महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सांगलीची प्रतीक्षा बागडी हिने मानाचा पुरस्कार जिंकत तिचे नाव प्रत्येकाच्या मनावर कोरले आहे. प्रतीक्षा ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे. सांगली-मिरज येथील जिल्हा क्रिडा संकुलात महिला महाष्ट्र केसरी पदकासाठी कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते.तर हिंदकेसरी दिनानाथ सिंग यांच्या हस्ते कुस्तीच्या या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते.(First Women Maharashtra Kesari)
अंतिम लढत ही प्रतीक्षा बागडी आणि कल्याण मधील वैष्णवी पाटील यांच्यात झाली. या मध्ये वैष्णवीला प्रतीक्षा बागडीने चितपडत करत पहिल्या महिल्या महाराष्ट्र केसरी पदाचा मान पटकावला आहे. अंतिम सामन्यात बागडी आणि पाटील या दोघी खेळाच्या मध्यापर्यंत चार-चार अशा गुणांनी बरोबरीत होत्या. परंतु त्यानंतर बागडी हिने पाटील हिला चितपट करत चार विरुद्ध दहा गुणांनी महिला केसरी पद जिंकले. प्रतीक्षा बागडी ही विजयी झाल्याने तिचे आता कौतुक केले जात आहे. तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस प्रा. बाळासाहेब लांडगे यांनी सुद्धा तिचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, अंतिम सामान्यापूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत प्रतीक्षा बागडी हिने कोल्हापूरची अमृता पुजारी हिचा ९ विरुद्ध २ गुणांनी पराभव केला होता. तर दुसऱ्या कुस्तीत वैष्णवी पाटीलने वैष्वणी कुशाप्पा हिचा ११ विरुद्ध १ अशा गुणांनी पराभवत करत पाटीलने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.
वैष्णवी पाटीलचा जरी पराभव झाला असला तरीही तिच्या तालमीच्या वस्तादांनी तिचा आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर प्रतिस्पर्धी खेळाडूचे वजन अधिक असल्याने वैष्णवीचा पराभव झाला. मात्र तरीही आम्ही आनंदित असल्याचे ही म्हटले आहे.
कोण आहे प्रतीक्षा बागडी?
सांगतीली तुंग गावात प्रतीक्षा बागडी राहते. ती कुस्तीचा सराव वसंत कुस्ती केंद्रात करते. तसेच प्रतीक्षाने अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवली आहेत. खेलो इंडियामध्ये सिल्वर पदकाची कमाई केली आहे. त्याचसोबत राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सीनियर गटात सिल्वर पदकाची कमाई केली आहे. (First Women Maharashtra Kesari)
हे देखील वाचा- महिला टी२० विश्वचषकात पहिल्यांदाच भारतीय संघाने कोरले नाव, शेफाली ब्रिडेगने असा रचला इतिहास
तर वैष्णवी पाटील ही कल्याणची राहणारी आहे. जय बजरंग तालीम संघ, नांदीवलीत ती सराव करते. वैष्णवीने विशाखापट्टणम येथे सीनियर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ब्रांन्ड मेडलची कमाई केली जाते.