Home » देशातील पहिले डॉफ्लिन संशोधन केंद्र

देशातील पहिले डॉफ्लिन संशोधन केंद्र

by Team Gajawaja
0 comment
Dolphin Research Center
Share

बिहारराज्यातील पटना येथे आशिया खंडातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र (Dolphin Research Center) उभारण्यात आले आहे. 2020 मध्ये या संशोधन केंद्राच्या स्थापनेची घोषणा झाली होती. सुमारे 30 कोटी खर्च करुन अत्यंत आधुनिक सुविधा असलेले हे डॉल्फिन संशोधन केंद्र सुरु झाले आहे. यामधून संशोधक आणि विद्यार्थ्यांना नदिचे आरोग्य आणि त्यातील जीव यावर संशोधन करण्यासाठी अधिक व्यापक पद्धतीनं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. हे संशोधन केंद्र पाटणा विद्यापीठ परिसरात गंगेच्या काठावर बांधले गेले आहे. या संशोधन केंद्राच्या माध्यमातून संशोधकांना गोड्या पाण्यातील डॉल्फिन, विशेषत: गंगा नंदिमध्ये रहाणा-या डॉल्फिनचे वर्तन समजून घेण्यास मदत होणार आहे. त्यातून गंगेच्या पाण्याची शुद्धताही तपासण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्राची (Dolphin Research Center) स्थापना ही पर्यावरण आणि वन्यजीव संशोधनातील मैलाचा दगड असल्याचे सांगितले जाते. 2009 मध्ये डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर पहिल्यांदाच देशातील एकमेव राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन (Dolphin Research Center) संस्था बिहार मध्ये सुरु करण्यात आली आहे. यातून गोड्या पाण्यात आढळणाऱ्या डॉल्फिनचे वर्तन समजून घेण्याबाबत अधिक चांगल्या पद्धतीनं संशोधन करण्यात येणार आहे. डॉल्फिन ज्या नंदिमध्ये जास्त आढळतात, त्या नदिचे पाणी शुद्ध असल्याचे समजले जाते. गंगा नदिमध्ये गेल्या काही वर्षात डॉल्फिनचे अस्तित्व वाढले आहे.

गंगा नदी शुद्धिकरण मोहिमेमुळे या डॉल्फिनची संख्या वाढल्याची माहिती आहे. त्यामुळे पर्यावरणवादी आता याच गंगा नदी शुद्धीकरणाच्या पुढच्या टप्प्यामुळे खुष झाले आहेत. एनडीआरसीच्या स्थापनेला पर्यावरणवादीही एक मोठे वरदान मानतात. नदीत डॉल्फिनची संख्या वाढली म्हणजे नदीचे हवामान चांगले आहे असे पर्यावरणवादी सांगतात. त्यानुसार आता गंगा नदिचा विकास करण्याची संधी आहे.

बिहारमध्ये गंगा आणि तिच्या उपनद्यांमध्ये डॉल्फिनची संख्या गेल्या काही वर्षात मोठ्याप्रमाणात वाढली आहे. आता याच डॉल्फिनवर NDRC मार्फत संशोधन करण्यात येणार आहे. डॉल्फिनशी संबंधित प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा येथे उभारण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या संशोधन केंद्रामुळे निसर्गाला समाजाशी जोडण्यास मदत होईल. विज्ञान आणि पर्यावरणाचे विद्यार्थी तिथे जाऊन संशोधन करु शकणार आहेत. त्यामुळेच डॉल्फिनची जेवढी माहिती उपलब्ध होईल, तशीच माहिती गंगा नदिच्या प्रवाहाबद्दलही होणार आहे. भविष्यात ही सर्व माहिती अतिशय उपयोगी पडणार आहेत.

 

गंगा नदिमध्ये डॉल्फिन अधिकृतपणे 1801 मध्ये सापडला. डॉल्फिन मुख्यतः नेपाळ, भारत आणि बांगलादेशातील गंगा-ब्रह्मपुत्रा-मेघना आणि कर्णफुली-सांगू नदी प्रणालींमध्ये राहतात. या भागातील नदिच्या प्रवाहामध्ये डॉल्फिनसाठी पोषक वातावरण आहे. गरम आणि थंड पाण्याच्या प्रवाहामुळे डॉल्फिनचा आहार असलेल्या छोट्या माशांची निर्मितीही येथे मोठ्या प्रमाणात होते. या भागात वाढलेली डॉल्फिनची संख्या बघता, सरकारनं वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 च्या अनुसूची I अंतर्गत गंगा डॉल्फिनची शिकार करण्यास मनाई केली. त्याचाही परिणाम डॉल्फिनच्या वाढत्या संख्येवर झाला. बिहार सरकारने केलेल्या गणनेनुसार, 2018 मध्ये गंगा नदिमध्ये 1,048 डॉल्फिन होते. हा वाढता आकडा याच सर्व पोषक वातावरणामुळे आला असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळेच बिहारमध्ये डॉल्फिन संशोधन केंद्राची (Dolphin Research Center) मुहूर्तमेढ रोवण्यात आली. NDR प्रकल्पाला 2013 मध्ये नियोजन आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष मॉन्टेक सिंग, प्रा. आर.के. सिन्हा यांच्या पुढाकारानं मान्यता मिळाली. प्रा. आर.के. सिन्हा यांना डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. सध्या ते श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. या संशोधन केंद्रात फक्त डॉल्फिन नाही तर अन्य जलचरांचाही अभ्यास करण्यात येणार आहे. देशात आढळणाऱ्या डॉल्फिनपैकी निम्म्याहून अधिक बिहारमध्ये आहेत.

==============

हे देखील वाचा : पृथ्वीच्या अंतरंगात चाललंय काय…

==============

गंगा नदीच्या पाण्याची गुणवत्ताही डॉल्फिनच्या माध्यमातून मोजली जाते. त्यांच्या सोबत अन्य जलचरांचीही संख्या गंगा नदिमध्ये वाढली आहे, त्याचेही संशोधन करण्यात येणार आहे. यासोबत या संशोधन केंद्राच्या माध्यमातून डॉल्फिनसंदर्भात माहिती देण्यासाठीही एक गट तयार करण्यात येणार आहे. भविष्यात गंगा नदिवर पर्यटकांना दाखवण्यासाठी तयारी करण्यात येणार आहे. डॉल्फिन संशोधन केंद्रामधून(Dolphin Research Center)  काही युवकांना त्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात असून स्थानिकांना रोजगाराची संधीही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
सई बने…


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.