Home » मन्या सुर्वेचा एन्काऊंटर !

मन्या सुर्वेचा एन्काऊंटर !

by Team Gajawaja
0 comment
First Encounter In Mumbai
Share

मुंबईच्या गुन्हेगारीच्या इतिहासात अनेक एन्काऊंटर झाले. पण तुम्हाला माहितीये का पहिला एन्काऊंटर कुणाचा झाला होता? तो होता मन्या सुर्वेचा. पण मन्याची एवढी दहशत का निर्माण झाली होती? मन्याचा आणि दाऊदचा कधी संबंध आला होता का? त्याचा एन्काऊंटर नेमका कसा झाला आणि कोणी केला? जाणून घेऊयात.

फार कमी जणांना माहित असेल की मन्या सुर्वे आणि नाना पाटेकर हे नातेवाईक होते. खुद्द नानाने काही मुलाखातीत हे सांगितलं होतं. नाना आणि मन्या सुर्वे हे मावस भाऊ. पण मन्या सुर्वेची दहशत कधी सुरू झाली. तर तो काळ होता १९६७ चा. माजी पोलिस अधिकारी इसाक बागवान यांनी आपल्या आत्मचरित्रात मन्या सुर्वेवर विस्तृत लिहिले आहे. अभ्यासात हुशार असलेला मन्याचा भाऊ दादर भागात खंडणी उकळायचा. मन्याचा भाऊ भार्गव खंडणी उकळायचा. खंडणीवरून मन्या आणि भार्गवचे दाते-दांडेकर टोळीशी वाद झाले. त्यावरून मन्या आणि भार्गवने दांडेकरचा खुन केला. पोलिसांनी मन्या आणि भार्गवला अटक केली. पुढे मन्या पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला आणि मन्या सुर्वेचा मन्या भाई झाला. (First Encounter In Mumbai)

मन्या सायन्सचा विद्यार्थी होता. त्यामुळे रसायनाची त्याला ओळख होती. कुठलाही गुंड दहशत पसरवण्यासाठी बंदुक किंवा चाकू, सुऱ्याचा वापर करायचेय पण मन्या दहशत पसरवण्यासाठी असिड हल्ला करायचा. मन्याने टूर अण्ड ट्रॅव्हल्सच्या मस्तकार यांना मन्याने खंडणी मागितली. पण मस्तकार यांनी खंडणी द्यायला नकार दिला. तेव्हा मन्याने मस्तकार यांच्यावर असिड हल्ला केला. मस्तकार यांना जेव्हा रुग्णायलयात दाखल केलं तेव्हा मन्या डॉक्टरांच्या वेषात तिथे पोहोचला आणि मस्तकारांना धमकी दिली. (First Encounter In Mumbai)

मगनलाल वाणी नावाचे एक उद्योजक होते. त्यांनीही मन्याला खंडणी द्यायला नकार दिला. तेव्हा मन्याने वणी यांच्यावर असिड फेकलं. दुर्दैवाने या हल्ल्यात वाणी यांचा मृत्यू झाला. मन्याची दहशत वाढत होती आणि पोलिसांची डोकेदुखी. गुन्हे करण्यासाठी मन्या सुर्वे चोरीच्या गाडीचा वापर करायचा. पोलिसांनी मन्या सुर्वेला गाडी पुरवणाऱ्याला गळाला लावले, ११ जानेवारी १९८२ ला वडाळ्यात आंबेडकर कॉलेजजवळ मन्या ही गाडी घ्यायला येणार होता, अशी टीप पोलिसांना मिळाली. तेव्हा इसाक बागवान, राजा तांबट, भिडे, परांडे आणि शिर्के आंबेडकर कॉलेजजवळ गेले. बागवान गाडी चालवत होते. या मिशनसाठी पोलिसांनी वेगळी गाडी घेतली होती. (First Encounter In Mumbai)

बागवान कॉलेजचे तरुण वाटायचे म्हणून त्यांची निवड या मिशनसाठी झाली होती. आंबेडकर कॉलेजजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांनी मन्याची वाट पाहिली. बागवान गाडीच्या बोनेटवर बसून पुस्तक वाचायचे नाटक करत होते आणि त्याखाली त्यांनी पिस्तुल लपवलं होतं. काही वेळाने एक टॅक्सी कॉलेजजवळ आली. त्यात मन्या सुर्वे एका महिलेसोबत होता. पोलिस कर्मचारी भिडे यांनी हाच मन्या सुर्वे असल्याची खुण केली. तेव्हा मन्या सुर्वे खाली उतरला आणि पुढे जाऊ लागला. इसाक बागवान त्याला धरणार होते, पण त्यांच्यापेक्षा मजबूत बांध्याचा असल्याने त्यांनी तो विचार सोडून दिला.

======

हे देखील वाचा : अजमेर बलात्कार प्रकरण !

======

मन्या कुठेही गेला तर त्याचा कमरेला पिस्तुल असतं आणि असिड बॉम्बसुद्धा. बागवान यांनी मन्याला हाक मारली. तेव्हा मन्याने मागे वळून पाहिलं. पोलिसांनी आपल्याला घेरलंय हे लक्षात येताच मन्याने बागवान यांच्यावर गोळीबार केला. तेव्हा बागवान यांनी ती गोळी चुकवली. तेवढ्यात तिथून एक बस आली. खाली काय झालं हे पहायला बसचा कंडक्टर खाली उतरला. तेव्हा मन्याने पोलिसांच्या दिशेने आणखी एक गोळी झाडली आणि नेमकी ही गोळी त्या कंडक्टरला लागली. त्यानंतर बागवान यांनी एक गोळी मारली आणि ती बरोबर मन्याला लागली. पोलिस अधिकारी तांबट आणि शिर्के यांनीही मन्याला गोळी मारली. तेव्हा जखमी होऊन मन्या खाली पडला तसाच पोलिसांनी त्याला पकडलं. पोलिसांनी त्या जखमी कंडक्टरला आणि मन्याला सायन रुग्णालयात दाखल केले. पण मन्याचा त्यात मृत्यू झाला होता. हा मुंबईतला पहिला एन्काऊंटर होता. या कामगिरीसाठी बागवान, तांबट आणि भिडे यांचा पोलिस शौर्यपदकाने सन्मान करण्यात आला. (First Encounter In Mumbai)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.