३१ डिसेंबर जसे जवळ येत आहे, तसतशी थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांच्या तयारीला वेग येत आहे. २०२५ सालाला निरोप देताना आणि २०२६ सालाचे दणक्यात स्वागत करण्यासाठी तरुणाई अतिशय उत्साहात आहे. सगळ्यांचेच पार्ट्यांचे विविध प्लॅन्स ठरलेले असतील. या थर्टी फर्स्टच्या पार्टीमध्ये आपणच सर्वात सुंदर आणि आकर्षक दिसायला पाहिजे असा सगळ्यांचाच अट्टहास असेल. यासाठी अनेक जणी पार्लरमध्ये जाऊन विविध ट्रीटमेंट देखील घेत असतील. मात्र थर्टी फर्स्टचा आठवडा वर्किंग असल्याने या आठवड्यात सगळ्यांनाच पार्लरमध्ये जाणे शक्य होणार नाही. पण पार्टीमध्ये ग्लो तर पाहिजेच पाहिजे. मग यासाठीच आज आम्ही तुम्हाला घरगुती काही सोपे आणि उत्तम रिझल्ट देणारे उपाय सांगणार आहोत. (New Year Party)
हायड्रेट राहा
थर्टी फर्स्टची पार्टी ही रात्री होते आणि हिवाळ्यात असते. त्यामुळे आपली त्वचा आधीच कोरडी असते. त्यात रात्री जास्त थंड वातावरण असल्याने त्वचा अधिक कोरडी होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर शरीरातील लिक्विड इंटेक वाढवावा लागेल. जेणेकरून तुमचे शरीर आतून स्वच्छ झाले तर तुमची बाहेरील त्वचा देखील यामुळे चांगली दिसेल. त्यामुळेच तुम्ही शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेशे पाणी पिणे आवश्यक आहे. यासोबतच फळांचा रस, नारळ पाणी इत्यादींचे सेवन करू शकता. (Skin Care)
व्यायाम करा
ग्लोईंग त्वचा हवी असेल तर दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे तुमची त्वचा हेल्दी राहते आणि रक्ताभिसरण क्रिया देखील चांगली राहिल्याने तसेच व्यायाम केल्याने घामावाटे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. (Todays Marathi Headline)
७ ते ८ तासाची झोप
दररोज सात ते आठ तासांची झोप घेणे गरजेचे असते. रात्री झोपल्यानंतर त्वचेच्या पेशी रिपेअर होतात यामुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल्स आणि सूज येणे सारख्या समस्या उद्भवत नाहीत. तसेच पचनक्रिया देखील नीट राहते यामुळे पिंपल्स, काळे डाग यासारख्या समस्या उद्भवत नाहीत. (Marathi News)
चांगला आहार
चांगली आणि ग्लोईंग त्वचा हवी असेल तर तुम्हाला आहारात चांगल्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. तेव्हा तुम्ही जंक फूडचे अधिक सेवन न करता आहारात फळं. पालेभाज्या तसेच व्हिटॅमिन सी ने समृद्ध असणारी फळे खा. व्हिटॅमिन सी हे एक अँटिऑक्सिडेंट असून हानिकारक फ्री रॅडिकल्सशी लढतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो आणि कोलेजन उत्पादन वाढवून सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. (Marathi Trending Headline)

दही आणि टोमॅटो फेसपॅक
हा फेसपॅक तयार करण्यासाठी एका भांड्यात १ चमचा टोमॅटोची पेस्ट घ्या आणि यामध्ये २ चमचे दही मिक्स करून चेहऱ्यावर आणि मानेला लावा. १५ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर चेहरा स्वच्छ धुवा. टोमॅटोमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आढळतात ज्यामुळे त्वचेवर चमक येते. त्याचबरोबर दही त्वचा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मदत करते. (Top Marathi News)
कॉफी आणि मध फेसपॅक
हा फेसपॅक तयार करण्यासाठी एक चमचा कॉफी आणि एक चमचा कोको पावडर एका भांड्यात घ्या. आता त्यात २ ते ३ थेंब मध आणि लिंबाचा रस टाका. आवश्यकतेनुसार त्यामध्ये दूध टाकून त्याची स्मूद पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. १० मिनिटं चेहरा तसाच ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. (Latest Marathi Headline)
बेसन आणि हळद फेस पॅक
हा फेस पॅक बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात 2 चमचे बेसन घ्या. त्यात चिमूटभर हळद आणि दूध घालून मिक्स करा. आता ते चेहऱ्यावर लावा आणि कोरडे राहू द्या. सुमारे 20 मिनिटांनंतर, हलक्या हाताने घासून स्वच्छ करा. शेवटी चेहरा पाण्याने धुवा. यामुळे तुमचा चेहरा खूप मऊ आणि ग्लोइंग दिसेल. (Top Stories)
=======
Travelling : भारतातील सर्वोत्तम रोड ट्रिप करायची असेल तर ‘ही’ ठिकाणं आहेत परफेक्ट ऑप्शन
=======
कोरफड आणि दही फेस पॅक
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही कोरफड आणि दही यांचा फेस पॅक लावू शकता. ते त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि ती चमकदार बनवते. हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात दोन चमचे एलोवेरा जेल घ्या. त्यात एक चमचा दही घालून मिक्स करा. आता ते चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 15 मिनिटे राहू द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे काही मिनिटांतच तुमच्या चेहऱ्यावर ग्लो दिसून येईल. याशिवाय हिवाळ्यात कोरडेपणापासूनही आराम मिळेल. (Top Trending News)
फेस मास्क
नवीन वर्षापूर्वी त्वचेला खोलवर हायड्रेट करण्यावर लक्ष केंद्रित करा. प्रथम, हायल्युरोनिक ऍसिड असलेले हायड्रेटिंग सीरम लागू करा, नंतर ते समृद्ध मॉइश्चरायझरने लॉक करा. हे आपल्या त्वचेला खोलवर हायड्रेट करू शकते. नियमित नाईट क्रीमऐवजी रात्रीचा मास्क वापरा. रात्रभर मास्क लावल्यास आपल्या त्वचेचे खोलवर पोषण होते. रात्रभर मास्क लावल्यास आपली त्वचा स्पासारखी नितळ होते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
