डिसेंबर महिना सुरु झाला की, वेध लागतात ते नवीन वर्षाचे. इंग्रजी कॅलेंडरचा डिसेंबर हा शेवटचा महिना असल्याने या महिन्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात होते. आता आपण लवकरच २०२५ या वर्षाला मागे सारून २०२६ या नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत. २०२५ या सालातल्या सर्वच आठवणी सोबत घेऊन आपण या नवीन वर्षात जाण्यासाठी सज्ज आहोत. नवीन वर्ष आपल्यासाठी नवीन आव्हानं, नवीन आठवणी असं सर्वच घेऊन येईल. मात्र त्याआधी आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी, जीवनशैलीसाठी, आर्थिक बाबींसाठी काही नवीन संकल्प घेतले पाहिजे.(New Year)
नवीन वर्षात दररोज आपण हे संकल्प पूर्ण केलेच पाहिजे. मनुष्य हा आशावादी आहे. कायम चांगलेच होईल याच आशेवर तो त्याचे जीवन जगत असतो. त्याच्या याच सकारात्मकतेसाठी त्याला त्याचे संकल्प मदत करतात. नवीन वर्षात आपण काय केले पाहिजे आणि काय करू नये हेच आपल्याला आपण ठरवलेले संकल्प कायम आठवण करून देत असतात. आता लवकरच २०२६ ची सुरुवात होत आहे, त्याच पार्श्वभूमीवर आपण कोणते नवीन संकल्प करावे, जे २०२६ मध्ये पाळले गेलेच पाहिजे हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (2026)
व्यायाम करणे
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा. नियमित व्यायाम शरीरासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे आपले मन तणावमुक्त आणि सकारात्मक बनवते. कामाच्या व्यापात अनेकदा आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र या नवीन वर्षात रोज थोडा वेळ व्यायामासाठी काढण्याचा, चालण्याची सवय लावण्याचा किंवा घरगुती, पौष्टिक आहार घेण्याचा संकल्प करा. चांगलं आरोग्य असेल तरच इतर सर्व गोष्टी शक्य आहे, हे कायम लक्षात ठेवा आहे. (Happy New Year)
डिजिटल डिटॉक्सची सुरुवात
आजच्या काळात माणसाचा बहुतांश वेळ हा मोबाइल आणि सोशल मीडियावरच खर्च होत आहे. यामुळे आपला अमूल्य असा वेळ तर जातोच, पण मानसिक थकवाही वाढतो. म्हणूनच या नवीन वर्षात स्क्रीन टाइम कमी करण्याचा आणि मोकळ्या वेळेत इतर छंद जोपासण्याचा, संगीत, व्यायाम किंवा इतर चांगल्या गोष्टी करण्याचा संकल्प करा. यामुळे मन शांत राहण्यास मदत होते. (Marathi News)

पुस्तकं वाचा
पुस्तके हे नेहमीच माणसाचे मार्गदर्शक, मित्र आणि शिक्षक राहिले आहेत. अशा परिस्थितीत नवीन वर्षाच्या दिवशी, वर्षभरात किमान १० ते १२ पुस्तके संपली पाहिजेत याची खात्री करा. वाचन कायमच आपल्याला एक उत्तम विचारवंत बनवते. आपण प्रत्येक गोष्टीचा योग्य पद्धतीने विचार करू लागतो. शिवाय पुस्तके आपल्याला मानसिक शांती देतील त्यामुळेच या नवीन वर्षात वाचनाचा संकल्प करा. (Top Marathi News)
सकारात्मक विचार करा
आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचा आपल्या जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या परिणाम होत असतो. जर आपण नकारात्मक विचार केला तर आपल्या जीवनात निराशा आणि अपयश येण्याची खात्री असते. त्यामुळे कायम सकारात्मक विचार करा. चांगल्या वाईट कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला सकारात्मक विचार करण्याची सवय लावा. नवीन वर्षात स्वतःसाठीच एक नियम बनवा की तुम्ही कायम सकारात्मक विचार कराल. कोणतीही परिस्थिती धैर्याने तसेच सकारात्मक पद्धतीने हाताळायला हवी. ही सवय तुमचे मानसिक आरोग्य तर सुधारेलच पण याचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर देखील चांगला परिणाम होईल. (Latest Marathi Headline)
वैयक्तिक बजेट करा
मनुष्य सगळे सोंग अनु शकतो, मात्र पैशाचे नाही. त्यामुळे पैसा कायम विचार करून खर्च करा. या नवीन वर्षांमध्ये तुमच्या वायफळ खर्चाला आळा घालण्यासाठी वैयक्तिक स्वतःसाठी एक बजेट तयार करा. मासिक घरगुती खर्च किंवा आपल्याला अपेक्षित असलेले विशेष खर्च या सर्वांसाठी एक बजेट तयार करा. या वर्षात तुम्ही किती बचत केली पाहिजे याचा एक आकडा तयार करा आणि त्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात करा. (Top Trending News)
=========
Travelling : भारतातील सर्वोत्तम रोड ट्रिप करायची असेल तर ‘ही’ ठिकाणं आहेत परफेक्ट ऑप्शन
=========
कुटुंबाला वेळ द्या
बर्याच वेळा व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आपल्याच लोकांपासून दूर जाऊ लागतो. अशा परिस्थितीत या वर्षात स्वतःचा संकल्प करा की तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ द्या. त्यांच्यासोबत चांगले क्षण घालवाल. जर तुमचे तुमच्या कुटुंबासोबतचे नाते चांगले नसेल तर तुम्ही नेहमी तणावाखाली रहाल. त्यामुळे तुमच्या कुटुंबाशी चांगले संबंध असणे महत्त्वाचे आहे. आपल्या कुटुंबासोबत जेवण करा, फिरायला जा, चित्रपट पाहा, विविध विषयांवर चर्चा करा या सर्व गोष्टी करताना लक्षात ठेवा की, तुमचा मोबाइल तुमच्यापासून लांब असेल. (Top Stories)
पर्सनल ग्रूमिंग
आजच्या काळात आपण स्वतःसाठी वेळ देणे देखील खूपच आवश्यक झाले आहे. कोणासाठी नाही तर स्वतःसाठी आपण चांगले दिसणे, चांगले राहणे आवश्यक आहे. यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. जर तुम्हाला यावर्षी तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक, सुंदर बनवायचे असेल, वजन कमी करायचे असेल, काही नवीन काम शिकायचे असेल, तर तुम्ही या नवीन वर्षात तसे करण्याचे वचन स्वतःला दिले पाहिजे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
