येत्या २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. सर्वांचा लाडका बाप्पा दहा दिवस आपल्याकडे राहून आपला पाहुणचार घेणार आहे. प्रत्येकालाच गणेश उत्सवाची खूपच आतुरता असते. आता गणेश उत्सव सुरु होणार म्हणून सगळेच बाप्पाच्या स्वागताची तयारी करत आहे. मात्र आता गणेश उत्सव सुरु होणार आहे.. याच पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला दररोज बाप्पांच्या अतिशय रंजक आणि माहित नसलेल्या कथा सांगणार आहोत. आज आपण बापाच्या विवाहाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. बाप्पांचा विवाह रिद्धी सिद्धी यांच्यासोबत झाला असल्याचे अनेकांना माहित आहे, मात्र हा विवाह कसा झाला? रिद्धी सिद्धी कोण होत्या? आदी अनेक गोष्टींबद्दल बरेच लोकं अनभिज्ञ असतील आज आम्ही तुमच्या याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. (Ganesh Chaturthi)
आपल्या हिंदू धर्मात विवाहाला मोठे महत्व आहे. विवाह हा एक संस्कार मानला गेला आहे. अगदी देवी देवतांनी देखील विधिवत लग्न केल्याचे आपल्याला पुराणांमध्ये दिसते. आद्यपूज्य असणाऱ्या गणपतीचा देखील विवाह झाला आहे. अनेक मंदिरात गणपती आणि रिद्धी- सिद्धी आपल्याला पहायला मिळतात. काही जणांच्या मते रिद्धी- सिद्धी हे प्रतिकात्मक रूप आहे. दक्षिणेत तर गणपतीचे ब्रह्मचारी रुप पहायला मिळते. पुराणात गणपती विवाहाच्या अनेक आख्यायिका सांगितलेल्या जातात. विविध धार्मिक पुराणांमध्ये देखील गणपतीच्या विवाहाचा उल्लेख पाहायला मिळतो. आज आपण याबद्दल काही कथांबद्दल माहिती घेऊया. (Marathi)
गणेश आणि तुळशी कथा
पौराणिक कथेनुसार, राजा धर्मात्मजची कन्या तुळस ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली. तीर्थयात्रेदरम्यान तुळशीने पाहिले की गणेश जी गंगेच्या किनाऱ्यावर तपस्या करत होते. पौराणिक कथेनुसार भगवान तपस्येत विलीन होते. त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते. गळ्यात रत्नांची माळ होती. कमरेत रेशमचे पितांबर गुंडाळलेले होते. ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करीत होते. (Marathi News)
गणपतीचे ते सुंदर स्वरुप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली. तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतीची तपस्या भंग केली. भगवान गणेश हे पाहून संतप्त झाले आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे वर्णन केले. तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला. हे ऐकून तुळशी संतापली आणि तिने भगवान गणपतीला शाप दिला की, तुझे एक नाही दोन विवाह होतील. यावर भगवान गणेशानेही तिला शाप दिला की, तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल. हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली. (Marathi trending News)
तेव्हा गणेश जी म्हणाले की तुझे लग्न शंखचूर्णा नावाच्या राक्षसाशी होईल. पण तू रोपाचे रुप धारण करशील. ते म्हणाले की, कलियुगात तुळशी जीवन आणि मोक्ष देणारी असेल. पण तुझा वापर माझ्या पूजेत करणे निशिद्ध असेल. त्यामुळे गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही. तुळस वनस्पती हिंदु धर्मात सर्वात पवित्र वनस्पती मानली जाते. हे पूजेच्या साहित्यात वापरले जातात. तुळस ही भगवान विष्णूची आवडती आहे. तुळशीशिवाय त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते. (Top Marathi Headline)
रिद्धी-सिद्धी अशा बनल्या गणपतीच्या पत्नी
एका पौराणिक कथेनुसार, भगवान गणेशाच्या शरीर रचनेमुळे कोणीही त्यांच्याशी लग्न करण्यास तयार नव्हते. त्यामुळे गणपतीने इतर देवी-देवतांच्या विवाहात अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली. या अडथड्यांमुळे देव त्रस्त झाले आणि उपायासाठी ब्रह्मदेवाकडे आले. तिथे त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यानुसार, ब्रह्म देवांनी आपल्या दोन मानस मुली रिद्धी आणि सिद्धी यांना गणपतीकडे शिक्षण घेण्यासाठी पाठवले. गणपती बुद्धीची देवता असल्याने ब्रहदेवानी आपल्या मुलींना त्यांच्याकडे पाठवले. रिद्धी सिद्धी या गणपतीकडे शिक्षण घेऊ लागल्या. (Latest Marathi Headline)
जेव्हा एखाद्याच्या लग्नाची बातमी गणपतीपर्यंत पोहचण्याची तेव्हा रिद्धी आणि सिद्धी त्यांचे लक्ष वळवायच्या. यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय देवतांचे सर्व विवाह संपन्न होऊ लागले. परंतु जेव्हा गणेशाला याबद्दल समजले, तेव्हा ते रिद्धी आणि सिद्धी यांच्यावर रागावले आणि त्यांना शाप देणार तितक्यात ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी गणपतीसमोर रिद्धी-सिद्धी सोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला. गणपतीने ते मान्य केले. अशा प्रकारे गणपतीचा विवाह झाला आणि रिद्धी सिद्धी त्यांच्या पत्नी झाल्या. गणपतीला रिद्धी-सिद्धीपासून दोन मुले झाली, त्यांची नावे शुभ आणि लाभ. पौराणिक मान्यतेनुसार गणपतीला आमोद आणि प्रमोद असे दोन नातू आहेत. (Todays Marathi Headline)
गणपती आणि रिद्धी सिद्धी यांच्या लग्नाबद्दल अजून एका कथा प्रचलित आहे. शिवपार्वती गणपती आणि कार्तिकेय या आपल्या मुलांच्या विवाहाबद्द चर्चा करत होते. देवी पार्वतीने गजानन आणि कार्तिकेय यांच्या विवाहाबद्दल चिंता व्यक्त केली. शंकर आधी विवाह कोणाचा करावयाचा या विचारात मग्न झाले. आधी लग्न कोणाचे या विषयावर तोडगा काढण्यासाठी शिव आणि माता पार्वतीने आपल्या दोन्ही मुलांना बोलावले. दोघांनाही जो कोणी सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याचे लग्न आधी होईल. असे सांगितले. (Top Trending News)
या आज्ञेप्रमाणे कार्तिकेय त्याच्या वाहनावर मोरावर स्वार होऊन विश्वाची प्रदक्षिणा पूर्ण करण्यास गेला. परंतु गणेश गेला नाही. आपल्या छोट्या उंदरावर बसून प्रदक्षिणा पूर्ण करणे शक्य नाही. म्हणून त्याने ही स्पर्धा युक्तीने जिंकायचे ठरविले. तो भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या समोर उभा राहिला आणि त्यांच्याभोवती प्रदक्षिणा मारू लागला. हे पाहून भगवान शिव आणि देवी पार्वती दोघेही आश्चर्यचकित झाले! गणपतीने त्यांच्या भोवती ७ प्रदक्षिणा घातल्या आणि “नमस्कार” करत त्यांच्यासमोर उभा राहिला. शिव आणि पार्वती यांच्या मिलनानेच जे जग बनले असल्याचे गणेशास माहित होते. त्याने शिव-पार्वतीलाच प्रदक्षिणा घालून स्पर्धा जिंकली. (Top Marathi News)
स्पर्धा जिंकण्याच्या मागील सुज्ञ कारण जाणून घेतल्यावर भगवान शिव आणि देवी पार्वतीने गणरायाचा विजय झाल्याचे घोषित केले. देवी पार्वतीने प्रत्येकाला तिचा मुलगा, भगवान गणेशासाठी एक अतिशय सुंदर आणि बुद्धिमान जोडीदार शोधण्याची आज्ञा दिली. अशातच एका राजाच्या वाड्यातून गणपतीसाठी लग्नाचा प्रस्ताव आला. देवी पार्वती विवाहाच्या प्रस्तावाने प्रभावित झाली आणि खूप आनंदी झाली. आणि तिने तो लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला. रिद्धी आणि सिद्धी या सर्वात सुंदर आणि ज्ञानी राजकन्या होत्या. गणपतीलाही त्या दोघी आवडल्या. (Latest Marathi News)
=========
Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात?
Ganesh Chaturthi : गणपतीची मूर्ती घरी आणताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
=========
लग्नाची तयारी झाली. भगवान शिव आणि देवी पार्वतीने भगवान गणेशाच्या लग्नाचे ठिकाण म्हणून एक मोठा महाल तयार करण्यासाठी विश्वकर्मा यांना सांगितले. भगवान गणेशाच्या रिद्धी आणि सिद्धी यांच्या या भव्य आणि महान विवाहासाठी प्रत्येक देव, दानव, ऋषी इत्यादींना आमंत्रित केले होते. मोठ्या थाटामाटात गणेशाचा विवाह पार पडला. गणेशाच्या विवाहानंतर रिद्धी-सिद्धी याना दोन पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांची नावे शुभ आणि लाभ अशी अनुक्रमे ठेवण्यात आली. (Social News)
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics