गणेशोत्सव अगदीच तोंडावर येऊन ठेपला आहे. सर्वत्र फक्त आणि फक्त बाप्पांचीच चर्चा आणि धूम पाहायला, ऐकायला मिळत आहे. बाप्पा येणार म्हणून सगळ्यांचाच उत्साह अक्षरशः द्विगुणित झाला आहे. घरात बाहेर सगळीकडेच बाप्पांच्याच चर्चा ऐकायला मिळत आहे. बाप्पांच्या अनेक आख्ययिका देखील ऐकायला मिळत आहे. ६४ कलांचा अधिपती आणि बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पांनी आपल्या बुद्धिचातुर्याने अनेक लोकांचे गर्व हरण केले. यातलेच एक होते कुबेर. धनाची देवता म्हणून कुबेर प्रसिद्ध आहे. लक्ष्मी आणि धनासाठी कुबेर महाराजांची पूजा केली जाते. मात्र याच कुबेर महाराजांना त्यांच्या संपत्तीचा गर्व झाला तेव्हा गणेशाने आपल्या बुद्धीने त्यांचे गर्वहरण केले. याबद्दल एक आख्ययिका देखील सांगितली जाते. (Ganesh Chaturthi)
कैलासावर शंकर-पार्वती गजाननासोबत बसलेले होते. तेव्हा सर्व देवांचा खजिनदार कुबेर हा स्वर्गात राहत होता. कुबेर गर्भश्रीमंत होता. आपल्याकडील संपत्ती सतत उधळत राहण्याचा त्याला मोठा छंद होता. त्याने मोठे मोठे प्रासाद बांधून घेतले होते. आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी तो सतत विविध समारंभाचे आयोजन करुन सर्व देवांना आकर्षित करायचा. त्याने कितीही उधळपट्टी केली तरी त्याचा खजिना कधीही रिकामा होत नसे. यामुळे त्याला आपल्या श्रीमंतीचा गर्व झाला होता. (Marathi News)
असेच एकदा त्याला आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची लहर आली. म्हणून त्याने एका भोजन समारंभाचे आयोजन केले आणि सर्व देवांना आमंत्रित केले. कुबेर हा शंकराचा निस्सीम भक्त होता. त्यामुळे त्याने सर्वप्रथम महादेवांना निमंत्रण करण्याचे ठरविले. तो स्वतः कैलासावर शंकराना निमंत्रण करण्यास निघाला. कैलासावर आल्यावर शंकर-पार्वतीना हात जोडून कुबेराने विनंती केली. ‘हे देवाधिदेवा, जर तुम्ही माझ्याकडील भोजन समारंभास उपस्थित राहिलात तर माझ्या समारंभाची शोभा वाढेल. सर्व देवांमध्ये माझा मान द्विगुणित होईल.’ (Todays Marathi Headline)
परंतु शंकरांनी कैलास सोडून जाणे आपणास शक्य नसल्याचे सांगून त्यास नम्रपणे नकार दिला. पण कुबेर मात्र शंकरांनी निमंत्रण स्वीकारल्याशिवाय ऐकायलाच तयार नव्हता. शेवटी तेथेच असलेल्या पार्वतीने शंकरांना सल्ला दिला. ‘तुमच्याऐवजी आपला पुत्र गजानन यालाच कुबेराकडील समारंभास पाठवावे.’ शंकरांना हा सल्ला पसंत पडला. त्यांनी कुबेराला गणेशास भोजनासाठी पाठविण्याचे आश्वासन दिले. तेव्हा नाईलाजाने कुबेराने ते मान्य केले. (Top Marathi Marathi)
समारंभाचा दिवस उजाडला. भोजन समारंभाची जय्यत तयारी कुबेराने केलेली होती. नाना प्रकारच्या पंचपक्वान्नांचा घमघमाट सगळीकडे पसरला होता. कुबेर स्वतः प्रवेशद्वारावर उभे राहून त्यांचे स्वागत करू लागला. काही वेळाने गणेश तेथे आले. त्यांना पाहताच कुबेराने त्याचे हार्दिक स्वागत केले. कुबेराने गणेशास स्वतः भोजनाच्या पंगतीत आणून बसवले आणि हवे तेवढे भोजन घेण्याची विनंती केली. तुम्हाला कशाचीही कमतरता बसणार नाही, एवढे अन्न मुदपाकखान्यात तयार असल्याची सांगितले. (Latest Marathi News)
गणेश भोजनास बसले. त्यांनी खाण्यास सुरुवात केली. एकामागोमाग एक पदार्थाची मागणी गणेश करत होते. एकामागोमाग एक एक पदार्थाचा फडशा ते उडवीत होते. शेवटी शिजवलेले अन्न संपले. तरीही गणपतीची भूक काही शमेना. त्यामुळे कुबेराची मान शरमेने खाली गेली. त्याने गणपतीस विनंती केली, ‘स्वयंपाक खोलीत अन्न अर्धवट शिजत आहे. पूर्ण शिजल्यावर तुम्हाला वाढले जाईल.’ पण गणेशास आपली भूक आवरेना. ते उठून स्वयंपाक खोलीत गेले. तेथे असलेले कच्चे, अर्धवट शिजलेले सारे पदार्थ त्याने संपवून टाकले. तरीहि गणेशाची भूक आवरेना. तेव्हा ते कुबेरास म्हणाले, ‘तुझे सारे पदार्थ संपले. आता मला अजून जेवण दे. नाहीतर मी तुलाच खाईल. हे ऐकून कुबेर घाबरून पळू लागले त्यांच्या मागे गणेश पळू लागले. (Top Trending News)
=========
Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात?
Ganesh Chaturthi : गणपतीची मूर्ती घरी आणताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
=========
पळत पळत ते दोघेही कैलासावर आले. कुबेराने शंकरांच्या पायांशी लोळण घेऊन घडलेली हकीकत सविस्तर वर्णन केली. ते ऐकून श्रीशंकर गणेशास म्हणाले, ‘गणेशा, तू असे का करत आहेस?’ तेव्हा गणेश श्रीशंकरांना म्हणाले, ‘कुबेराने हवे तेवढे अन्न खाण्यास सांगितले. पण मला पाहिजे तेवढे भोजन तो पुरवू शकला नाही. त्यामुळे माझी भूक शांत झालेली नाही. म्हणूनच मी कुबेराच्या मागे लागलो आहे’ तेव्हा श्रीशंकरांनी गणेशास आज्ञा केली, ‘पार्वतामाते जवळ जा. तिने तुझ्यासाठी मोदक ठेवले आहेत, ते खा.’ त्याबरोबर श्रीगणेश तेथून निघून गेले. मग कुबेर शंकराकडे क्षमयाचना करून म्हणाला, ‘मला माझ्या श्रीमंतीचा खूप गर्व होता. मी त्रैलोक्याला पुरेल एवढे भोजन घालू शकतो असा मला अभिमान होता. परंतु आपल्या या पुत्राने माझे गर्वहरण करून माझी चूक मला दाखवून दिली. म्हणून यापुढे मी कधीही गर्व करणार नाही. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics