आज आपल्या सुदृढ, निरोगी जीवन जगण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोषक तत्वांची गरज असते. आपण नेहमीच सोशल मीडिया पाहून, कलाकारांचे खाणे पाहून फॅन्सी गोष्टी खाऊनच उत्तम जीवनशैली मिळवू शकतो या भ्रमात असतो. मात्र आपल्या आजूबाजूला आपण पाहिले तर अतिशय उत्तम आणि शरीरासाठी चांगल्या गोष्टींचा भांडार सापडेल.
मुळातच आपल्या देशात असंख्य भाज्या, फळं उपलब्ध होतात जे अतिशय चांगले आणि गुणधर्मांनी भरलेले असतात. रोजच्या सध्या वरण, भात, भाजी, पोळी या जेवणातून देखील आपण आपले आरोग्य उत्तम राखू शकतो. मात्र आपल्या आवडी निवडी एवढ्या असतात की आपण त्याच्याशी तडझोड करायला तयारच नसतो. आपल्या जुन्या लोकांनी भरपूर चांगल्या भाज्या आपल्याला खायला शिकवल्या असतात. मात्र आपण चवीसाठी, आवडीसाठी त्यांना नकार देतो. त्यामुळेच अतिशय उत्तम गुणधर्म, फायदे असलेल्या अनेक गोष्टी आपल्याला माहीतच नसतात. तेच आपल्याला कोणत्या सेलिब्रिटीने, परदेशी लोकांनी सांगितले तर आपण लगेच ऐकून त्या विशिष्ट गोष्टी खाण्यास सुरुवात करतो.
अशीच एक आपल्याकडे मिळणारी भाजी म्हणजे शेवगा. ज्याला आपण शेवग्याच्या शेंगा देखील म्हणतो. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली ही भाजी विविध रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी असलेली ही शेवगांची भाजी जवळपास ३०० रोगांवर रामबाण इलाज असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत असते. चला तर जाणून घेऊया या शेवग्याच्या शेंगांचे फायदे आणि गुणधर्म.
शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे:-
1) शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. ऍनेमिया असलेल्या अर्थात रक्ताची कमतरता असलेल्या रुग्णांनी या भाजीची सेवन करणे फायदेशीर ठरते. शिवाय या शेंगांमध्ये लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.
2) शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते. चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते. शिवाय चष्मा निघून जाण्यास देखील या शेंगांचे सेवन चांगले ठरते.
3) शेवग्याच्या शेंगांचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढून आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते.
4) शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा दूर होण्यास मदत होते.
5) शेवग्याच्या शेंगा नियमित खाल्ल्या तर आपल्या शरीराची पचनक्रिया सुधारत तिचे आरोग्य टिकून राहण्यास मदत होते.
6) शेवग्याच्या शेंगेचे सेवन नियम केले तर आपले वजन नियंत्रणात राहते. जर वजन कमी करायचे असेल तर या शेंगाचा नक्कीच आहारात समावेश केला गेला पाहिजे.
7) ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांसाठी शेवगा खूपच जास्त फायदेशीर आहेत. आहारात जर शेवग्याच्या शेंगेचा वापर केल्यास डायबिटीस नियंत्रणात राहतो.
8) शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होऊन आपण निरोगी राहतो.
======
हे देखील वाचा : पावसाळ्यात डास, माशा, किड्यांपासून असा करा बचाव
======
9) शेवग्याच्या शेंगांचे संपूर्ण झाडच अतिशय उपयुक्त आणि गुणधर्मांची परिपूर्ण आहे. या झाडाची पानं, फुलं, फळं, बिया, साल आणि मूळ आदी गोष्टींचा उपयोग विविध रोगांवरील औषध निर्मितीसाठी केला जातो.
10) शेवग्याच्या शेंगांच्या पानांचा रस आणि मध एकत्र करून घेतल्यास ज्या लोकांना मोतीबिंदू आहे त्यांना खूप फायदेशीर आहे.
11) शेवग्याचे शेंगा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लडप्रेशर नियंत्रणात राहून आपल्याला हा आजार लागत नाही.