Home » हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये होणार वाढ, नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम

हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये होणार वाढ, नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम

इन्शुरन्स सेक्टरच्या रेग्युलेटर आयआरडीएआयने (IRDAI) नुकत्याच काही नियमांमध्ये बदल केले आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे.

by Team Gajawaja
0 comment
Health Insurance
Share

Health Insurance : इन्शुरन्स सेक्टरच्या रेग्युलेटर आयआरडीएआयने (IRDAI) नुकत्याच काही नियमांमध्ये बदल केले आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. नव्या गाइडलाइन्सनुसार, आता वीमा कंपन्या हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ करणार आहे. याच कारणास्तव प्रीमियममध्ये कमीत कमी 1 हजार रुपयांची वाढ होऊ शकते. काही कंपन्यांनी प्रीमियममध्ये वाढ करण्याचे संकेतही दिले आहे.

आयआरडीएआयकडून काही नियमांत बदल
आयआरडीएआयच्या नव्या गाइडलाइन्सनुसार, वेटिंग कालावधी आता कमीतकमी चार वर्षांवरून तीन वर्षे करण्यात आला आहे. याशिवाय जेष्ठ नागरिकांसाठी नव्या नियमांत सूट दिली आहे. वीमा कंपन्यांना निर्देशन दिले आहेत की, गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांनाही हेल्थ इन्शुरन्स दिला जाईल. याव्यतिरिक्त कंपन्यांनी निर्देश दिले होते की, त्यांनी नागरिकांना इंस्टॉलमेंटचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, या नव्या नियमानुसार ग्राहकांना खुप मोठा दिलासा मिळू शकतो. पण कंपन्या आता प्रीमियमच्या दरात वाढ करण्याची तयारी करत आहेत.

एचडीएफसी एरगोकडून प्रीमियममध्ये वाढ करण्याची घोषणा
एचडीएफसी एरगोकडून नुकत्याच प्रीमियममध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती. प्रीमियम 7.5 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांवर केला आहे. कंपनीने ग्राहकांना पाठवलेल्या इमेलमध्ये म्हटलेय की, पॉलिसीधारक वय आणि परिवारातील सदस्याच्या आधारावर प्रीमियममध्ये वाढ केली जाईल. नव्या नियमांसह मेडिकल खर्चात होणारी वाढ पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. (Health Insurance)

कोविडनंतर वेगाने प्रीमियममध्ये वाढ
एको जनरलन इन्शुरन्सने म्हटले की, कंपन्या प्रीमियममध्ये 10-15 टक्के वाढ करू शकते. इरडाने आता 65 वर्षावरील अधिक वयातील नागरिकांना हेल्थ इन्शुरन्स देण्याचे निर्देश दिले आहेत. खरंतर, वाढलेल्या वयासह कंपन्यांना अधिक रिस्क घ्यावी लागते. यामुळेच प्रीमियम वाढला जाऊ शकतो. वयाच्या प्रत्येक पाच वर्षांनी प्रीमियममध्ये 10-20 टक्क्यांनी वाढ होते.


आणखी वाचा :
EVM मशीन ठेवल्या जाणाऱ्या खोलीला स्ट्रॉन्ग रुम का म्हणतात?
नॉर्थ कोरियाकडून स्पाय सॅटेलाइट लॉन्च

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.