरोकाजू हा ८० वर्षाचा होता. एका व्यक्तीने हनोई येथून विएतनाम पर्यंत या कार्यक्रमाचा हिस्सा बनवण्यासाठी प्रवास केला होता. आता यांच्या नावे रेकॉर्ड गिनीज बुकात दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा- आयुष्यातील प्रत्येक बंधनांवर मात करत “ती” बनली देशाची पहिली महिला बाउंसर
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची सुरुवात कधी झाली होती?
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची सुरुवात वर्ष १९५८ मध्ये झाली होती. याला १९९८ पर्यंत ‘द गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ अशा नावाने ओळखले जायचे. मात्र नंतर त्याचे नाव बदलून ‘द गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ असे करण्यात आले होते.या पुस्ताकाने ‘बेस्ट सेलिंग कॉपीराइटेड बुक ऑफ ऑल टाइम’ चा पुरस्कार ही जिंकला आहे. हे पुस्तक गेल्या ६३ वर्षात प्रकाशित होत असून २३ विविध भाषेत छापले गेले आहे. याच्या आंतरराष्ट्रीय फ्रंचाइजीने याच्या नावाने म्युझियम आणि टीवी चॅनल सुरु करण्याचा सुद्धा विचार केला आहे. यामध्ये जगातील विविध रेकॉर्ड्स ब्रेक करण्यात आलेल्या गोष्टींचा समावेश असणार आहे.