आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टर आपल्याला अधिक लिक्विड्स जसे की, दूध, दही, चाय-कॉफी पिण्याचा सुद्धा सल्ला देतात. परंतु तुम्ही अशा काही गोष्टींसोबत औषध खाल्ल्यास तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते. कारण आरोग्यासोबत खेळणे हे आपल्या जीवावरच बेतते. त्यामुळे ज्यावेळी डॉक्टरांनी दिलेली औषधे खायची असतील तर प्रथम त्यांना त्यांच्या वेळा विचारा. पण कोणत्या गोष्टींसोबत ती औषध घेऊ शकतो हे सुद्धा स्पष्टपणे विचारा, कारण तुम्ही एखादी औषध पाण्याऐवजी कोणत्या दुसऱ्याच गोष्टीसोबत घेतल्यास त्याचा तुमच्या आरोग्याला मोठा फटका बसू शकते. तर जाणून घेऊयात औषधांसह कधीच’ गोष्टींचे सेवन करु नये.(Harmful infection)
-दारुसोबत औषध
एल्कोहलसोबत औषध घेण्याची चूक कधीच करु नका. कारण असे करणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. खरंतर औषधांमध्ये केमिकल असतात त्यामुळे ती जर दारुसोबत घेतली तर तुम्हाला फटका बसेल.
-सोडा, कोल्ड्रिंक्स
सोडा, कोल्डड्रिंक्स किंवा सोडा असलेल्या ड्रिंक्ससोबत औषधांचे सेवन करणे नुकसानदायक ठरु शकतो. काही औषधे सोडा किंवा अन्य सोडा असलेल्या ड्रिंक्ससोबत घेतल्यास रिअॅक्ट करु शकतात. औषध ही नेहमीच पाण्यासोबत घेणे फायदेशीर असते. त्यामुळे कोल्ड्रिंक्ससोबत औषध घेण हे आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे.
-ज्यूस
फळांचा ज्यूस हा आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु औषध ही ज्यूस सोबत कधीट सेवन करण्याची गरज नाही. आजारपणात ज्यूस पिण्याचा सल्ला जरुर दिला जातो. म्हणून औषधांसोबत ज्यूस अजिबात पिऊ नये. कारण असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
हे देखील वाचा- मधुमेह असलेल्या रुग्णांनी रात्री दूध पिणे सुरक्षित आहे का?
-गरम पाणी
बहुतांश औषध ही खाण्यासाठी समस्या येऊ नये म्हणून त्याचे पॅकिंग अगदी सोप्पे केलेले असते. काही औषधांवर केमिकलचे कोटिंग देत ते कॅप्सुलच्या रुपात केले जाते. गरम पाण्यामुळे ही कोटिंग खराब होऊ शकते. जर तुम्ही कॅप्सुल घेत असाल तर ती गरम पाण्यासोबत घेऊ नका.(Harmful infection)
-कॉफी
ज्या प्रकारे औषध ही गरम पाण्यासोबत घेऊ नये त्याचप्रमाणे कॉफी किंवा चहा सोबत ही ती घेऊ नयेत. कॅफेनसोबत काही वेळा औषध घेतल्यास ते शरिरात रिअॅक्ट करु शकतात. पण शरिरात योग्य प्रमाणे जिरत ही नाहीत. त्यामुळे औषध खाल्ल्याचा काहीच फायदा आरोग्याला होत नाही.
-लस्सी किंवा छास
काही खास प्रकारची औषध सोडून अन्य औषध ही दूध किंवा त्यासंबंधित डेअरी प्रोडक्ट्स घेणे आरोग्याला आमंत्रण देण्यासारखे आहे. लस्सी किंवा छास सोबत तुम्ही औषध घेतल्यास ज्याप्रकारे ती शरिरात रिअॅक्ट करतात त्याप्रमाणे ती करत नाहीत.