Health Care Advice : आजकाल वजन कमी करण्याचा ट्रेण्ड आहे. ज्यांचे वजन अत्याधिक वाढलेले असते ते जिममध्ये जाऊन वर्कआउट करण्यासह डाएटही फॉलो केले जातात. वजन कमी करणाऱ्यांना डाएटमध्ये काही बदल करण्यास सांगितले जातात. यामध्ये अशा गोष्टींचा समावेश केला जातो ज्यामुळे फॅट वेगाने बर्न होईल. पण डाएट करणे सोपे नव्हे.
एक्सपर्ट्स मानतात की, डाएटच्या नादात बहुतांश पोषण तत्त्वे शरिराला मिळत नाही. यामुळे आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. पण तुम्ही अँटी डाएटच्या मदतीने वजन कमी करू शकता. खरंतर अँटी डाएट प्लॅन नक्की काय याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
अँटी डाएट म्हणजे नक्की काय?
अँटी डाएटला माइंडफुल इटिंग असेही म्हटले जाते. या प्लॅनमध्ये माइंडफुल इटिंगची प्रॅक्टिस करावी लागते. तुमच्या शरिरासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या गोष्टींनी वजन कमी होऊ शकते यावर लक्ष दिले जाते. अँटी डाएट प्लॅनमध्ये अशाही गोष्टींवर लक्ष दिले ज्याच्या माध्यमातून शरिराला अत्याधिक पोषण तत्त्वे मिळतील.
कोणासाठी फायदेशीर?
वजन कमी करणाऱ्यांसाठी अँटी डाएट बेस्ट आहे. पण त्या लोकांसाठीही फायदेशीर आहे जे इमोशनल इटिंगचा सामना करतात. याचा अर्थ असा होतो की, जेव्हा मन करते, कितीही वेळा मन करते त्यानुसार व्यक्ती खातात. काहीजण अशीही असतात जे नेहमीच खाण्याबद्दल विचार करतात. त्यांच्यासाठी अँटी डाएट उत्तम पर्याय आहे. (Health Care Advice)
फॉलो करा या गोष्टी
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हाच खा. कोणत्याही प्रकारच्या गोष्टींचे ओव्हर इटिंग करणे टाळावे. सातत्याने खाऊ नये आणि उच्च साखर असणाऱ्या गोष्टींपासून दूर रहावे. सर्वाधिक महत्त्वाची बाब अशी की, भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी खाऊ नये.