Home » Politics : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन, जाणून घ्या त्यांची कारकीर्द

Politics : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन, जाणून घ्या त्यांची कारकीर्द

by Jyotsna Kulkarni
0 comment
Politics
Share

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी आज सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने झारखंडच्या राजकारणातील एक मोठे युग समाप्त झाले आहे. झारखंडचे वर्तमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे ते वडील होत. हेमंत सोरेन यांनी स्वतः वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. ‘दिशोम गुरु किंवा गुरुजी’ या नावाने ते झारखंडमध्ये प्रसिद्ध होते. मागील काही दिवसांपासून ते किडनीच्या आजारांत त्रस्त होते. त्यांच्यावर दिल्ली येथील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुजी यांच्या निधनामुळे झारखंडच्या राजकारणात एक मोठी पोकळी तर निर्माण झालीच शिवाय येथील राजकारणच आधारस्तंभच हरपला आहे. (Marathi Latest Headline)

झारखंडच्या वेगळ्या राज्याच्या चळवळीत शिबू सोरेन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली हे उल्लेखनीय आहे. राज्य स्थापनेनंतर ते तीनदा झारखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांनीच झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केली. ते सात वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. २००४ मध्ये ते मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रीय मंत्री देखील होते. (Latest Political News)

कोण होते शिबू सोरेन?
शिबू सोरेन झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक सदस्य होते आणि त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी संघर्ष केला. शिबू सोरेन यांना झारखंडमध्ये ‘गुरुजी’ म्हणून ओळखले जाते. शिबू सोरेन यांनी स्वतंत्र झारखंड राज्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. ते तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिबू सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झारखंड मुक्ती मोर्चाने आदिवासी भागांमध्ये सामाजिक आणि राजकीय जागृतीचे अभियान चालवले. राज्याला वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. (Social Updates)

Politics

शिबू सोरेन यांचा जन्म ११ जानेवारी, १९४४ रामगढ जवळील नेमरा गावातील सोबरन मांझी यांच्या घरी झाला. शिबू यांचे वडील सोबरन मांझी हे शिक्षक होते. आजूबाजूच्या गावातील सर्वात शिक्षित आदिवासी व्यक्ती म्हणून सोबरन मांझी यांची ओळख होती. शिबू सोरेन यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या संपन्न होते. शिबू सोरेन थोडे मोठे झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने त्यांना शिक्षणासाठी गावापासून दूर शहरात हॉस्टेलमध्ये ठेवले. ते त्यांच्या भावासोबत हॉस्टेलमध्ये राहून अभ्यास करू लागले. (Top Marathi Stories)

याचदरम्यान शिबू सोरेन यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर शिबू सोरेन यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. याकाळात ते हजारीबाग येथे राहणाऱ्या फॉरवर्ड ब्लॉक नेता लाल केदार नाथ सिन्हा यांच्या संपर्कात आले. काही दिवस लहान मोठे काम देखील केले. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्याची ठरवले. शिबू सोरेन यांनी सर्वात आधी बड़दंगा पंचायतमधून सरपंच या पदासाठी निवडणूक लढली, मात्र ते यात हरले. मात्र त्यांनी हार मानली नाही. त्यानंतर त्यांनी विधानसभेची देखील निवडणूक लढवली, यातही ते हरले. मात्र तरीही ते नेटाने काम करत राहिले. (Political News)

१९८० सालापर्यंत शिबू सोरेन झारखंडच्या राजकारणातील मोठे नाव बनले. १९८० साली ते पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी उभे राहिले. यावेळी त्यांनी बिहारपासून झारखंड वेगळे करण्याची मागणी केली. आणि ते जिंकले. शिबू सोरेन यांनी १९८०, १९८९, १९९१, १९९६, २००२, २००४, २००९ आणि २०१४ साली त्यांनी दुमकामधून लोकसभा निवडणूकक जिंकल्या. शिबू सोरेन हे जवळजवळ ४० वर्ष राजकारणात सक्रीय होते. ते
आठवेळा लोकसभा खासदार राहीले होते. (todays Marathi Headline)

शिबू सोरेन दोन वेळा राज्यसभेचे खासदार होते. संथाल समुदायात जन्मलेले शिबू सोरेन हे रामगड जिल्ह्यातील आहेत. रामगड जिल्हा तेव्हा बिहार राज्यात होता. १९७२ मध्ये डावे नेते ए. के रॉय आणि कुर्मी नेते बिनोद बिहारी महत्व महतो यांच्यासोबत मिळून त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केली. झारखंड वेगळे राज्य करण्यासाठी झालेल्या आंदोलनामध्ये त्यांची खूप मोठी भूमिका होती. शिबू सोरेन यांनी झारखंड मुक्ति मोर्चाचे नेतृत्व तब्बल ३८ वर्षांहून अधिक काळ केले. झारखंड राज्याच्या स्थापनेसाठी त्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला. (Marathi Top News)

Politics

शिबू सोरेन हे पहिल्यांदा २००५ मध्ये झारखंडचे मुख्यमंत्री बनले, त्यानंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करु न शकल्याने सरकार स्थापनेच्या अवघ्या नऊ दिवसानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. दुसऱ्यांदा त्यांनी २७ ऑगस्ट २००८ रोजी मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि १९ जानेवारी २००९ पर्यंत पदावर राहिले. तिसऱ्यांदा ते ३० डिसेंबर २००९ रोजी मुख्यमंत्री झाले आणि १ जून २०१० पर्यंत त्यांनी जबाबदारी सांभाळली. सोरेन यांची राजकीय कारकीर्दही काही वादांनी देखील गाजली. राजकारणात त्यांनी संसदेपासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. शिबू सोरेन केंद्रात नरसिम्हा राव आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री बनले. केंद्रात तीनवेळा ते कोळसा मंत्री राहिले.(Marathi Trending News) 

शिबू सोरेन यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचे झाले तर त्यांच्या पत्नीचे नाव रुपी सोरेन आहे. या जोडप्याला तीन मुलं आणि एक मुलगी आहे. सोरेन यांचे तिन्ही मुलं राजकारणात सक्रिय आहेत. सर्वात मोठा मुलगा दुर्गा सोरेन हा देखील राजकारणात सक्रिय होता, मात्र २००९ साली त्यांचे संशयास्पद निधन झाले. . दुर्गा सोरेन यांची पत्नी सीता सोरन आज बीजेपीमध्ये कार्यरत आहेत. दुर्गा सोरेन आणि सीता सोरेन यांनी तीन मुली आहेत. (Marathi Latest News)

=========

Prince Mohammed bin Salman : स्वप्नातील शहराचा प्रकल्प डबाबंद होणार

=========

शिबू सोरेन यांचे दुसरे पुत्र हेमंत सोरेन सध्या झारखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांची पत्नी कल्पना सोरेन सरकारमध्ये मंत्री आहेत. हेमंत सोरेन आणि कल्पना सोरेन यांना दोन मुलं आहेत. तर शिबू यांचे सर्वात लहान पुत्र बसंत सोरेन देखल राजकारणात आहेत. ते सध्या झारखंड सरकारमध्ये मंत्री आहेत. बसंत सोरेन यांचा लवकरच घटस्फोट होणार आहे. या दोघांना दोन मुली आहेत. (social News)

शिबू सोरेन यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही दुःखद बातमी दिली. “आदरणीय दिशाम गुरुजी आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत. आज मी शून्य झालो.” अशा शब्दात हेमंत सोरेन यांनी शोक व्यक्त केला.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.