Home » Astronauts : अवकाशातून आल्यानंतर अंतराळवीरांचे खानपान आणि चालणे-फिरणे कसे असते?

Astronauts : अवकाशातून आल्यानंतर अंतराळवीरांचे खानपान आणि चालणे-फिरणे कसे असते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Astronauts
Share

१९ मार्च रोजी भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतली आहे. जुने २०२४ मध्ये अंतराळात गेलेली सुनीता तांत्रिक बिघाडामुळे तब्बल ९ महिने तिथेच अडकली. नुकतीच ती पृथ्वीवर परतली आहे. सुनीता पृथ्वीवर परतत असल्याचे सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर आता लोकांना तिच्या तब्येतीविषयी अनेक प्रश्न पडताना दिसत आहे. ती व्हिडिओमध्ये खूपच अशक्त आणि थकलेली दिसत होती.(Astronauts)

सुनीता तब्बल ९ महिने अवकाशामध्ये राहिल्याने तिथे असलेल्या शून्य गुरुत्वाकर्षणामुळे तिच्या शरीरामध्ये अनेक बदल झाले आहे. सुनीताला आता पृथ्वीवर आल्यानंतर इथल्या वातावरणाशी आणि गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेताना थोडा त्रास नक्कीच होणार आहे. अवकाशात असताना राहणीमानासोबतच या अंतराळवीरांना त्यांचा आहार देखील वेगळा ठेवावा लागतो. अवकाशात असताना जसे त्यांना त्या वातावरणाशी संबंधित सर्व काही अड्जस्ट करून राहावे लागते, तसेच पृथ्वीवर आल्यानंतर पुन्हा त्यांना इथल्या वातावरणाशी अड्जस्ट करावे लागते. (Sunita williams)

पृथ्वीवर आल्यानंतर या अवकाशवीरांना लगेचच आपले पृथ्वीवरील सामान्य जेवण जेवता येत नाही. ते सतत डॉक्टरांच्या नजरेखाली असतात. त्यांचे शरीर जसजसे या वातावरणाशी जुळवून घेते तसतसा त्यांचा आहार बदलला जातो. या लोकांना लगेच नॉन व्हेज फूड किंवा दारू दिली जात नाही. अवकाशातून आल्यानंतर अंतराळवीरांच्या आहार कसा असतो. त्यात कसे बदल होतात हे आपण या लेखातून जाणून घेऊया. (Sunita williams News)

Astronauts

अंतराळातून आल्यावर अंतराळवीरांची एनर्जी लेव्हल किती आहे, हे पाहूनच त्यांना आहार दिला जातो. अंतराळात राहिल्याने तिथल्या शून्य गुरुत्वाकर्षणाचा पाचनशक्तीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे पृथ्वीवर त्यांचे आहाराचे वेळापत्रक विचारपूर्वक तयार केले जाते. (Marathi Top News)

======

हे देखील वाचा : Tenzin Gyatso : दलाई लामांचे चीनला आव्हान !

======

अंतराळयान पृथ्वीवर आल्यानंतर सुरुवातीला अंतराळवीरांना हलका आणि तरल आहार दिला जातो. त्यांना पोटभर हेव्ही आहार न देता हायड्रेशन आणि एनर्जी टिकवण्यासाठी पाणी, ग्लुकोजयुक्त किंवा इलेक्ट्रोलाइट पेय पिण्यासाठी दिली जातात. कारण पृथ्वीवर आल्यानंतर पोटाला गुरुत्वाकर्षणात काम करण्याची सवय करून घेण्यास वेळ जातो. (Marathi Latest News)

जर आकाशवीरांची परिस्थिती स्थिर असेल तर त्यांना सहजपणे पचणारे साधे अन्न दिले जाते. ज्यात उकडलेले तांदूळ, मॅश्ड बटाटे, उकडलेल्या भाज्या किंवा टोस्ट यांचा समावेश असतो. त्यांना प्रोटीन आणि कॅलरी मिळण्यासाठी मांसपेशींचे नुकसान भरून काढण्यासाठी उकडलेली अंडी, चिकन ब्रोथ आदी हलके प्रोटीन असलेले पदार्थ दिले जातात.(Trending News)

अंतराळातून आल्यानंतर एक दोन दिवसांनी पृथ्वीवर विशेष स्पेस सेंटरमध्ये दैतीशीयांच्या सल्ल्यानुसार या अवकाशवीरांचे डाएट सामान्य करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना प्रोटीनमध्ये चिकन, मासे, कार्बोहायड्रेटसाठी पास्ता, ब्रेड आणि व्हिटामिनने भरपूर भाज्यां संतुलित आहारामध्ये दिल्या जातात. अंतराळात हाडे ठिसूळ असल्यामुळे त्यांना कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी साठी सप्लीमेंट्स सुद्धा दिले जातात. (Social News)

Astronauts

पृथ्वीवरील चालणे
सुरुवातीला अंतराळवीरांना स्ट्रेचर आणि खुर्चीवर बसवून किंवा झोपवून यानातून नेण्यात येते. अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने भारहिनतेमुळे मांसपेशी, हाडे आणि संतुलन प्रणाली मोठ्या प्रमाणावर प्रभावित होते. त्यामुळे पुन्हा आल्यानंतर त्यांचे काम हळूहळू सुरु होते आणि त्यांना गती मिळते. पृथ्वीवर आल्यानंतर अंतराळवीर त्यांच्या पायावर उभे राहू शकत नाही. गुरुत्वाकर्षणमध्ये अचानक आल्यानंतर त्यांना चक्कर, कमजोरी किंवा भोवळ आल्यासारखं सुद्धा होतं. (Marathi Top News)

पृथ्वीवर आल्यानंतर पुढील एक दोन दिवसात अंतराळवीर आधार पकडून हळूहळू उभं राहण्याचा प्रयत्न करतात. फिजियोथेरपिस्टच्या साहाय्याने हळूहळू त्यांच्या मांसपेशी सक्रिय करण्यास सुरुवात होते. त्यांना स्वतःचे संतुलन साधणं कठीण जात असल्याने त्यांना वॉकर किंवा सहायक स्टाफची मदत दिली जाते. पुढे हे अंतराळवीर व्यायाम सुरू करतात. यामध्ये स्ट्रेंथ, ट्रेडमिल आणि समतोल व्यायाम त्यांच्याकडून करून घेतात. त्यांना त्यांची पूर्ण शक्ती परत मिळवण्यासाठी काही आठवडे किंवा महिने देखील लागू शकतात. (Marathi Trending News)

६ महिने किंवा त्याहून अधिक काळ अंतराळात राहणाऱ्या अंतराळवीरांना चालण्यासाठी आणि सामान्य आहार सुरु करण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यांचे स्नायू २० ते ३० % कमकुवत झालेले असू शकतात. प्रत्येक अंतराळवीरांचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते. काही लवकर बरे होतात, तर इतरांना अधिक काळजीची आवश्यकता असते. अंतराळातून परतल्यानंतर, अंतराळवीरांना चिकन, मटण किंवा अल्कोहोल सुरू करण्यासाठी त्यांची शारीरिक स्थिती, पाचक प्रणाली तपासावी लागते. शिवाय नासाच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना नॉन व्हेज खाता येते.

Astronauts

अंतराळातून परतल्यानंतर २-३ दिवसांनी अंतराळवीरांची प्रकृती स्थिर असेल, त्यांना मळमळ किंवा कमजोरी नसल्यास, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून शिजवलेली कोंबडी दिली जाते. मटण पचण्यास जड आणि हाय कॅलरीयुक्त असल्याने ते लगेच त्यांना दिले जात नाही. साधारण एका आठवड्यानंतर जर पचनशक्ती सामान्य असेल तरच दिले जाते.

======

हे देखील वाचा : Ranjana Srinivasan : हमासची पाठराखण करणारी रंजना भारतात येणार !

======

अल्कोहोल कधी सुरु करता येते?
पृथ्वीवर आल्यानंतर कमीतकमी पहिल्या ७ ते १० दिवसांपर्यंत अंतराळवीरांना अल्कोहोल पूर्णपणे बंद असते. दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने त्यांचे यकृत आणि मूत्रपिंड या अवयवांवर विपरीत परिणाम झालेला असतो. शरीर पूर्णपणे हायड्रेटेड आणि स्थिर नसते. त्यामुळे लगेच दारूचे सेवन शरीराचे संतुलन बिघडवू शकते. त्यामुळे आल्यानंतर साधारण १० ते १५ दिवसांनी बिअर किंवा वाइन घेण्यास परवानगी दिली जाऊ शकते. हे अगदी कमी प्रमाणात आणि डॉक्टरांच्या देखरेखीनेच होते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.